भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱया एकदिवसीय सामन्यात सुरेश रैनाने दमदार फलंदाजी करत शतकी खेळी साकरली आहे. रैनाच्या शतकाच्या तर, रोहीत आणि धोनीच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने इंग्लंडसमोर ३०४ धावांचा डोंगर उभा केला आहे.  
यजमान संघाने  नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले होते. कसोटी मालिकेतील मानहानीकारक पराभव विसरून भारतीय संघ एकदिवसीय सामन्यात पूर्ण ताकदीनीश मैदानात उतरेल अशी आशा होती. पण, भारताच्या सलामी फलंदाजांनी चाहत्यांचा हिरमोड केला. युवा तडफदार फलंदाज विराट कोहलीला भोपळाही फोडता आला नाही. कोहली झेलबाद होऊन शून्यावर माघारी परतला तर, शिखर धवनही ११ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर रोहीत शर्मा आणि अजिंक्य रहाणेने सावध फलंदाजी करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र, रहाणे आपल्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर माघारी परतला. रोहीत शर्माने संयमी फलंदाजी करत आपले अर्धशतक गाठले पण, पुढच्याच क्षणी उंच फटका लगावण्याच्या नादात रोहीतनेही आपली विकेट गमावली आणि ५२ धावांवर तो झेलबाद झाला. त्यानंतर मैदानाता आलेल्या धोनी, रैनाने सुरुवातीला भारताची बाजू सावरत सावध फलंदाजी केली त्यानंतर दोघांनीही आक्रमक रुप धारण करत जोरदार फटकेबाजी केली.  रैनाने आपल्या डावखुऱया शैलीतील नजाकती फटकेबाजीच्या जोरावर ७५ चेंडुंमध्ये दमदार शतक ठोकले. पाठोपाठ धोनीने आपले अर्धशतक गाठले. अखेर ५० षटकांच्या शेवटी भारताने इंग्लंडसमोर ३०४ धावांचा डोंगर उभा केला आहे.  

लाईव्ह स्कोअर-