05 July 2020

News Flash

अर्जेटिना संघासोबत मेस्सीचा सराव

दुखापतीतून सावरत असणाऱ्या लिओनेल मेस्सीने गुरुवारी अर्जेटिनाच्या संघ सहकाऱ्यांसोबत कसून सराव केला.

कोपा अमेरिका फुटबॉलस्पर्धेत अंतिम फेरीत चिलीविरुद्धच्या सामन्यात मेस्सीच्या अर्जेंटिनाला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभवाचा धक्का बसला.

दुखापतीतून सावरत असणाऱ्या लिओनेल मेस्सीने गुरुवारी अर्जेटिनाच्या संघ सहकाऱ्यांसोबत कसून सराव केला. त्यामुळे ‘ड’ गटातील पनामाविरुद्ध होणाऱ्या लढतीत तो खेळण्याची शक्यता बळावली आहे. होंडुरासविरुद्धच्या मैत्रीपूर्ण लढतीत मेस्सीच्या पाठीला दुखापत झाली होती आणि त्यानंतर संघाच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा स्वतंत्र सराव सुरू होता.
कोपा अमेरिका स्पध्रेच्या पहिल्या सामन्यात अर्जेटिनाने २-१ अशा फरकाने चिलीवर विजय मिळवला होता. या सरावानंतर मेस्सीने आपल्या फेसबुक पेजवर लिहिले की, ‘‘लवकरच बरा होऊन संघाच्या मदतीसाठी उपलब्ध असेन, अशी आशा करतो.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2016 3:20 am

Web Title: lionel messi trains with argentina team in chicago
टॅग Lionel Messi
Next Stories
1 सायना, श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत
2 पुणे कबड्डी असोसिएशनची घटनादुरुस्तीसाठी ‘पददुरुस्ती’
3 प्रीमिअर फुटसाल लीगवर एआयएफएफ कायदेशीर कारवाईच्या पवित्र्यात
Just Now!
X