अंतिम लढतीच्या सामन्यात ताओनग्सकसारख्या दमदार प्रतिस्पध्र्याला नमवत श्रीकांतने अवधला चांगली सलामी दिली. मात्र संघाला या सलामीचा फायदा उठवता आला नाही. जेतेपद मिळाले नसले तरी या स्पर्धेमुळे खूप काही शिकायला मिळाले, अशी भावना कदम्बी श्रीकांतने व्यक्त केली.
‘‘आयबीएल स्पर्धेचे आयोजन हे बॅडमिंटनपटूंसाठी फायदेशीर ठरले. माझ्या संघात मॅथिअस बो, मार्किस किडो यांच्यासारखे अनुभवी खेळाडू होते. कोर्टवरचे वागणे, मानसिक कणखरता, सामन्यात विजयश्री खेचून आणण्याची पद्धत अशा अनेक गोष्टींवर या स्पध्रेमुळे मेहनत घेता आली, ’’ असे श्रीकांतने सांगितले.
‘‘पुरुष दुहेरीच्या लढतीत मॅथिअस बो आणि मार्किस किडो विजय मिळवून देतील असे वाटले होते. मात्र तसे झाले नाही. गुरुसाईदत्त अजय जयरामविरुद्ध आघाडीवर होता. मात्र त्यालाही विजय मिळवता आला नाही. या सामन्यांनी अवधचे जेतेपद हिरावले,’’ असे श्रीकांतने पुढे सांगितले.