गेल्या वर्षी अंतिम लढतीत पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत झाल्यामुळे २२ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपविण्यात अपयशी ठरलेल्या अर्जेटिनाला यंदाच्या कोपा अमेरिका स्पध्रेच्या पहिल्या सामन्यापूर्वीच धक्का बसला आहे. १९९३ नंतर कोपा अमेरिका स्पध्रेचे अजिंक्यपद पटकावण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अर्जेटिनाला प्रमुख खेळाडू लिओनेल मेस्सीच्या अनुपस्थितीत सलामीच्या लढतीत गतविजेत्या चिलीचा सामना करावा लागणार आहे. मेस्सीला अंतिम अकरामध्ये स्थान देऊन त्याच्या दुखापतीत वाढ करण्याचा कोणताही धोका संघाला पत्करायचा नसल्याने त्याला मंगळवारच्या लढतीत बदली खेळाडूंमध्ये बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अर्जेटिनाला २००७ मध्ये जेतेपदाने हुलकावणी दिली होती. ब्राझीलविरुद्ध ३-० अशा फरकाने त्यांना पराभूत व्हावे लागले होते, परंतु चार वर्षांनंतर अर्जेटिनाने भरारी घेत पुन्हा अंतिम फेरीत प्रवेश केला. यजमान चिलीने त्यांना कडवे आव्हान देत सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये ताणला आणि त्यात ४-१ अशी बाजी मारून पहिल्यांदा कोपा स्पध्रेचा चषक उंचावला. या पराभवाचा वचपा काढण्याची संधी अर्जेटिनासाठी चालून आली, परंतु मेस्सीच्या अनुपस्थितीत त्यांना हे सहज शक्य नाही. गतवर्षीचा पराभव वगळता अर्जेटिनाने कोपा अमेरिका स्पध्रेत चिलीविरुद्ध खेळलेल्या २५ सामन्यांपैकी १९ मध्ये विजय मिळवले, तर सहा लढती अनिर्णित राहिल्या आहेत.

थेट प्रक्षेपण : सोनी इएसपीएन, सोनी इएसपीएन एचडी

सामन्याची वेळ : सकाळी ७:३० वाजल्यापासून