News Flash

लिओनेल मेस्सीने बार्सिलोनाचा करार फेटाळला?

या बातमीमुळे बार्सिलोना क्लबमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

२०१८ नंतर क्लबला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा

लिओनेल मेस्सी आणि बार्सिलोना हे समीकरण चाहत्यांच्या मनात घट्ट आहे, परंतु हे १३ वर्षांचे ऋणानुबंध व्यावसायिक समीकरणांमुळे दुरावणार असल्याची चर्चा आहे. २०१८ नंतर बार्सिलोना क्लबसोबत नवा करार करण्यास मेस्सीने नकार दिल्याचा दावा स्पेनमधील वृत्तपत्रांनी केला आहे.

पाच वेळा बॅलॉन डी’ओर पुरस्कार पटकावणाऱ्या मेस्सीचा बार्सिलोनाशी असलेला करार दोन वर्षांनंतर संपुष्टात येत आहे. ‘कोपा अमेरिका’ फुटबॉल स्पध्रेत सलग जेतेपदाने हुलकावणी दिल्यामुळे हताश झालेल्या मेस्सीने जुलै महिन्यात आपला हा निर्णय कुटुंबीयांना कळवला असल्याचा दावा या वृत्तपत्राने केला आहे.  या बातमीमुळे बार्सिलोना क्लबमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 2:38 am

Web Title: lionel messi may rejected barcelona agreement
Next Stories
1 …तर पुजाराला पुन्हा खेळण्याची संधी मिळाली असती!
2 नोटबंदीने घेतली रणजीतील क्रिकेटपटूंची ‘विकेट’
3 आठवडय़ाची मुलाखत : भारताने ‘डीआरएस’ वापरणे स्वागतार्ह
Just Now!
X