20 September 2020

News Flash

टस्कन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यत : हॅमिल्टनला जेतेपद

पहिल्या सात फेऱ्यांदरम्यान दोन अपघात नोंदवले गेल्यामुळे सहा ड्रायव्हर्सना शर्यतीतून माघार घ्यावी लागली.

मुगेलो : मर्सिडिझ संघाच्या लुइस हॅमिल्टन याने अपघातामुळे व्यत्यय आणलेल्या टस्कन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीत आपले कसब पणाला लावत विजेतेपद मिळवले. आपल्या कारकीर्दीतील ९०वे जेतेपद मिळवणारा हॅमिल्टन हा मायकेल शूमाकरच्या विक्रमी जेतेपदांपासून फक्त एका विजयाने दूर आहे.

मुगेलोच्या अवघड  ट्रॅकवर प्रथमच झालेल्या या शर्यतीत पहिल्या सात फेऱ्यांदरम्यान दोन अपघात नोंदवले गेल्यामुळे सहा ड्रायव्हर्सना शर्यतीतून माघार घ्यावी लागली. त्यानंतर ४६व्या फे रीदरम्यान लान्स स्ट्रॉलच्या कारचा अपघात झाला. मात्र हॅमिल्टनने निर्विवाद वर्चस्व गाजवले. शर्यतीआधी आपल्या टी-शर्टवर ‘ब्रेओना टेलर यांना ठार मारणाऱ्या पोलिसांना अटक करा’ असा संदेश देत हॅमिल्टनने सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. हॅमिल्टनचा सहकारी वाल्टेरी बोट्टासला दुसऱ्या तर रेड बुलच्या अलेक्झांडर अल्बनला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2020 3:02 am

Web Title: lewis hamilton win tuscan grand prix zws 70
Next Stories
1 महिला संघात विश्वचषक जिंकण्याची क्षमता!
2 थॉमस, उबर चषक स्पर्धा घेणे कितपत सुरक्षित -सायना
3 सालाहच्या हॅट्ट्रिकमुळे लिव्हरपूलचा विजय
Just Now!
X