राजकोट स्टेडियमवरील इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी अनिर्णीत राहीली. इंग्लंडच्या ३१० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱया भारतीय संघाला ५२.३ षटकांत पाचव्या दिवसाच्या अखेरीस ६ बाद १७२ धावा करता आल्या. विराट कोहली ४९, तर जडेजा ३२ धावांवर नाबाद राहिला. कसोटीच्या पाचव्या दिवशी उपहारानंतर अलिस्टर कूक १३० धावांवर झेलबाद झाल्यावर ३ बाद २६० धावांवर इंग्लंडने आपला डाव घोषित केला आणि भारताला विजयासाठी ३१० धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने खराब सुरूवात केली.

सलामीवीर गौतम गंभीर आपले खाते देखील उघडू शकला नाही. गंभीर स्लिपमध्ये झेलबाद होऊन शून्यावर माघारी परतला. मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांनी संयमी खेळी सुरू केला. पण यावेळी पुजारा स्वस्तात बाद झाला. रशीदच्या गोलंदाजीवर पुजारा पायचीत होऊन माघारी परतला. भारताची धावसंख्या ६८ असताना मुरली विजय बाद झाला आणि भारतीय संघ बॅकफूटवर गेला. अजिंक्य रहाणे अवघ्या एका धावेवर क्लीनबोल्ड होऊन माघारी परतल्यावर भारतीय संघाच्या अडचणींत वाढ झाली. त्यात इंग्लंडच्या गोलंदाजांना भारतीय फलंदाजांवर दबाव निर्माण करण्यात यश आले. रहाणे बाद झाल्यानंतर विराटने अश्विनला साथीला घेऊन खिंड लढवली. अश्विन ३२ धावांवर बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. साहा देखील स्वस्तात माघारी परतल्यानंतर संघावर पराभवाचे सावट निर्माण झाले होते. मात्र, जडेजाने कोहलीला अखेरपर्यंत साथ देत सामना अनिर्णीत राखण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. इंग्लंडच्या मोईन अली याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. मोईन अलीने सामन्यात शतकी कामगिरीसह तीन विकेट्स देखील घेतल्या.

इंग्लंडच्या संघाने उपहारापर्यंत २ बाद २६० धावांच्या आघाडीची नोंद केली होती. सामन्याच्या पाचव्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात भारतीय गोलंदाजांकडून चाहत्यांना बऱयाच अपेक्षा होत्या. पण भारतीय गोलंदाजांना यश आले नाही. हमीद आणि कूक यांनी चांगली फटकेबाजी केली. सुरूवातीची काही षटके खेळून काढल्यानंतर दोघांनीही आक्रमक फलंदाजी सुरू केली. भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरत असलेली कूक आणि हमीदची जोडी अखेर ५९ व्या षटकात फुटली. अमित मिश्राच्या फिरकीवर मोठा फटका मारताना हमीद ८२ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर जो रुट देखील मैदानात आक्रमक पवित्रा घेऊनच उतरला. पण त्याचे मनसुबे मिश्राने फोल ठरवले. जो रुटला मिश्राने स्वस्तात माघारी धाडले. दुसऱया बाजूने कूकने आपली फटकेबाजी कायम ठेवून आपले ३० वे आंतरराष्ट्रीय कसोटी शतक साजरे केले. कसोटी विश्वात ३० वे शतक गाठणारा कूक हा १३ वे खेळाडू ठरला.  सामन्याची सध्याची परिस्थितीपाहून कसोटी अनिर्णित राहिल असेच चित्र सध्या आहे. उपहारानंतर कूकने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली आणि मोठा फटका मारताना तो १३० धावांवर झेलबाद झाला. रवींद्र जडेजाने कूकचा झेल टीपला. कूक बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या संघाने आपला डाव घोषित केला आणि भारतासमोर ३१० धावांचे आव्हान ठेवले होते.

इंग्लंडच्या पहिल्या डावातील ५३७ धावांचा पाठलाग करणाऱया भारतीय संघाचा डाव चौथ्या दिवशी ४८८ धावांत संपुष्टात आला होता. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात ४९ धावांची घेता आली होती.

Cricket Score of India vs England : दिवसभरातील अपडेट्स- 

 

Live Updates
16:36 (IST) 13 Nov 2016
राजकोट कसोटी अनिर्णीत, दुसऱया डावात भारतीय संघाच्या ६ बाद १७२ धावा
16:35 (IST) 13 Nov 2016
रशीदच्या तिसऱया चेंडूवर कोहलीचा स्वेअर लेगवर एक धाव
16:35 (IST) 13 Nov 2016
कोहलीकडून दोन चेंडू निर्धाव
16:35 (IST) 13 Nov 2016
विराट कोहली स्ट्राईकवर, कोहलीचे अर्धशतक पूर्ण होणार का?
16:34 (IST) 13 Nov 2016
५२ षटकांच्या अखेरीस भारत ६ बाद १७१ धावा. (कोहली- ४८ , जडेजा- ३२ )
16:33 (IST) 13 Nov 2016
जडेजाचा लाँग ऑनवर चौकार, भारत ६ बाद १७१
16:33 (IST) 13 Nov 2016
जडेजाचा स्ट्रेट ड्राईव्ह चौकार, भारत ६ बाद १६७ धावा
16:31 (IST) 13 Nov 2016
कोहली खेळतोय ४८ धावांवर, आजच्या दिवसाचा खेळ संपण्यास काही षटकांचा खेळ शिल्लक
16:30 (IST) 13 Nov 2016
कोहलीचा हवेत फटका, दोन धावा
16:29 (IST) 13 Nov 2016
कोहलीचा डीप मिड विकेटला चौकार
16:28 (IST) 13 Nov 2016
५० षटकांच्या अखेरीस भारत ६ बाद १५६ धावा
16:27 (IST) 13 Nov 2016
मोईन अलीकडून निर्धाव षटक, भारत ६ बाद १५६ धावा
16:25 (IST) 13 Nov 2016
४९ षटकांच्या अखेरीस भारत ६ बाद १५६ धावा. (कोहली- ४२, जडेजा- २३)
16:23 (IST) 13 Nov 2016
जडेजाचा डीप मिड विकेटला चौकार
16:21 (IST) 13 Nov 2016
४८ षटकांच्या अखेरीस भारत ६ बाद १५२ धावा. (कोहली- ४२, जडेजा- १९ )
16:20 (IST) 13 Nov 2016
जडेजाचा स्वेअर लेगला फटका, तीन धावा
16:19 (IST) 13 Nov 2016
४७ षटकांच्या अखेरीस भारत ६ बाद १४९ धावा. (कोहली- ४२ , जडेजा-१६ )
16:17 (IST) 13 Nov 2016
जडेजाचा डीप मिड विकेटवर चौकार, भारत ६ बाद १४८
16:16 (IST) 13 Nov 2016
जडेजाचा लाँग ऑनच्या दिशेने चौकार, भारत ६ बाद १४४
16:15 (IST) 13 Nov 2016
४६ षटकांच्या अखेरीस भारत ६ बाद १४० धावा. (कोहली- ४२ , जडेजा- ७ )
16:13 (IST) 13 Nov 2016
इंग्लंडला विजयासाठी चार विकेट्सची गरज, भारत सामना अनिर्णीत राखण्यात यशस्वी होणार का?
16:13 (IST) 13 Nov 2016
जडेजाचा चौकार, भारत ६ बाद १४० धावा
16:11 (IST) 13 Nov 2016
इंग्लंडकडून जडेजावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न
16:11 (IST) 13 Nov 2016
जडेजाचा कव्हर्सच्या दिशेने चांगला फटका, दोन धावा
16:10 (IST) 13 Nov 2016
साहा बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा फलंदाजीसाठी मैदानात
16:07 (IST) 13 Nov 2016
भारताची सहावी विकेट वृद्धीमान साहा झेलबाद
16:00 (IST) 13 Nov 2016
साहाकडून आणखी एक चौकार, भारत ५ बाद १२७ धावा
15:59 (IST) 13 Nov 2016
वृद्धीमान साहाचा लाँग ऑनवर चौकार
15:58 (IST) 13 Nov 2016
गोलंदाजीत बदल, मोईन अलीला गोलंदाजीसाठी पाचारण
15:57 (IST) 13 Nov 2016
४१ षटकांच्या अखेरीस भारत ५ बाद १२३ धावा. (कोहली- ४१ , साहा- ० )
15:55 (IST) 13 Nov 2016
विराट कोहलीचा मिड विकेट आणि मिड ऑनच्यामधून चौकार
15:54 (IST) 13 Nov 2016
दिवसाचा खेळ संपण्यासाठी जवळपास ९ षटकांचा खेळ शिल्लक
15:53 (IST) 13 Nov 2016
अश्विन बाद झाल्यानंतर वृद्धीमान साहा फलंदाजीसाठी मैदानात
15:50 (IST) 13 Nov 2016
तीन चौकार मारल्यानंतर पुढच्याच चेंडूवर अश्विन कव्हर्समध्ये झेलबाद
15:49 (IST) 13 Nov 2016
अश्विनचे एकाच षटकात तीन चौकार, भारत ४ बाद ११८ धावा. लक्ष्य अजूनही दूरच
15:49 (IST) 13 Nov 2016
अश्विनचा आणखी एक चौकार, भारत ४ बाद ११४ धावा
15:47 (IST) 13 Nov 2016
आर.अश्विनचा अन्सारीला डीप पॉईंटच्या दिशेने चौकार, भारत ४ बाद ११० धावा
15:43 (IST) 13 Nov 2016
विराट कोहलीचा दमदार चौकार, भारताच्या धावसंख्येचे शतक
15:33 (IST) 13 Nov 2016
ड्रींक्सची वेळ, भारत ४ बाद ९५ धावा. (कोहली- ३० , अश्विन- १५ )
15:31 (IST) 13 Nov 2016
भारतीय संघ लक्ष्यापासून २१८ धावा दूर
15:30 (IST) 13 Nov 2016
खेळ संपण्यास शेवटच्या जवळपास १६ षटकांचा खेळ शिल्लक, भारत ४ बाद ९२ धावा.
15:25 (IST) 13 Nov 2016
इंग्लंडकडून आक्रमक क्षेत्ररक्षण, भारतीय फलंदाजांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न
15:17 (IST) 13 Nov 2016
३० षटकांच्या अखेरीस भारत ४ बाद ८९ धावा. (कोहली- २८ , अश्विन- ११ )
15:16 (IST) 13 Nov 2016
अश्विनचा कव्हर्सच्या दिशेने नजाकती चौकार, भारत २ बाद ८९ धावा
15:15 (IST) 13 Nov 2016
पंचांचा निर्णय योग्य, अश्विन नाबाद असल्याचे डीआरएसमध्ये निष्पन्न
15:14 (IST) 13 Nov 2016
इंग्लंडकडून डीआरएसची मागणी, पण अपयश
15:14 (IST) 13 Nov 2016
मोईन अलीचा चेंडू अश्विनच्या पॅडवर आदळला, पायचीत झाल्याची अपील, पण पंचांचा नकार
15:11 (IST) 13 Nov 2016
२९ षटकांच्या अखेरीस भारत ४ बाद ८५ धावा. (कोहली- २८ , अश्विन- ७)
15:05 (IST) 13 Nov 2016
आर.अश्विनचा कव्हर्सच्या दिशेने चौकार, भारत ४ बाद ८२ धावा
14:54 (IST) 13 Nov 2016
भारताचा चौथा धक्का, मोईन अलीच्या फिरकीवर रहाणे क्लीनबोल्ड