मोहाली कसोटीत भारतीय संघाने इंग्लंडवर मजबूत पकड निर्माण केली असून दुसऱया डावात इंग्लंडचे चार फलंदाज अवघ्या ७८ धावांत माघारी परतले आहेत. भारतीय संघाकडे सध्या फक्त ५६ धावांची आघाडी असली तरी इंग्लंडचे चार महत्त्वाचे फलंदाज तंबूत दाखल झाल्याने इंग्लंड बिकट स्थितीत आहे.

भारताने पहिल्या डावात सर्वबाद ४१७ धावांपर्यंत मजल मारून इंग्लंडवर १३४ धावांची आघाडी घेतली. आर.अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी यावेळी चमकदार कामगिरी केली. रवींद्र जडेजाने सर्वाधिक ९० धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली, तर अश्विनने ७२ धावांचे योगदान दिले. जयंत यादवने जडेजाला उत्तम साथ देऊन आंतरराष्ट्रीय कसोटीमधील आपले पहिलेवहिले अर्धशतक साजरे केले. जयंत यादवने ५५ धावा ठोकल्या. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने यावेळी पाच विकेट्स घेतल्या, तर फिरकीपटू रशीदने चार भारतीय फलंदाजांना माघारी धाडले. या दोघांव्यतिरिक्त इतर कोणत्याच गोलंदाजांला यश मिळाले नाही.

IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: SRH चे फलंदाज ठरले फेल पण २० वर्षाच्या तरुणतुर्क शिलेदाराने सावरला संघाचा डाव, कोण आहे हा नितीश रेड्डी?
CSK vs KKR Live Cricket Score Updates in Marathi
IPL 2024 CSK vs KKR: चेन्नईने रोखला केकेआरचा विजयरथ, ऋतुराज-जडेजाची शानदार कामगिरी
Virat Kohli and Gautam Gambhir hugging each other
RCB vs KKR : विराट-गौतमने जिंकली सर्वांची मनं, गतवर्षातील वाद विसरुन एकमेकांची घेतली गळाभेट, VIDEO व्हायरल
Rohit Sharma, Young Debutants, overwhelmed, Praises, Series Win, against england, Positive Influence, indian cricket team,
तरुण सहकाऱ्यांच्या यशातील आनंदात हरवून गेलो – रोहित शर्मा

दुसऱया डावात इंग्लंडचे चार फलंदाज स्वस्तात तंबूत दाखल झाले असून यात अश्विनने तीन, तर जयंत यादवने एक विकेट घेतली. इंग्लंडने यावेळी दुसऱया डावाची सुरूवात करण्यासाठी हमीदला सलामीसाठी न पाठवता कूकसोबत जो रुटला मैदानात पाठविण्यात आले. दोघांनी संयमी सुरूवा केली खरी पण अश्विनच्या अफलातून फिरकीवर कूक क्लीनबोल्ड झाला. त्यानंतर मोईन अली देखील मोठा फटका मारण्याच्या नादात स्वस्तात माघारी परतला. बेअरस्टो आणि रूट जोडी मैदानात जम बसवण्यास सुरूवात करत असतानाच जयंत यादवने ही जोडी फोडली. जयंतच्या गोलंदाजीवर बेअरस्टो यष्टीरक्षक पार्थिव पटेलकरवी झेलबाद झाला. पार्थिव पटेलने उत्कृष्ट झेल टीपला. आजच्या दिवसाच्या अखेरच्या षटकात अश्विनने भारतीय संघाला चौथे यश मिळवून दिले. दमदार फॉर्मात असलेल्या बेन स्टोक्सला अश्विनने पायचीत करून अवघ्या पाच धावांवर तंबूचा रस्ता दाखवला.

तत्पूर्वी, तिसऱया दिवसाच्या खेळाला सुरूवात झाल्यानंतर आर.अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी संयमी फलंदाजी करत भारताला इंग्लंडवर आघाडी मिळवून दिली. भारताने तीनशेचा आकडा गाठल्यानंतर संघाला सातवा धक्का बसला. आर.अश्विन ७२ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला. अश्विननंतर जडेजाने मैदानात टीच्चून फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. जयंत यादवनेही जडेजाला साजेशी साथ दिली. उपहारानंतरच्या सत्रात वोक्सच्या गोलंदाजीवर लागोपाठ तीन चौकार ठोकून जडेजाने आक्रमक फलंदाजीला सुरूवात केली. पण मोठा फटका मारण्याच्या नादाज रशीदच्या फिरकीवर जडेजा लाँग ऑनवर झेलबाद झाला. जडेजाने यावेळी सर्वाधिक ९० धावा केल्या. जडेजा बाद झाल्यानंतर जयंत यादवने मैदानात जम बसवून आपले अर्धशतक साजरे केले. जयंत यादवच्या अर्धशतकीच्या जोरावर भारतीय संघाला चारशे धावांचा टप्पा गाठता आल्याने १०० हून अधिक धावांची आघाडी घेता आली. बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर जयंत यादव ५५ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला. मग बेन स्टोक्सने उमेश यादवला बाद करून सामन्यातील पाचवी विकेट घेतली आणि भारतीय संघाचा पहिला डाव ४१७ धावांत संपुष्टात आला.

दुसऱया दिवसाच्या अखेरीस भारतीय संघाला ६ बाद २७१ धावांपर्यंत मजल मारता आली होती. अश्विनने महत्त्वाच्या क्षणी मैदानावर टीच्चून फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या अखेरीस ८ बाद २६८ अशी अवस्था असलेल्या इंग्लंडचा डाव दुसऱया दिवसाच्या पहिल्या सत्रात मोहम्मद शमीने २८३ धावांत संपुष्टात आणला होता. इंग्लंडच्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची सुरूवात चांगली झाली होती. मुरली विजय यावेळी अपेक्षित कामगिरी करू शकला नसला तरी पार्थिव पटेलने ४२ धावांचे योगदान दिले होते. दुसऱया सत्राच्या अखेरीस भारत २ बाद १४८ असा मजबूत स्थितीत होता. पण रविवारी तिसरे सत्र रोमांचक ठरले. तिसऱया सत्रात इंग्लंडने दमदार पुनरागमन केले होते. तिसऱया सत्राच्या खेळाला सुरूवात झाल्याच्या पहिल्याच षटकात रशीदने चेतेश्वर पुजाराला माघारी धाडले. पुजाराने ५१ धावांचे योगदान दिले. चेतेश्वर पुजाराने यावेळी आपले ११ वे आंतरराष्ट्रीय कसोटी अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर अजिंक्य रहाणे आल्या पावली माघारी परतला, तर करुण नायर धावचीत होऊन अवघ्या चार धावांवर तंबूत दाखल झाला. त्यामुळे भारतीय संघाची अवस्था ५ बाद १५६ अशी केविलवाणी झाली होती. विराट कोहलीने कर्णधारी खेळी करत अर्धशतकी खेळी साकारली. पण तोही बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर ६२ धावांवर यष्टीरक्षक बेअरस्टोकरवी झेलबाद झाला. संघाचे आश्वासक शिलेदार माघारी परतल्यामुळे भारतीय संघांवर संकट ओढावणार असे चित्र असताना अश्विन भारतीय संघासाठी संकट समयी पुन्हा एकदा धावून आला. अश्विनने मैदानात टीच्चून फलंदाजी करत रवींद्र जडेजाच्या साथीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला आणि आपले ९ वे आंतरराष्ट्रीय कसोटी अर्धशतक पूर्ण केले.

India vs England: दिवसभरातील अपडेट्स 

Live Updates
16:31 (IST) 28 Nov 2016
अश्विनच्या तीन विकेट्स
16:31 (IST) 28 Nov 2016
तिसऱया दिवसाचा खेळ संपला, इंग्लंड ४ बाद ७८ अशा बिकट स्थितीत
16:27 (IST) 28 Nov 2016
इंग्लंडची चौथी विकेट, बेन स्टोक्स ५ धावांवर बाद
16:26 (IST) 28 Nov 2016
भारतीय संघाला रिव्ह्यूमध्ये यश, बेन स्टोक्स बाद घोषीत
16:26 (IST) 28 Nov 2016
भारताकडून रिव्ह्यूची मागणी, निर्णय तिसऱया पंचांकडे
16:25 (IST) 28 Nov 2016
अश्विनच्या गोलंदाजीवर बेन स्टोक्स पायचीत झाल्याची अपील, पण पंचांचा नकार
16:24 (IST) 28 Nov 2016
गोलंदाजीत पुन्हा बदल, अश्विनला गोलंदाजीसाठी पाचारण
16:22 (IST) 28 Nov 2016
३६ षटकांच्या अखेरीस इंग्लंड ७८/३
16:21 (IST) 28 Nov 2016
जयंत यादवच्या षटकात केवळ १ धाव
16:20 (IST) 28 Nov 2016
दुसऱया चेंडूवर बेन स्टोक्सचा फटका, पण धाव नाही
16:19 (IST) 28 Nov 2016
जयंत यादवच्या पहिल्या चेंडूवर रुटकडून एक धाव
16:18 (IST) 28 Nov 2016
३५ षटकांच्या अखेरीस इंग्लंड ३ बाद ७७ धावा
16:18 (IST) 28 Nov 2016
पाचव्या चेंडूवर जो रुटकडून एक धाव
16:18 (IST) 28 Nov 2016
चौथ्या चेंडूवरही धाव नाही
16:17 (IST) 28 Nov 2016
जडेजाचा तिसरा चेंडू देखील निर्धाव
16:17 (IST) 28 Nov 2016
जडेजाकडून पहिले दोन चेंडू निर्धाव
16:17 (IST) 28 Nov 2016
गोलंदाजीत बदल, शमीऐवजी जडेजाला गोलंदाजीसाठी पाचारण
16:16 (IST) 28 Nov 2016
जयंत यादवच्या षटकात केवळ १ धाव, ३४ षटकांच्या अखेरीस इंग्लंड ३ बाद ७६ धावा
16:15 (IST) 28 Nov 2016
जयंत यादवच्या चार चेंडूंमध्ये केवळ एक धाव
16:12 (IST) 28 Nov 2016
३३ षटकांच्या अखेरीस इंग्लंड ३ बाद ७५ धावा
16:12 (IST) 28 Nov 2016
तिसऱया दिवसाचा खेळ संपण्यासाठी केवळ दोन षटकांचा खेळ शिल्लक
16:07 (IST) 28 Nov 2016
३२ षटकांच्या अखेरीस इंग्लंड ३ बाद ७१ धावा
16:06 (IST) 28 Nov 2016
पार्थिव पटेलचा उत्कृष्ट झेल
16:06 (IST) 28 Nov 2016
जयंत यादवच्या गोलंदाजीवर बेअरस्टो यष्टीरक्षक पार्थिव पटेलकरवी झेलबाद
16:05 (IST) 28 Nov 2016
भारतीय संघाला तिसरे यश, जयंत यादवने बेअरस्टोला धाडले माघारी
16:03 (IST) 28 Nov 2016
चेंडू जो रुटच्या पायाला लागून झेल टीपल्याचे निष्पन्न
16:03 (IST) 28 Nov 2016
शमीच्या गोलंदाजीवर जो रुट बाद झाल्याची भारतीय संघाची अपील, पण पंचांचा नकार
15:56 (IST) 28 Nov 2016
मोहम्मद शमीच्या षटकात केवळ एक धाव, २९ षटकांच्या अखेरीस इंग्लंड २ बाद ६९ धावा
15:54 (IST) 28 Nov 2016
सुरूवातीचे दोन धक्के बसल्यानंतर जो रुट आणि बेअरस्टोकडून संयमी फलंदाजी, संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न
15:52 (IST) 28 Nov 2016
अश्विनच्या फिरकीवर मोठा फटका मारण्याच्या नादात मोईन अली बाद झाला
15:18 (IST) 28 Nov 2016
भारताला दुसरे यश, मोईन अली पाच धावांवर बाद
14:59 (IST) 28 Nov 2016
अश्विनची अफलातून फिरकी, अलिस्टर कूक क्लीनबोल्ड
14:53 (IST) 28 Nov 2016
१२ षटकांच्या अखेरीस इंग्लंड बिनबाद २५ धावा
14:47 (IST) 28 Nov 2016
रिव्ह्यूमध्ये अलिस्टूर कूक नाबाद असल्याचे निष्पन्न, इंग्लंडचा रिव्ह्यूमध्ये यश
14:46 (IST) 28 Nov 2016
इंग्लंडकडून रिव्ह्यूची मागणी
14:46 (IST) 28 Nov 2016
जडेजानंतर आता अश्विनच्या फिरकीवर जडेजा पायचीत झाल्याची अपील, पंचांकडून कूक बाद घोषीत
14:44 (IST) 28 Nov 2016
भारतीय संघाचा रिव्ह्यू वाया, रिव्ह्यूमध्ये कूक नाबाद असल्याचे निष्पन्न
14:41 (IST) 28 Nov 2016
निर्णय तिसऱया पंचांकडे
14:41 (IST) 28 Nov 2016
भारताकडून रिव्ह्यूची मागणी
14:41 (IST) 28 Nov 2016
जडेजाच्या गोलंदाजीवर अलिस्टर कूक पायचीत झाल्याची अपील, पण पंचांचा नकार
14:30 (IST) 28 Nov 2016
जो रुटचा खणखणीत चौकार, इंग्लंड बिनबाद १८ धावा
14:25 (IST) 28 Nov 2016
अश्विनकडून दमदार गोलंदाजी, निर्धाव षटक
14:23 (IST) 28 Nov 2016
गोलंदाजीत बदल, आर.अश्विनला गोलंदाजीसाठी पाचारण
14:22 (IST) 28 Nov 2016
मोहम्मद शमीच्या षटकात दोन धावा, इंग्लंड बिनबाद ९ धावा
14:20 (IST) 28 Nov 2016
तिसऱया चेंडूवर एक धाव
14:19 (IST) 28 Nov 2016
मोहम्मद शमीकडून दोन चेंडू निर्धाव
14:17 (IST) 28 Nov 2016
उमेश यादवच्या षटकात सात धावा
14:15 (IST) 28 Nov 2016
अलिस्टर कूकचा शानदार कव्हर ड्राईव्ह चौकार
14:13 (IST) 28 Nov 2016
जो रुटने इंग्लंडचे खाते उघडले, कव्हर्सवर एक धाव
14:13 (IST) 28 Nov 2016
मोहम्मद शमीकडून निर्धाव षटक, इंग्लंडचे अजूनही खाते उघडलेले नाही