कानपूर कसोटीच्या चौथ्या दिवसाअखेरीस न्यूझीलंडला चार फलंदाजांच्या मोबदल्यात केवळ ९३ धावा करता आल्या आहेत. भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी ४३९ धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना किवींचे चार फलंदाज स्वस्तात बाद करण्यात भारतीय फिरकीपटूंना यश आल्याने सामन्यावर भारतीय संघाने चांगली पकड निर्माण केली आहे. त्यामुळे सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी सहा विकेट्सची आवश्यकता आहे.

आर. अश्विनने न्यूझीलंडच्या तीन फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडले, तर उमेश यादवने सीमा रेषेवरून दिलेल्या अचूक थ्रोवर रॉस टेलर धावचीत झाला. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ल्यूक राँची ३८ धावांवर , तर मिचेल सँटनर ८ धावांवर खेळत होते. तत्पूर्वी, भारतीय संघाने आपला दुसरा डाव  ५ बाद ३७७ धावांवर घोषित करून किवींसमोर ४३९ धावांचे आव्हान उभे केले. रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजाच्या तुफानी खेळीने भारताला चौथ्या दिवशी चहापानापूर्वीच ३७५ चा पल्ला ओलांडता आला. चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय या दोघांनी अर्धशतकी खेळी करत दुस-या डावात भारताला दमदार सुरुवात केली होती. मात्र विराट कोहली १८ धावांवर माघारी परतल्याने भारताच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले. पण त्यानंतर अजिंक्य रहाणे संयमी ४० धावांची खेळी करत रोहित शर्माच्या साथीने भारताचा डाव पुढे नेला. अजिंक्य रहाणेने ८१ चेंडूत ४० धावा केले. यात चार चौकारांचा समावेश आहे. अजिंक्य रहाणे बाद झाल्यावर रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा या जोडीवर भारताची मदार होती. गेल्या काही सामन्यात सूर सापडत नसल्याने टीकेचे लक्ष्य ठरलेल्या रोहित शर्माला शेवटी आज सूर गवसला. रोहित शर्माने रविंद्र जडेजाच्या साथीने किवी गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. या दोघांनीही चौकार आणि षटकारांची बरसात केली. रोहित शर्माने ९३ चेंडूत ६८ धावा केल्या. यामध्ये ८ चौकारांचा समावेश होता. तर रविंद्र जडेजाने ५८ चेंडूत ५० धावा केल्या. यात दोन चौकार आणि तीन षटकाराचा समावेश आहे. भारताने ५ विकेटच्या मोबदल्यात ३७७ धावा केल्या असताना विराट कोहलीने भारताचा डाव घोषित केला.  न्यूझीलंडतर्फे सँटनर आणि इश सोधी या दोघांनी प्रभावी मारा केला. या दोघांनी प्रत्येक दोन गडींना बाद केले. तर मार्क क्रेगने एक विकेट घेतली.

न्यूझीलंडसमोर दुस-या डावात ४३९ धावांचे अशक्यप्राय लक्ष्य किवींसमोर असल्याने फिरकीला साथ देणारी खेळपट्टी आणि आर अश्विन, रविंद्र जडेजाची भंबेरी उडवणारी गोलंदाजी अशा परिस्थितीत न्यूझीलंडसाठी ही धावसंख्या आव्हानात्मकच ठरणार आहे.

India vs New Zealand : दिवसभरातील अपटेड्स –

Live Updates
16:56 (IST) 25 Sep 2016
भारतीय संघ विजयापासून सहा विकेट्स दूर
16:56 (IST) 25 Sep 2016
चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या ४ बाद ९३ धावा. (राँची- ३८ , सँटनर- ८)
16:55 (IST) 25 Sep 2016
अखेरच्या षटक देखील निर्धाव, आजच्या दिवसाचा खेळ संपला
16:54 (IST) 25 Sep 2016
पाचवा चेंडू देखील निर्धाव
16:54 (IST) 25 Sep 2016
चौथा चेंडू पॉईंटच्या दिशेने, पण धाव नाही
16:54 (IST) 25 Sep 2016
तिसरा चेंडू देखील राँचीने सोडला
16:53 (IST) 25 Sep 2016
जडेजाच्या पहिल्या दोन चेंडूवर एकही धाव नाही
16:53 (IST) 25 Sep 2016
आजच्या दिवसच्या अखेरच्या षटकाला सुरूवात, जडेजा करतोय गोलंदाजी
16:53 (IST) 25 Sep 2016
अश्विनच्या षटकात केवळ २ धाव, न्यूझीलंड ४ बाद ९३
16:51 (IST) 25 Sep 2016
जडेजाकडून आणखी एक निर्धाव षटक, न्यूझीलंड ४ बाद ९२
16:48 (IST) 25 Sep 2016
३४ व्या षटकात दोन धावा, न्यूझीलंड ४ बाद ९२ धावा
16:43 (IST) 25 Sep 2016
३२ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंडची धावसंख्या ९०/४ (राँची- ३६, सँटनर- ७)
16:42 (IST) 25 Sep 2016
राँचीचा पॉईंटच्या दिशेने चौकार, न्यूझीलंड ४ बाद ९०
16:39 (IST) 25 Sep 2016
रवींद्र जडेजाकडून निर्धाव षटक, न्यूझीलंड ४ बाद ८५ धावा
16:38 (IST) 25 Sep 2016
चौथ्या दिवसाच्या अखेरच्या ७ षटकांचा खेळ शिल्लक
16:37 (IST) 25 Sep 2016
तीस षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड ४ बाद ८५ धावा. विजयासाठी आणखी ३४९ धावांची गरज. (राँची- ३२ , सँटनर- ६ )
16:30 (IST) 25 Sep 2016
भारतीय गोलंदाजांकडून किवींच्या धावसंख्येला लगाम
16:29 (IST) 25 Sep 2016
मोहम्मद शमीकडून निर्धाव षटक
16:18 (IST) 25 Sep 2016
२६ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड ४ बाद ७५ धावा. (राँची- २५ , सँटनर- ५)
16:16 (IST) 25 Sep 2016
राँचीचा अश्विनला उत्तुंग षटकार, न्यूझीलंड ४ बाद ६८ धावा
16:06 (IST) 25 Sep 2016
न्यूझीलंड ४ बाद ५९ धावा
16:03 (IST) 25 Sep 2016
दोन धावा घेण्याच्या नादात रॉस टेलरने गमावली विकेट, उमेश यादवचा अचूक त्रिफळावेध
16:01 (IST) 25 Sep 2016
२२ व्या षटकात रॉस टेलर धावचीत बाद, भारतीय संघाला चौथे यश
16:01 (IST) 25 Sep 2016
अश्विनने घेतली विल्यमसनची (२५) विकेट
16:00 (IST) 25 Sep 2016
न्यूझीलंडला तिसरा धक्का, कर्णधार विल्यमसन बाद
15:40 (IST) 25 Sep 2016
सोळा षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड २ बाद ३७ धावा.
15:35 (IST) 25 Sep 2016
क्षेत्ररक्षणादरम्यान चेतेश्वर पुजाराच्या पायाला चेंडू लागल्याने दुखापत
15:32 (IST) 25 Sep 2016
१५ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड २ बाद ३३ धावा
15:27 (IST) 25 Sep 2016
केन विल्यमसनच्या स्विपवर झेलची संधी, उमेश यादवला झेल टीपण्यात अपयश
15:24 (IST) 25 Sep 2016
रॉस टेलरचा बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चौकार, न्यूझीलंड २२/२
15:20 (IST) 25 Sep 2016
अश्विनच्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा विल्यमसन पायचीत बाद होण्यासाठीची अपील, पण पंचांचा नकार
15:17 (IST) 25 Sep 2016
११ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड १६/२
15:15 (IST) 25 Sep 2016
भारतीय संघ मजबूत स्थितीत, न्यूझीलंड २ बाद १५ धावा
14:58 (IST) 25 Sep 2016
सहा षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड २ बाद ४ धावा
14:57 (IST) 25 Sep 2016
अश्विनच्या फिरकीने न्यूझीलंडचे फलंदाज हैराण
14:54 (IST) 25 Sep 2016
केवळ ३ धावांमध्ये पहिले दोन फलंदाज बाद झाल्याने न्यूझीलंडचा संघ दबावाखाली
14:51 (IST) 25 Sep 2016
भारतीय संघाला विजयासाठी आता आठ विकेट्सची गरज
14:50 (IST) 25 Sep 2016
अश्विनच्या एकाच षटकात दोन विकेट्स
14:49 (IST) 25 Sep 2016
अश्विनच्या फिरकीवर टॉम लॅथम पायचीत, लॅथम केवळ दोन धावा करून माघारी
14:49 (IST) 25 Sep 2016
अश्विनची फिरकी जादू, न्यूझीलंडला दुसरा धक्का
14:46 (IST) 25 Sep 2016
मार्टिन गप्तील शून्यावर बाद
14:46 (IST) 25 Sep 2016
भारतीय संघाला पहिले यश, अश्विनने घेतली गप्तीलची विकेट
14:42 (IST) 25 Sep 2016
मोहम्मद शमी टाकतोय, तिसरे षटक
14:36 (IST) 25 Sep 2016
दुसरे षटक टाकतोय आर.अश्विन
14:35 (IST) 25 Sep 2016
पहिल्या षटकात १ धाव
14:35 (IST) 25 Sep 2016
न्यूझीलंडच्या डावाला सुरूवात
14:13 (IST) 25 Sep 2016
भारताचा दुसरा डाव ३७७ धावांवर घोषित, न्यूझीलंडसमोर विजयासाठी ४३४ धावांचे लक्ष्य, रोहित शर्माच्या नाबाद ६८ धावा, रविंद्र जडेजाच्या नाबाद नाबाद ५० धावा.
13:57 (IST) 25 Sep 2016
रविंद्र जडेजाची तुफानी फटकेबाजी, एकाच षटकात ठोकले दोन षटकार, भारत ५ बाद ३६५
13:54 (IST) 25 Sep 2016
भारताने ३५० चा पल्ला गाठला, भारत ५ बाद ३५०, भारताकडे ४०६ धावांची आघाडी.