बांगलादेश कसोटीचा तिसऱया दिवसाचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे थांबविण्यात आला आहे.  दिवसाअखेर भारतीय संघाला सहा खेळाडूंच्या मोबदल्यात ४६२ धावा करता आल्या. तिसऱ्या दिवशी टीम इंडियाची घसरण झालेली पाहायला मिळाली. खेळाला सुरूवात झाल्यानंतर शिखर धवन १७३ धावांवर बाद झाला. तर, सलामीवीवर मुरली विजयने फलंदाजीत संयम राखत शतक साजरे केले.  शाकीब अल हसनने शिखर धवन आणि रोहित शर्मा यांना झटपट तंबुत परत धाडले. तर कर्णधार विराट कोहलीदेखील मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. तो १४ धावांवर बाद झाला. शाकीब अल हसनच्या फिरकीच्या जाळ्यात अडकून मुरली विजय १५० धावांवर पायचीत बाद झाला. यानंतर अजिंक्य रहाणेने किल्ला लढवत झुंझार खेळी केली परंतु, शाकिबने रहाणेचा ९८ धावांवर त्रिफळा उडवून टीम इंडियाला धक्का दिला. वृद्धिमान साहा देखील झटपट बाद होऊन तंबूत परतला आहे.
दरम्यान,  कसोटीच्या दुसऱया दिवसाचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला होता. सकाळपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने दुसऱया दिवसाच्या खेळाची सुरूवातच होऊ शकली नाही. दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्याने अखेर पंचांनी दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.