मुंबईच्या संघाचा रणजी करंडक स्पर्धेत बोलबाला होता. मात्र काही काळापासून मुंबई संघाचा आलेख सातत्याने उतरता असल्याचे दिसून येत आहे. या मागे खेळाडूंनाही खराब कामगिरी याबरोबरच निवड समितीचे अपयश हेदेखील कारणीभूत आहे. त्यामुळे मुंबई रणजी संघ आणि २३ वर्षांखालील मुलांच्या संघ निवड समितीतील सदस्यांना पदावरून दूर करण्यात यावे, यासाठीचे पत्र मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) सदस्य क्लबचे प्रतिनिधी खोदादाद याझदेगार्दी यांनी लिहीले आहे.
या संघाच्या निवड प्रक्रियेत अनियमितता असल्याचा आरोप त्यांनी या पत्रात केला आहे. त्यामुळे या दोन्हींच्या निवड समिती सदस्यांना हटविण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सदस्य क्लबचे प्रतिनिधी खोदादाद याझदेगार्दी यांनी विशेष सर्वासाधारण सभा २१ फेब्रुवारीला बोलावली आहे. पारसी जिमखानाचे उपाध्यक्ष असलेल्या याझदेगार्दी यांनी MCA ला पत्र लिहून हे कळविले आहे.
मुंबई क्रिकेटच्या वरिष्ठ निवड समितीच्या अध्यक्षपदी अजित आगरकर आहे. या समितीमध्ये माजी कसोटीपटू नीलेश कुलकर्णी याचाही समावेश आहे. सध्या MCA च्या हंगामी समितीला अशी सभा बोलावण्याचा अधिकार नाही, पण नियम क्रमांक ३७ नुसार सदस्य क्लबचे प्रतिनिधी अशी सभा बोलवू शकतात. या समितीने याझदेगार्दी यांना पत्र पाठवून तुम्ही अशी सभा बोलावू शकता आणि सदस्यांनाही तसे कळवू शकता असे म्हटले होते. त्यानुसार आता २१ फेब्रुवारीला ही सभा होईल. त्यात निवड समितीला हटविण्याचा आणि त्या जागी नव्या निवड समितीची नियुक्ती करण्याचा ठराव मांडण्यात येणार असून
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 12, 2019 1:54 pm