जगभरात सध्या एका छोट्या विषाणूने साऱ्यांना ‘लॉकडाउन’ केले आहे. करोनाच्या भीतीने क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाला ब्रेक लागला आहे. भारतातील लोकप्रिय IPL स्पर्धेचे आयोजनदेखील अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. सर्व क्रिकेटपटू आणि सहाय्यक वर्ग सध्या आपापल्या घरी आहे. त्यामुळे जुने फोटो पोस्ट करण्याचा एक ट्रेंड सोशल मीडियावर आला आहे. अनेक क्रिकेटपटूंनी हा ट्रेंड फॉलो केल्याचे दिसत आहे. सलामीवीर शिखर धवन देखील सातत्याने आपले जुने फोटो शेअर करतो आहे.

धवनने सुरूवातीला रैनासोबतचा एक जिममधला जुना फोटो शेअर केला होता. त्यावर त्याने रैना आणि स्वत:ला पैलवान संबोधलं होतं. त्यानंतर शिखर धवनने एक झकास गॉगल लावलेला जुना फोटो शेअर केला. त्या फोटोत त्याने काळा शर्ट आणि निळ्या रंगाची डेनिम जिन्स घातली होती. आता धवनने आपला आणि आपल्या मुलाचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत तो आणि त्याचा मुलगा या दोघांमधील देहबोलीतील साम्य स्पष्ट दिसत आहे. याचसोबत ‘सफरचंदाचे फळ झाडापासून फारसे लांब पडत नाही’ म्हणजेच ‘मुलगा आणि वडील यांच्या दिसण्यात फार वेगळेपण नसते’, अशा आशयाचे कॅप्शन त्याने दिले आहे.

 

View this post on Instagram

 

The Apple doesn’t fall far from the tree

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

दरम्यान, सुरूवातीला इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू रवी बोपारा याने स्वत:चा लहानपणीचा फोटो पोस्ट केला होता, नंतर चेन्नई सुपर किंग्जने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून काही भारतीय क्रिकेटर्स एकत्र असलेला एक जुना फोटो शेअर केला होता. त्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमार याने रोहित शर्मा आणि रैनासोबतचा एक जुना फोटो पोस्ट केला होता. त्या पाठोपाठ भारताचा डावखुरा सलामीवीर शिखर धवन याने त्याच्या इन्स्टाग्रामवरून पैलवान सुरेश रैनाचा एक फोटो शेअर केला होता.

त्यानंतर मास्टरब्लास्टर सचिनला देखील आपला जुना फोटो शेअर करण्याचा मोह आवरला नव्हता. १९९२ मध्ये इंग्लंडच्या कौंटी क्रिकेट स्पर्धेत सचिन यॉर्कशायर संघातर्फे खेळला होता. तेव्हाचा फोटो त्याने शेअर केला. तसेच नंतर त्याने माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या घरी भोजनाचा आस्वाद घेतनाचा फोटोदेखील शेअर केला होता.