26 February 2021

News Flash

मेसीवर तीन महिन्यांची बंदी

‘कॉनमेबोल’ संघटनेवर टीका केल्यामुळे कारवाई

‘कॉनमेबोल’ संघटनेवर टीका केल्यामुळे कारवाई

गेल्या महिन्यात झालेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत भ्रष्टाचार झाल्याचे वक्तव्य करणारा अर्जेटिनाचा कर्णधार लिओनेल मेसी याच्यावर आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी तीन महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे.

‘कॉनमेबोल’ या दक्षिण अमेरिका फुटबॉल महासंघाने मेसीला बंदीसह ५० हजार डॉलरचा दंड ठोठावला आहे. जुलै महिन्यात ब्राझील येथे झालेल्या या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकासाठी खेळवण्यात आलेल्या सामन्याच अर्जेटिनाने चिलीवर २-१ असा विजय मिळवल्यानंतर मेसीने हे वक्तव्य केले होते. त्याचबरोबर उपांत्य फेरीत ब्राझीलकडून २-० असा पराभव पत्करल्यानंतर मेसीचा राग उफाळून आला होता.

‘‘सध्या ‘कॉनमेबोल’ संघटनेवर ब्राझीलचे नियंत्रण आहे. भ्रष्टाचार आणि पंचांच्या खराब कामगिरीमुळे लोकांना फुटबॉलचा निखळ आनंद लुटता येत नाही. त्यामुळे हा खेळ मलिन होत आहे,’’ असा दावा मेसीने केला होता.

तिसऱ्या क्रमांकासाठीच्या सामन्यात चिलीच्या गॅरी मेडेलसह वाद घातल्याप्रकरणी मेसीला लाल कार्ड दाखवून मैदानाबाहेर पाठवण्यात आले होते. आपल्या कारकीर्दीतील मेसीचे हे दुसरे लाल कार्ड ठरले होते. मेसीने आपल्या या वक्तव्याबद्दल नंतर ‘कॉनमेबोल’ संघटनेची माफी मागितली होती.

बंदीमुळे मेसीला चार मैत्रीपूर्ण सामन्यांना मुकावे लागणार आहे. मात्र या बंदीविरोधात दाद मागण्यासाठी मेसी आणि अर्जेटिनाकडे एका आठवडय़ाचा कालावधी आहे. अर्जेटिनाचे सप्टेंबर महिन्यात चिली आणि मेक्सिकोविरुद्ध मैत्रीपूर्ण सामने होणार आहेत. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये अर्जेटिना मैत्रीपूर्ण सामन्यात जर्मनीशी दोन हात करेल. या तिन्ही सामन्यांत मेसीला खेळता येणार नाही, मात्र नोव्हेंबरनंतर तो अर्जेटिनाचे प्रतिनिधित्व करू शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 11:31 pm

Web Title: lionel messi mpg 94
Next Stories
1 Ind vs WI : पहिल्याच सामन्यात भारतीय गोलंदाजांची ऐतिहासिक कामगिरी
2 कांबळ्या, आठवले का जुने दिवस? शारदाश्रमची जोडी रमली जुन्या आठणींमध्ये
3 Ind vs WI 1st T20I : भारताचा रडत-खडत विजय, ४ गडी राखून विंडीजवर मात
Just Now!
X