दुस-या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावातही दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या २१४ धावांत गुंडाळला. तर प्रत्युत्तरादाखल, भारताने पहिल्या डावात पहिल्या दिवसअखेर २२ षटकांत बिनबाद ८० धावा केल्या आहेत. मात्र, कसोटी मालिकेच्या दुसऱया दिवशी पावसामुळे व्यत्यय आल्याने खेळ तात्पुरता थांबविण्यात आला आहे. खेळपट्टी खेळण्याजोगी झाल्यानंतर खेळ सुरू करण्यात येणार आहे.
भारताच्या फिरकी मा-यासमोर बंगळूरु कसोटीतील पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजाने फिरकी मारा कायम ठेवताना पाहुण्या संघाचा पहिला डाव अवघ्या २१४ धावांत गुंडाळला. या दोघांनीही प्रत्येकी चार खेळाडूंना बाद केले. द. आफ्रिकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या सलामीच्या जोडीने बिनबाद ८० धावा केल्या. यामध्ये शिखर धवनने ४५, तर मुरली विजय याने २८ धावांची संयमी खेळी केली आहे. आज दुसऱया दिवशी सामना सुरू होण्यापूर्वीच पावसाला सुरूवात झाली. पावसाचा जोर वाढल्याने खेळ तात्पुरता थांबविण्यात आला.