भुवनेश्वर कुमारच्या भन्नाट स्पेलमुळे भारताविरुद्धच्या दुस-या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडला केवळ २४ धावांची आघाडी घेता आली. इंग्लंडचा पहिला डाव ३१९ धावांवर संपुष्ठात आला.
काल खेळ थांबला, तेव्हा इंग्लंडने सहा गडी गमावून २१९ धावा केल्या होत्या. शनिवारी सकाळी खेळ सुरू झाल्यानंतर प्रायर आणि प्लंकेट यांनी वेगाने धावा जमविण्यास सुरवात केली. याच प्रयत्नांत प्रायर बाद झाला. मात्र प्लंकेटने धावांचा वेग कायम राखला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दोन शतके झळकावलेल्या प्लंकेटने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाबाद ५५ धावा केल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सहा गडी बाद केले. तर रवींद्र जडेजाने दोन आणि मुरली विजयने एक गडी बाद केला.