भारतासाठी ‘करो या मरो’ असलेल्या तिरंगी मालिकेतील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात पावसाचा खेळ सुरू असल्याने सामना रद्द करण्यात आला आहे. दोन्ही संघांना दोन गुण देण्यात आले असून शुक्रवारी इंग्लंडसोबत भारताचा सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळविणाऱया संघाला ऑस्ट्रेलियासोबत अंतिम सामना खेळता येणार आहे. त्यामुळे शुक्रवारचा सामना भारत आणि इंग्लंड दोघांसाठी ‘करो या मरो’ असणार आहे. 
दरम्यान, आजच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात यजमान संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता परंतु, सामना सुरू होताच वरुणराजाचा व्यत्यय आला. काहीकाळ सामना थांबविल्यानंतर सामना पुन्हा सुरू करून 44 षटकांचा करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा पावसाची रिमझीम सुरू झाल्याने सामना थांबवावा लागला आणि अखेर पचांनी सामना रद्द म्हणून घोषित केला. सामना रद्द होण्याआधी प्रथम फलंदाजी करणाऱया भारतीय संघाची धावसंख्या 2 बाद 69 अशी होती. सलामीवीर शिखर धवनने यावेळीही निराशा केली. धवन केवळ 8 धावा करून माघारी फिरला तर, अंबाती रायुडू 23 धावांवर बाद झाला.
स्कोअरकार्ड-