News Flash

भारतासमोर कांगारु शरण, ट्वेन्टी-२० मालिका खिशात

भारत वि. ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० सामन्याचे लाइव्ह अपडेट्स

भारताचा ऑस्ट्रेलियावर २७ धावांनी दमदार विजय.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मानहानीकारक पराभवाला सामोरे गेलेल्या भारतीय संघाने ट्वेन्टी-२० मालिका २-० ने जिंकून पराभवाचा वचपा काढला आहे. मेलबर्न स्टेडियमवरील दुसरा ट्वेन्टी-२० सामना भारतीय संघाने २७ धावांनी जिंकला. या सामन्यात भारताच्या १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱया ऑस्ट्रेलियालाला १५७ धावांपर्यंतच मजल मारता आली. सामन्याचा नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी करत २० षटकांत ३ विकेट्सच्या मोबदल्यात १८४ धावा कुटल्या. भारताकडून रोहित शर्माने (६०) धावांची, तर विराट कोहलीने ३३ चेंडूत नाबाद ५९ धावांची खेळी साकारली. धवनने ३२ चेंडूत ४२ धावांचे योगदान दिले.

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने दमदार सुरूवात करत सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. अरोन फिंच आणि शॉन मार्श यांनी चांगली सुरूवात करून दिली, पण मार्श बाद झाल्यानंतर लायन आणि मॅक्सेवल स्वस्तात तंबूत परतल्यामुळे सामन्यावर भारताने पकड निर्माण केली. त्यानंतर फिंच धावचित बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डावच कोसळला. ऑस्ट्रेलियाकडून फिंचने सर्वाधिक ७४ धावा केल्या.भारताकडून फिरकीपटू रविंद्र जडेजा आणि बुमराने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर अश्विन, पंड्या आणि युवराजने प्रत्येकी एक विकेट मिळवली.

दरम्यान, टीम इंडियाच्या फलंदाजीवेळी सलामीवीर जोडीने चांगली सुरूवात करून दिली होती. रोहितची बॅट याही सामन्यात चांगली तळपली. धवन देखील साजेशी साथ देत होता, पण रिव्हर्स फटका मारण्याच्या नादात ११ व्या षटकात ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन धवन माघारी परतला. त्यानंतर कोहलीने संघावर कोणताही दबाव निर्माण होऊ न देता. पहिल्या चेंडूवर चौकार खेचून आक्रमक सुरूवात केली. रोहित शर्मा १६ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर दोन धावा घेण्याच्या नादात धावचित बाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर संघाच्या धावसंख्येची धुरा सांभाळत विराट कोहलीने अर्धशतकी खेळी साकारली. विराटला कर्णधार महेंद्रसिंग धोनीने साजेशी साथ देत ९ चेंडूत १४ धावा केल्या.

सामनावीर- विराट कोहली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2016 3:06 pm

Web Title: live cricket score india ind vs australia aus 2nd t20i
टॅग : Indvsaus
Next Stories
1 भारताच्या महिला संघाने इतिहास घडवला, ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा मालिका विजय
2 ऑस्ट्रेलियन ओपन : सानिया-मार्टिनाला महिला दुहेरीचे विजेतेपद
3 धोनीला दिलासा, विरोधातील खटल्याच्या सुनावणीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
Just Now!
X