News Flash

India vs New Zealand, 4th ODI: धोनीच्या रांचीत भारतीय संघाचा पराभव, किवींनी मालिकेत साधली २-२ अशी बरोबरी

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे लाइव्ह अपडेट्स

Live Cricket Score, India vs New Zealand, 4th ODI: India take on New Zealand in Ranchi on Wednesday. (Source: AP)

घरच्या मैदानात मालिका विजयाचा मानाचा तुरा शिरपेचात खोवण्याची सुवर्णसंधी भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने गमावली आहे. रांची येथे झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला १९ धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. न्यूझीलंडच्या २६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱया भारतीय संघाचा डाव २४१ धावांत संपुष्टात आला. भारतीय संघाकडून अजिंक्य रहाणे याने सर्वाधिक ५७ धावांची खेळी साकारली, तर विराट कोहलीने ४५ धावा केल्या. किवींकडून टीम साऊदीने तीन विकेट्स घेतल्या, तर ट्रेंट बोल्ट आणि नीशाम यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. न्यूझीलंडने या विजयासाठी पाच सामन्यांच्या मालिकेत आता २-२ अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे पाचवा आणि अखेरचा सामना निर्णायक ठरणार आहे.

न्यूझीलंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करत भारतीय संघासमोर विजयासाठी २६१ धावांचे आव्हान ठेवले होते. किवींच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरूवात तशी चांगली झाली होती. रोहित आणि रहाणे संयमी फलंदाजी करत असताना रोहितने ११ धावांवर आपली विकेट टाकली. त्यानंतर रहाणे आणि कोहली यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी दुसऱया विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी रचली. रहाणे याने आपल्या नजाकती फटक्यांनी स्टेडियमच्या चारही बाजूंना दमदार फटके मारले आणि आपले १६ वे अर्धशतक पूर्ण केले. भारतीय संघ सामन्यावर पकड निर्माण करत असतानाच विराट कोहली (४५) धावांवर झेलबाद झाला. ईश सोधीने कोहलीची विकेट घेतली. मग रहाणे देखील ५७ धावांवर पायचीत होऊन माघारी परतला. धोनी यावेळी मॅच विनिंग खेळी साकारण्यात अपयशी ठरला. धोनीने तब्बल ३१ चेंडूत केवळ ११ धावा केल्या. धोनी क्लीनबोल्ड होऊन माघारी परतला. त्यानंतर भारतीय संघाचा डाव गडगडला. अक्षर पटेल याने ३८ धावांचे योगदान देऊन सामना जिवंत ठेवला होता. पण ठराविक अंतराने भारताचे एकामागोमाग एक विकेट्स पडत गेले आणि भारतीय संघाला १९ धावांनी पराभव पत्करावा लागला.

तत्पूर्वी, सामन्याचा नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय स्विकारली होता. न्यूझीलंडच्या डावाची सुरूवात दमदार झाली होती. मार्टीन गप्तील आणि टॉम लॅथम यांनी पहिल्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी रचली. अक्षर पटेल याने सामन्याच्या १६ व्या षटकात पहिले यश मिळवून दिले. लॅथम ३९ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर विल्यमसन आणि गप्तील यांनी संयमी खेळी करत संघाचा धावफलक हलता ठेवला. न्यूझीलंडकडून मार्टीन गप्तील याने यावेळी सर्वाधिक ७२ धावांची खेळी साकारली. तर केन विल्यमसन याने ४१ धावा केल्या. भारतीय संघाकडून अमित मिश्रा याने दोन विकेट् घेतल्या, तर उमेश यादव, धवल कुलकर्णी, हार्दीक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

सामन्याच्या २६  व्या षटकात हार्दीक पंड्या पुन्हा एकदा भारतीय संघासाठी तारणहार ठरला. पंड्याने मार्टीन गप्तील याला ७२ धावांवर धोनीकरवी झेलबाद केले. यानंतर अमित मिश्रा याने आपली फिरकी जादू दाखवत किवींच्या दोन फलंदाजांना माघारी धाडले. किवींच्या चार विकेट पडल्यानंतर भारतीय संघाने सामन्यात पुनरागमन केले. अखेरच्या षटकांत भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या धावसंख्येला चांगला लगाम घातला. ५० षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड संघाला २६० धावांवर समाधान मानावे लागले.

 

India vs New Zealand: दिवसभरातील अपडेट्स

मोरेश्वर येरम October 26, 20161:10 pm

न्यूझीलंडने एकदिवसीय मालिकेत पहिल्यांदा नाणेफेक जिंकला

मोरेश्वर येरम October 26, 20161:10 pm

नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

मोरेश्वर येरम October 26, 20161:10 pm

भारतीय संघात एक बदल, जसप्रीत बुमराहच्या जागी धवल कुलकर्णीचा संघात समावेश

मोरेश्वर येरम October 26, 20161:13 pm

मोरेश्वर येरम October 26, 20161:13 pm

भारतीय संघ-

मोरेश्वर येरम October 26, 20161:16 pm

न्यूझीलंडच्या संघात तीन फिरकीपटूंचा समावेश

मोरेश्वर येरम October 26, 20161:17 pm

मोरेश्वर येरम October 26, 20161:19 pm


मोरेश्वर येरम October 26, 20161:31 pm

न्यूझीलंडचे सलामीवीर फलंदाजीसाठी मैदानात दाखल

मोरेश्वर येरम October 26, 20161:31 pm

उमेश यादव टाकतोय पहिले षटक

मोरेश्वर येरम October 26, 20161:32 pm

गप्तील स्ट्राईकवर, पहिला चेंडू निर्धाव

मोरेश्वर येरम October 26, 20161:32 pm

दुसरा चेंडू देखील निर्धाव

मोरेश्वर येरम October 26, 20161:33 pm

तिसरा चेंडू बाऊन्सर, निर्धाव

मोरेश्वर येरम October 26, 20161:34 pm

उमेश यादवकडून पाचवा चेंडू देखील निर्धाव

मोरेश्वर येरम October 26, 20161:34 pm

उमेश यादवकडून निर्धाव षटक

मोरेश्वर येरम October 26, 20161:36 pm

दुसरे षटक टाकतोय धवल कुलकर्णी

मोरेश्वर येरम October 26, 20161:36 pm

धवल कुलकर्णीच्या पहिल्या चेंडूवर तीन धावा

मोरेश्वर येरम October 26, 20161:37 pm

मार्टिन गप्तीलचा पॉईंटच्यावरून चौकार, न्यूझीलंड बिनबाद ७ धावा

मोरेश्वर येरम October 26, 20161:38 pm

गप्तीलचा लाँग ऑनच्या दिशेने चौकार

मोरेश्वर येरम October 26, 20161:40 pm

कव्हर्सच्या दिशेने गप्तीलचा चौकार

मोरेश्वर येरम October 26, 20161:43 pm

धवल कुलकर्णीच्या पहिल्याच षटकात १६ धावा

मोरेश्वर येरम October 26, 20161:44 pm

उमेश यादवच्या तिसऱया षटकात ८ धावा, न्यूझीलंड बिनबाद २४ धावा

मोरेश्वर येरम October 26, 20161:45 pm

टॉम लॅथमचा शानदार कव्हर ड्राईव्ह चौकार

मोरेश्वर येरम October 26, 20161:47 pm

लॅथमकडून धवल कुलकर्णीच्या गोलंदाजीवर आणखी एक कव्हर ड्राईव्ह चौकार, न्यूझीलंड बिनबाद ३२ धावा

मोरेश्वर येरम October 26, 20161:48 pm

चार षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड बिनबाद ३२ धावा. (गप्तील- २१ , लॅथम- ११ )

मोरेश्वर येरम October 26, 20161:49 pm

उमेश यादवच्या पहिल्याच चेंडूवर गप्तीलचा लाँग ऑफच्या दिशेने चौकार

मोरेश्वर येरम October 26, 20161:52 pm

टॉम लॅथमचा फाईन लेगच्या दिशेने फटका, दोन धावा

मोरेश्वर येरम October 26, 20161:53 pm

पाच षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड बिनबाद ४२ धावा. (गप्तील- २७ , लॅथम- १२ )

मोरेश्वर येरम October 26, 20161:58 pm

सहाव्या षटकात केवळ चार धावा, न्यूझीलंड बिनबाद ४६ धावा

मोरेश्वर येरम October 26, 20161:58 pm

टॉम लॅथमला उमेश यादवकडून राऊंड द स्टम्प गोलंदाजी

मोरेश्वर येरम October 26, 20161:59 pm

मिड ऑनवर अक्षर पटेलचे सुरेख क्षेत्ररक्षण

मोरेश्वर येरम October 26, 20162:00 pm

मिड ऑनवर मार्टीन गप्तीलचा झेल टीपण्याची संधी अमित मिश्राने गमावली, झेल सुटला

मोरेश्वर येरम October 26, 20162:02 pm

सात षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड बिनबाद ४९ धावा. (गप्तील- ३० , लॅथम- १५ )

मोरेश्वर येरम October 26, 20162:06 pm

न्यूझीलंडच्या सलामीवीरांची अर्धशतकी भागीदारी

मोरेश्वर येरम October 26, 20162:07 pm

८ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड बिनबाद ५८ धावा. (गप्तील- ३१ , लॅथम- २४ )

मोरेश्वर येरम October 26, 20162:11 pm

गप्तीलचा दुसऱया स्लिपच्यावरून फटका, थर्ड मॅनच्या दिशेने चौकार

मोरेश्वर येरम October 26, 20162:11 pm

गप्तीलकडून फाईन लेगच्या दिशेने चौकार, न्यूझीलंड बिनबाद ६८ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20162:12 pm

हार्दीक पंड्याच्या पहिल्याच चेंडूवर टॉम लॅथमचा स्ट्रेट ड्राईव्ह चौकार

मोरेश्वर येरम October 26, 20162:17 pm

मार्टीन गप्तीलचा कव्हर्सच्यावरून दमदार चौकार

मोरेश्वर येरम October 26, 20162:18 pm

दहा षटकांचा खेळ संपला तरीही भारताला यश नाही, न्यूझीलंड बिनबाद ८० धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20162:20 pm

भारतीय संघाकडून गोलंदाजीत बदल, अमित मिश्राला गोलंदाजीसाठी पाचारण

मोरेश्वर येरम October 26, 20162:22 pm

अमित मिश्राच्या षटकात केवळ दोन धावा, न्यूझीलंड बिनबाद ८२

मोरेश्वर येरम October 26, 20162:23 pm

अक्षर पटेल टाकतोय आपले पहिले षटक, पहिल्या चेंडूवर १ धाव

मोरेश्वर येरम October 26, 20162:25 pm

अक्षर पटेलच्या षटकात केवळ दोन धावा, न्यूझीलंड बिनबाद ८४ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20162:26 pm

१२ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड बिनबाद ८४ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20162:28 pm

१३ व्या षटकात तीन धावा, न्यूझीलंड बिनबाद ८७ धावा

मोरेश्वर येरम October 26, 20162:31 pm

भारतीय फिरकीपटूंकडून किवींच्या धावसंख्येला लगाम, १४ व्या षटकात तीन धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20162:35 pm

१५ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड बिनबाद ९४ धावा. (गप्तील- ४८ , लॅथम- ३९ )

मोरेश्वर येरम October 26, 20162:35 pm

भारतीय संघाला पहिले यश, टॉम लॅथम स्विप शॉट मारताना झेलबाद

मोरेश्वर येरम October 26, 20162:37 pm

अक्षर पटेलने घेतली विकेट, रहाणेने शॉर्ट बॅकवर्ड स्वेअर लेगवर टीपला झेल

मोरेश्वर येरम October 26, 20162:41 pm

गोलंदाजीत बदल, केदार जाधव टाकतोय षटक

मोरेश्वर येरम October 26, 20162:43 pm

मार्टीन गप्तीलचे अर्धशतक पूर्ण, न्यूझीलंड १ बाद ९८ धावा

मोरेश्वर येरम October 26, 20162:44 pm

केदार जाधवच्या षटकात केवळ दोन धावा, १७ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड १ बाद ९९ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20162:45 pm

केन विल्यमसनचा पॉईंटच्या दिशेने खणखणीत चौकार, न्यूझीलंडच्या धावसंख्येचे शतक

मोरेश्वर येरम October 26, 20162:49 pm

धोनीकडून केन विल्यमसनची स्टम्पिंग, निर्णय तिसऱया पंचांकडे

मोरेश्वर येरम October 26, 20162:50 pm

विल्यमसन नॉट आऊट असल्याचे निष्पन्न

मोरेश्वर येरम October 26, 20162:51 pm

१९ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड १ बाद ११२ धावा. (गप्तील- ५४ , विल्यमसन- ९ )

मोरेश्वर येरम October 26, 20162:57 pm

केदार जाधवकडून चांगली गोलंदाजी, २१ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड १ बाद ११७ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20163:00 pm

मार्टीन गप्तीलचा कव्हर्सच्यावरून चौकार, २२ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड १ बाद १२० धावा. (गप्तील- ६२ , विल्यमसन- १४ )

मोरेश्वर येरम October 26, 20163:03 pm

मार्टीन गप्तीचा झेल अमित मिश्राकडून सुटला, चौकार

मोरेश्वर येरम October 26, 20163:04 pm

२३ व्या षटकाच्या अखेरीस १ बाद १३० धावा. (गप्तील- ६७ , विल्यमसन- १७ )

मोरेश्वर येरम October 26, 20163:14 pm

२५ व्या षटकात भारतीय संघाला दुसरे यश, मार्टीन गप्तील ७२ धावांवर झेलबाद

मोरेश्वर येरम October 26, 20163:16 pm

हार्दीक पंड्याने मिळवून दिले भारतीय संघाला दुसरे यश, न्यूझीलंड २ बाद १३८

मोरेश्वर येरम October 26, 20163:21 pm

केदार जाधवकडून आणखी एक सुंदर षटक, केवळ ३ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20163:22 pm

केदार जाधवने आतापर्यंत ६ षटकं टाकली असून केवळ १७ धावा त्याने दिल्या आहेत.

मोरेश्वर येरम October 26, 20163:24 pm

रॉस टेलरकडून स्ट्रेट ड्राईव्ह चौकार, न्यूझीलंड २ बाद १४६ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20163:27 pm

२८ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड २ बाद १४९ धावा. (विल्यमसन- १७ , टेलर- ८ )

मोरेश्वर येरम October 26, 20163:29 pm

केन विल्यमसनचा केदार जाधवचा शानदार चौकार, न्यूझीलंड २ बाद १५३ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20163:31 pm

२९ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड २ बाद १५६ धावा. (विल्यमसन- २४ , टेलर- ९)

मोरेश्वर येरम October 26, 20163:40 pm

३० व्या षटकात ५ धावा, न्यूझीलंड २ बाद १६१

मोरेश्वर येरम October 26, 20163:43 pm

विल्यमसनचा अमित मिश्राच्या फिरकीवर डीप मिड विकेटच्या दिशेने चौकार, न्यूझीलंड २ बाद १७० धावा

मोरेश्वर येरम October 26, 20163:48 pm

विल्यमसनचा कव्हर्सच्या दिशेने इन साईड ऑऊट शॉट, वन बाऊन्स चौकार

मोरेश्वर येरम October 26, 20164:04 pm

भारतीय संघाला तिसरे यश मिळाले, अमित मिश्राने घेतली विल्यसमनची विकेट

मोरेश्वर येरम October 26, 20164:05 pm

मिश्राच्या फिरकीवर विल्यमसन ४१ धावांवर धोनीकरवी झेलबाद

मोरेश्वर येरम October 26, 20164:06 pm

जेम्स नीशामचा दमदार चौकार

मोरेश्वर येरम October 26, 20164:10 pm

अमित मिश्राने मिळवून दिले आणखी एक यश, जेम्स नीशाम झेलबाद

मोरेश्वर येरम October 26, 20164:10 pm

विराट कोहलीने जेम्स नीशामचा मिड विकेटला टीपला अफलातून झेल

मोरेश्वर येरम October 26, 20164:12 pm

३९ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड ४ बाद १९५ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20164:15 pm

४० षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड ४ बाद १९९ धावा. (टेलर- २३, वॉल्टिंग-३ )

मोरेश्वर येरम October 26, 20164:17 pm

न्यूझीलंडच्या धावसंख्येने २०० चा आकडा गाठला

मोरेश्वर येरम October 26, 20164:18 pm

न्यूझीलंडला शेवटच्या ५० धावा करण्यासाठी तब्बल ७३ चेंडू खेळावे लागले

मोरेश्वर येरम October 26, 20164:18 pm

गेल्या दहा षटकांत भारताकडून उत्तम गोलंदाजी, किवींच्या धावसंख्येला लगाम

मोरेश्वर येरम October 26, 20164:19 pm

४१ व्या षटकात केवळ १ धाव, उमेश यादवकडून प्रभावी मारा

मोरेश्वर येरम October 26, 20164:20 pm

४१ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड ४ बाद २०१ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20164:22 pm

सामन्याचे ४२ वे षटक टाकतोय, अमित मिश्रा

मोरेश्वर येरम October 26, 20164:23 pm

अमित मिश्राच्या षटकात केवळ चार धावा, ४२ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड ४ बाद २०५ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20164:24 pm

४३ व्या षटकात उमेश यादवच्या पहिल्याच चेंडूवर चौकार, न्यूझीलंड ४ बाद २०९ धावा

मोरेश्वर येरम October 26, 20164:24 pm

दुसऱया चेंडूवर स्ट्रेट ड्राईव्ह फटका, एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20164:25 pm

तिसऱया चेंडूवर थर्ड मॅनच्या दिशेने फटका, एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20164:26 pm

चौथ्या चेंडूवर स्वेअर लेगच्या दिशेने एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20164:26 pm

पाचव्या चेंडूवर रॉस टेलरकडून स्वेअर लेगला एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20164:27 pm

४३ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड ४ बाद २१४ धावा. (टेलर- २९ , वॉल्टिंग- १२ )

मोरेश्वर येरम October 26, 20164:28 pm

४४ वे षटक टाकतोय अमित मिश्रा, पहिल्या चेंडूवर एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20164:28 pm

दुसऱया चेंडूवर देखील पॉईंटच्या दिशेने एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20164:29 pm

तिसऱया चेंडूवर रॉस टेलरचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अयशस्वी, डॉट बॉल

मोरेश्वर येरम October 26, 20164:29 pm

चौथ्या चेंडूवर टेलर पायचीत झाल्याची अपील, पण पंचांचा नकार

मोरेश्वर येरम October 26, 20164:29 pm

पाचव्या चेंडूवर वॉल्टिंगकडून एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20164:30 pm

४४ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड ४ बाद २१७ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20164:31 pm

४५ वे षटक टाकतोय धवल कुलकर्णी, पहिला चेंडू निर्धाव

मोरेश्वर येरम October 26, 20164:32 pm

दुसरा चेंडू देखील निर्धाव

मोरेश्वर येरम October 26, 20164:33 pm

भारतीय संघाला पाचवे यश, मोठा मारण्याच्या नादात वॉल्टिंग झेलबाद

मोरेश्वर येरम October 26, 20164:34 pm

धवल कुलकर्णीने घेतली विकेट, डीप स्वेअर लेगवर वॉल्टिंग झेलबाद

मोरेश्वर येरम October 26, 20164:36 pm

धवल कुलकर्णीच्या षटकात केवळ तीन धावा आणि एक विकेट

मोरेश्वर येरम October 26, 20164:36 pm

४५ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड ५ बाद २२० धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20164:38 pm

४६ व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंमध्ये दोन धावा

मोरेश्वर येरम October 26, 20164:40 pm

तिसऱया चेंडूवर दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात धोनीकडून अफलातून स्टम्पिंग

मोरेश्वर येरम October 26, 20164:42 pm

४६ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड ६ बाद २२७ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20164:46 pm

४७ व्या षटकात न्यूझीलंडकडून चांगली फटकेबाजी, सँटनरचा स्वेअर लेगला चौकार

मोरेश्वर येरम October 26, 20164:47 pm

४७ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड ६ बाद २३८ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20164:48 pm

४८ व्या षटकांच्या पहिल्या चेंडूवर एक धाव, उमेश यादव टाकतोय षटक

मोरेश्वर येरम October 26, 20164:49 pm

दुसऱया चेंडूवर एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20164:50 pm

तिसऱया चेंडूवर देखील एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20164:50 pm

चौथ्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हर्सवर एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20164:51 pm

पाचवा चेंडू निर्धाव

मोरेश्वर येरम October 26, 20164:51 pm

४८ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर विकेट, न्यूझीलंड ७ बाद २४२ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20164:53 pm

अँटॉन डेव्हकिच मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद

मोरेश्वर येरम October 26, 20164:54 pm

धवल कुलकर्णी टाकतोय ४९ वे षटक, पहिला चेंडू निर्धाव

मोरेश्वर येरम October 26, 20164:54 pm

दुसऱया चेंडूवर एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20164:55 pm

तिसऱया चेंडूवर थर्ड मॅनच्या दिशेने एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20164:55 pm

चौथा चेंडू वाईड

मोरेश्वर येरम October 26, 20164:56 pm

शेवटच्या ९ चेंडूंचा खेळ शिल्लक, न्यूझीलंड २८० चा आकडा गाठणार का?

मोरेश्वर येरम October 26, 20164:56 pm

चौथ्या चेंडूवर दोन धावा

मोरेश्वर येरम October 26, 20164:56 pm

पाचव्या चेंडूवर १ धाव

मोरेश्वर येरम October 26, 20164:57 pm

४९ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड ७ बाद २५० धावा. (सँटनर- १४, साऊदी- २)

मोरेश्वर येरम October 26, 20164:58 pm

शेवटचे षटक टाकतोय उमेश यादव, पहिल्या चेंडूवर एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20164:59 pm

दुसऱया चेंडूवर स्वेअर लेगच्या दिशेने एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20165:00 pm

तिसऱया चेंडूवर डीप स्वेअर लेगच्या दिशेने एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20165:00 pm

चौथ्या चेंडूवर पॉईंटच्या दिशेने एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20165:00 pm

उमेश यादवची उल्लेखनीय गोलंदाजी

मोरेश्वर येरम October 26, 20165:01 pm

पाचव्या चेंडूवर डीप स्वेअर लेगच्या दिशेने एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20165:02 pm

शेवटच्या चेंडूवर शानदार चौकार, न्यूझीलंड ५० षटकांच्या अखेरीस ७ बाद २६० धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20165:02 pm

न्यूझीलंडचे भारतीय संघासमोर विजयासाठी २६१ धावांचे आव्हान.

मोरेश्वर येरम October 26, 20165:47 pm

भारतीय संघाच्या डावाला सुरूवात, पहिल्या षटकात सहा धावा; रहाणेचा शानदार चौकार

मोरेश्वर येरम October 26, 20165:53 pm

दुसऱया षटकात एकही धाव नाही, भारत बिनबाद ६ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20165:53 pm

टीम साऊदी टाकतोय तिसरे षटक, पहिले दोन चेंडू निर्धाव

मोरेश्वर येरम October 26, 20165:54 pm

तिसऱया चेंडूवर एक धाव, आता रोहित शर्मा स्ट्राईकवर

मोरेश्वर येरम October 26, 20165:55 pm

टीम साऊदीची उत्कृष्ट गोलंदाजी, रोहित थोडक्यात बचावला

मोरेश्वर येरम October 26, 20165:55 pm

रोहित शर्माचा फाईन लेगच्या दिशेने फटका, दोन धावा

मोरेश्वर येरम October 26, 20165:56 pm

रोहितकडून फाईन लेगच्या दिशेने पुन्हा एकदा फटका, पण यावेळी केवळ १ धाव

मोरेश्वर येरम October 26, 20165:57 pm

तीन षटकांच्या अखेरीस भारत बिनबाद १० धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20165:57 pm

रोहित शर्माचा ट्रेंट बोल्टला फाईन लेगच्या दिशेने फ्लिक, चौकार

मोरेश्वर येरम October 26, 20165:58 pm

रोहित शर्माचा ट्रेंट बोल्टला पॉईंटच्या दिशेने खणखणीत चौकार

मोरेश्वर येरम October 26, 20165:59 pm

मार्टीन गप्तीलकडून पॉईंटवर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, चौकार अडवला

मोरेश्वर येरम October 26, 20166:00 pm

रोहितकडून थर्ड मॅनच्या दिशेने एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20166:00 pm

चार षटकांच्या अखेरीस भारत बिनबाद १९ धावा. (रोहित – ११, रहाणे- ६)

मोरेश्वर येरम October 26, 20166:01 pm

भारतीय संघाला पहिला धक्का, टीम साऊदीच्या गोलंदाजीवर राहित शर्मा झेलबाद

मोरेश्वर येरम October 26, 20166:02 pm

टीम साऊदीच्या गोलंदाजीवर रोहित शर्माच्या बॅटला कट लागून झेल यष्टीरक्षकाने टीपला

मोरेश्वर येरम October 26, 20166:02 pm

रोहित शर्मा ११ धावा करून माघारी

मोरेश्वर येरम October 26, 20166:03 pm

रोहित बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानात

मोरेश्वर येरम October 26, 20166:04 pm

विराट कोहली रांचीचे स्टेडियम देखील गाजवणार का?

मोरेश्वर येरम October 26, 20166:04 pm

विराट कोहलीचा स्वेअर लेगला फटका, दोन धावा

मोरेश्वर येरम October 26, 20166:05 pm

मिड ऑनच्या दिशेने कोहलीचा फटका, एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20166:05 pm

पाचवे षटक न्यूझीलंडसाठी यशस्वी, एक विकेट आणि तीन धावा

मोरेश्वर येरम October 26, 20166:06 pm

५ षटकांच्या अखेरीस भारत १ बाद २१ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20166:07 pm

सहाव्या षटकात पहिल्या दोन चेंडूवर दोन धावा

मोरेश्वर येरम October 26, 20166:08 pm

अजिंक्य रहाणेचा डीप एक्स्ट्रा कव्हर्सच्या दिशेने खणखणीत चौकार, भारत १ बाद २७ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20166:10 pm

अजिंक्य रहाणेचा ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर षटकार, भारत १ बाद ३३ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20166:13 pm

सात षटकांच्या अखेरीस भारत १ बाद ३४ धावा. (रहाणे- १६ , कोहली- ५ )

मोरेश्वर येरम October 26, 20166:14 pm

विराट कोहलीचा थर्ड मॅनच्या दिशेने फटका, १ धाव

मोरेश्वर येरम October 26, 20166:15 pm

रहाणेचा स्वेअर लेगला फटका, एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20166:17 pm

विराट कोहलीचा डीप मिड विकेटच्या दिशेने नजाकती फटका, चौकार

मोरेश्वर येरम October 26, 20166:18 pm

८ षटकांच्या अखेरीस भारत १ बाद ४० धावा. (रहाणे- १७ , कोहली-१० )

मोरेश्वर येरम October 26, 20166:20 pm

अजिंक्य रहाणेचा शानदार स्वेअर ड्राईव्ह, भारत १ बाद ४४ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20166:21 pm

रहाणेचा स्वेअर लेगच्या दिशेने खणखणीत चौकार

मोरेश्वर येरम October 26, 20166:22 pm

९ षटकांच्या अखेरीस भारत १ बाद ४८ धावा. (रहाणे- २५ , कोहली- १० )

मोरेश्वर येरम October 26, 20166:23 pm

दहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कोहलीकडून एक धाव, रहाणे स्ट्राईकवर

मोरेश्वर येरम October 26, 20166:24 pm

रहाणेकडून दोन चेंडू निर्धाव

मोरेश्वर येरम October 26, 20166:27 pm

१० षटकांच्या अखेरीस भारत १ बाद ५० धावा. (रहाणे- २५ , कोहली- ११ )

मोरेश्वर येरम October 26, 20166:29 pm

फलंदाजी पावर प्ले संपला, पहिल्या ६० चेंडूंमध्ये भारताच्या ५० धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20166:29 pm

११ व्या षटकात न्यूझीलंडकडून फिरकीचा मारा

मोरेश्वर येरम October 26, 20166:29 pm

मिचेल सँटनर टाकतोय गोलंदाजी

मोरेश्वर येरम October 26, 20166:29 pm

सँटनरच्या पहिल्या तीन चेंडूंमध्ये एकही धाव नाही.

मोरेश्वर येरम October 26, 20166:30 pm

चौथा चेंडू देखील निर्धाव

मोरेश्वर येरम October 26, 20166:30 pm

मिचेल सँटनरकडून भारतीय धावसंख्येला लगाम घालण्याचा प्रयत्न

मोरेश्वर येरम October 26, 20166:30 pm

अखेरच्या चेंडूवर एक धाव, भारत १ बाद ५२ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20166:32 pm

नीशामकडून वाईड चेंडू

मोरेश्वर येरम October 26, 20166:34 pm

नीशामच्या चार चेंडूंमध्ये चार धावा

मोरेश्वर येरम October 26, 20166:34 pm

पाचव्या चेंडूवर देखील एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20166:36 pm

१२ षटकांच्या अखेरीस भारत १ बाद ५७ धावा. (रहाणे- २८ , कोहली- १४ )

मोरेश्वर येरम October 26, 20166:37 pm

सँटनरचा पहिला चेंडू निर्धाव, दुसऱया चेंडूवर एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20166:37 pm

तिसऱया चेंडूवर रहाणेकडून एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20166:38 pm

चौथा चेंडू कोहलीकडून निर्धाव

मोरेश्वर येरम October 26, 20166:38 pm

पाचव्या चेंडूवर कोहलीने घेतली एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20166:39 pm

१३ षटकांच्या अखेरीस भारत १ बाद ६० धावा. (रहाणे- २९, कोहली- १६)

मोरेश्वर येरम October 26, 20166:40 pm

गोलंदाजीत बदल, ईश सोधी टाकतोय आपले पहिले षटक

मोरेश्वर येरम October 26, 20166:40 pm

सोधीच्या पहिल्या दोन चेंडूंवर दोन धावा

मोरेश्वर येरम October 26, 20166:41 pm

कोहलीचा मिड ऑन आणि मिड विकेटच्यामधून दमदार फटका, दोन धावा

मोरेश्वर येरम October 26, 20166:42 pm

कोहलीचा थर्ड मॅनच्या दिशेने सुंदर फ्लिक, चौकार

मोरेश्वर येरम October 26, 20166:43 pm

१४ व्या षटकात ८ धावा, भारत १ बाद ६८ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20166:46 pm

विराट कोहलीचा सँटनरला लाँग ऑफवर षटकार

मोरेश्वर येरम October 26, 20166:46 pm

१५ व्या षटकात ८ धावा, भारत १ बाद ७६ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20166:49 pm

ईश सोधीच्या गोलंदाजीवर रहाणेच्या बॅटला कट लागून स्लिपमध्ये झेल टीपण्याची किवींची संधी हुकली

मोरेश्वर येरम October 26, 20166:51 pm

कव्हर्सच्या दिशेने रहाणेचा फटका, एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20166:53 pm

१७ षटकांच्या अखेरीस भारत १ बाद ८२ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20166:53 pm

रॉस टेलरकडून गचाळ क्षेत्ररक्षण, भारताने वसुल केल्या दोन धावा

मोरेश्वर येरम October 26, 20166:53 pm

कोहलीचा स्ट्रेट ड्राईव्ह, दोन धावा

मोरेश्वर येरम October 26, 20166:54 pm

कोहलीचा शानदार कव्हर ड्राईव्ह, भारत १ बाद ८८ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20166:55 pm

विराट कोहलीच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ७,५०० धावांचा टप्पा पूर्ण

मोरेश्वर येरम October 26, 20166:55 pm

१८ व्या षटकात ९ धावा, भारत १ बाद ९१ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20167:13 pm

भारतीय संघाला मोठा धक्का, कोहली ४५ धावांवर झेलबाद

मोरेश्वर येरम October 26, 20167:16 pm

कोहली बाद झाल्यानंतर आज पुन्हा एकदा चौथ्या स्थानावर धोनी फलंदाजीसाठी मैदानात

मोरेश्वर येरम October 26, 20167:18 pm

धोनीकडून अत्यंत सावध सुरूवात

मोरेश्वर येरम October 26, 20167:19 pm

२३ षटकांच्या अखेरीस भारत ३ बाद १०९ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20167:19 pm

मिचेल सँटनरकडून सीमा रेषेवर सुरेख क्षेत्ररक्षण

मोरेश्वर येरम October 26, 20167:21 pm

धोनीकडून डीप मिड विकेटवर फटका, एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20167:21 pm

२४ व्या षटकात सहा धावा, भारत २ बाद ११५ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20167:24 pm

अजिंक्य रहाणेचे दमदार अर्धशतक, भारत १ बाद १२१ धावा

मोरेश्वर येरम October 26, 20167:24 pm

रहाणेचे एकदिवसीय क्रिकेटमधील १६ वे अर्धशतक

मोरेश्वर येरम October 26, 20167:32 pm

२७ षटकांच्या अखेरीस भारत २ बाद १२६ धावा. (रहाणे- ५५ , धोनी- ८ )

मोरेश्वर येरम October 26, 20167:33 pm

रहाणेचे थर्ड मॅनच्या दिशेने सुंदर फ्लिक, दोन धावा

मोरेश्वर येरम October 26, 20167:33 pm

भारतीय संघाला तिसरा धक्का, अजिंक्य रहाणे ५७ धावांवर पायचीत

मोरेश्वर येरम October 26, 20167:36 pm

रहाणे बाद झाल्यानंतर मनिष पांडेऐवजी अक्षर पटेल फलंदाजीसाठी मैदानात दाखल

मोरेश्वर येरम October 26, 20167:38 pm

अक्षर पटेलकडून शानदार स्ट्रेट ड्राईव्ह चौकार

मोरेश्वर येरम October 26, 20167:39 pm

सँटनरच्या गोलंदाजीवर धोनी पायचीत झाल्याची अपील, पण पंचांचा नकार

मोरेश्वर येरम October 26, 20167:41 pm

२९ षटकांच्या अखेरीस भारत ३ बाद १३५ धावा. (धोनी- ११ , अक्षर- ४)

मोरेश्वर येरम October 26, 20167:42 pm

भारतीय संघाला विजयासाठी १२६ चेंडूत १२६ धावांची गरज

मोरेश्वर येरम October 26, 20167:43 pm

भारतीय संघाला चौथा धक्का, धोनी क्लीनबोल्ड

मोरेश्वर येरम October 26, 20167:44 pm

जीमी निशामच्या गोलंदाजीवर धोनी क्लीनबोल्ड, धोनी ३१ चेंडूत ११ धावा करून माघारी

मोरेश्वर येरम October 26, 20167:47 pm

३० षटकांच्या अखेरीस भारत ४ बाद १४० धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20167:50 pm

मनिष पांडे आणि अक्षर पटेल भारतीय संघाचे तारणहार ठरणार का? सर्वांचे लक्ष

मोरेश्वर येरम October 26, 20167:51 pm

३१ षटकांच्या अखेरीस भारत ४ बाद १४३ धावा. (अक्षर- ९ , पांडे- ३ )

मोरेश्वर येरम October 26, 20167:52 pm

मनिष पांडेचा डीप मिड विकेटच्या दिशेने शानदार चौकार

मोरेश्वर येरम October 26, 20167:53 pm

मनिष पांडेचा जिमी नीशामला स्ट्रेट ड्राईव्ह चौकार, भारत ४ बाद १५१ धावा

मोरेश्वर येरम October 26, 20167:54 pm

अक्षर पटेलचा शानदार फ्लिक, दोन धावा

मोरेश्वर येरम October 26, 20167:56 pm

मार्टीन गप्तीलचे पॉईंटवर सुरेख क्षेत्ररक्षण

मोरेश्वर येरम October 26, 20167:57 pm

मोठा फटका मारण्याच्या नादात मनिष पांडे मिड ऑनवर झेलबाद

मोरेश्वर येरम October 26, 20168:00 pm

मनिष पांडेपाठोपाठ केदार जाधव देखील तंबूत दाखल, भारतीय संघाला सहावा धक्का

मोरेश्वर येरम October 26, 20168:00 pm

टीम साऊदीने केदार जाधवला शून्यावर धाडले माघारी

मोरेश्वर येरम October 26, 20168:04 pm

केदार जाधव बाद झाल्यानंतर हार्दीक पंड्या फलंदाजीसाठी मैदानात दाखल

मोरेश्वर येरम October 26, 20168:06 pm

हार्दीक पंड्या थोडक्यात बचावला

मोरेश्वर येरम October 26, 20168:07 pm

३४ षटकांच्या अखेरीस भारत ६ बाद १५९ धावा. (अक्षर- १३ , पंड्या- ३)

मोरेश्वर येरम October 26, 20168:11 pm

न्यूझीलंडकडून गोलंदाजीत बदल, ट्रेंट बोल्ट टाकतोय षटक

मोरेश्वर येरम October 26, 20168:15 pm

३५ षटकांच्या अखेरीस भारत ६ बाद १६१ धावा. भारतीय संघाला विजयासाठी ९० चेंडूत १०० धावांची गरज

मोरेश्वर येरम October 26, 20168:18 pm

३६ व्या षटकात पहिल्या चार चेंडूंमध्ये ६ धावा

मोरेश्वर येरम October 26, 20168:18 pm

भारतीय संघाची सातवी विकेट, हार्दीक पंड्या झेलबाद

मोरेश्वर येरम October 26, 20168:23 pm

३७ षटकांच्या अखेरीस भारत ७ बाद १७१ धावा. (अक्षर- १७, मिश्रा-२)

मोरेश्वर येरम October 26, 20168:24 pm

भारतीय संघाला विजयासाठी ७८ चेंडूत ९० धावांची गरज

मोरेश्वर येरम October 26, 20168:28 pm

३८ व्या षटकात पाच धावा, भारत ७ बाद १७६ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20168:29 pm

भारतीय संघाला विजयासाठी ७२ चेंडूत ८५ धावांची गरज

मोरेश्वर येरम October 26, 20168:33 pm

३९ व्या षटकात केवळ तीन धावा, भारतीय संघाला विजयासाठी ८२ धावांची गरज

मोरेश्वर येरम October 26, 20168:35 pm

अक्षर पटेलचा शानदार स्वेअर ड्राईव्ह चौकार

मोरेश्वर येरम October 26, 20168:35 pm

अक्षरकडून थर्ड मॅनच्या दिशेने एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20168:37 pm

अमित मिश्राचा डीप मिड विकेटवर शानदार चौकार, भारत ७ बाद १८९ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20168:38 pm

भारतीय संघाला विजयासाठी ६० चेंडूत ७२ धावांची गरज

मोरेश्वर येरम October 26, 20168:39 pm

४१ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अमित मिश्राकडून १ धाव

मोरेश्वर येरम October 26, 20168:39 pm

दुसऱया चेंडूवर अक्षर पटेलकडून १ धाव

मोरेश्वर येरम October 26, 20168:40 pm

अमित मिश्राचा स्विप शॉट, दोन धावा

मोरेश्वर येरम October 26, 20168:42 pm

४१ षटकांच्या अखेरीस भारत ७ बाद १९५ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20168:42 pm

भारतीय संघाला विजयासाठी ५४ चेंडूत ६६ धावांची गरज

मोरेश्वर येरम October 26, 20168:43 pm

४२ व्या षटकात पहिल्या चेंडूवर एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20168:44 pm

दुसऱया चेंडूवर अमित मिश्राचा कव्हर ड्राईव्ह, एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20168:45 pm

अक्षर पटेलकडून शानदार षटकार, भारत ७ बाद २०३ धावा

मोरेश्वर येरम October 26, 20168:47 pm

४२ षटकांच्या अखेरीस भारत ७ बाद २०४ धावा

मोरेश्वर येरम October 26, 20168:48 pm

दोन धावा घेण्याच्या नादात अमित मिश्रा धावचीत

मोरेश्वर येरम October 26, 20168:49 pm

भारतीय संघाची आठवी विकेट, दोन धावा घेताना मिश्रा आणि अक्षर यांच्या विसंवाद

मोरेश्वर येरम October 26, 20168:50 pm

भारताला विजयासाठी ४७ चेंडूत ५६ धावांची गरज

मोरेश्वर येरम October 26, 20168:53 pm

भारतीय संघाला मोठा धक्का, अक्षर पटेल क्लीन बोल्ड

मोरेश्वर येरम October 26, 20168:53 pm

ट्रेंट बोल्टने घेतली अक्षर पटेलची विकेट

मोरेश्वर येरम October 26, 20168:53 pm

भारतीय संघाचा शेवटचा फलंदाजी मैदानात, विजयासाठी ४५ चेंडूत ५४ धावांची गरज

मोरेश्वर येरम October 26, 20168:55 pm

४३ षटकांच्या अखेरीस भारत ९ बाद २०७ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20168:56 pm

भारतीय संघाला विजयासाठी ४२ चेंडूत ५४ धावांची गरज

मोरेश्वर येरम October 26, 20168:56 pm

उमेश यादवचा स्विप फटका, एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20168:58 pm

४४ व्या षटकात केवळ तीन धावा, भारत ९ बाद २१०

मोरेश्वर येरम October 26, 20168:59 pm

धवल कुलकर्णीचा उत्तुंग षटकार, भारत ९ बाद २१६ धावा

मोरेश्वर येरम October 26, 20169:00 pm

भारतीय संघाला विजयासाठी ३२ धावांत ४५ धावांची गरज

मोरेश्वर येरम October 26, 20169:00 pm

धवल कुलकर्णीचा जोरदार फटका, दोन धावा

मोरेश्वर येरम October 26, 20169:01 pm

४५ षटकांच्या अखेरीस भारत ९ बाद २१९ धावा.

मोरेश्वर येरम October 26, 20169:04 pm

सँटनरच्या पहिल्या चार चेंडूंमध्ये तीन धावा

मोरेश्वर येरम October 26, 20169:04 pm

धवल कुलकर्णीचा स्वेअर ड्राईव्ह चौकार, भारत ९ बाद २२६ धावा

मोरेश्वर येरम October 26, 20169:05 pm

४६ व्या षटकाचा शेवटचा चेंडू आणि डॉट बॉल

मोरेश्वर येरम October 26, 20169:05 pm

शेवटच्या चार षटकांचा खेळ शिल्लक, भारताला विजयासाठी ३५ धावांची गरज

मोरेश्वर येरम October 26, 20169:07 pm

ट्रेंट बोल्ट टाकतोय ४७ वे षटक, पहिले दोन चेंडू निर्धाव

मोरेश्वर येरम October 26, 20169:08 pm

तिसऱया चेंडूवर थर्ड मॅनच्या दिशेने एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20169:08 pm

भारतीय संघाला विजयासाठी २० चेंडूत ३२ धावांची गरज

मोरेश्वर येरम October 26, 20169:10 pm

धवल कुलकर्णीचा पॉईंटच्या दिशेने खणखणीत चौकार, भारताला विजयासाठी २७ धावांची गरज

मोरेश्वर येरम October 26, 20169:11 pm

४८ वे षटक टाकतोय टीम साऊदी

मोरेश्वर येरम October 26, 20169:15 pm

टीम साऊदीच्या पहिल्या पाच चेंडूत तीन धावा

मोरेश्वर येरम October 26, 20169:16 pm

शेवटच्या १२ चेंडूत भारतीय संघाला २३ धावांची गरज

मोरेश्वर येरम October 26, 20169:17 pm

ट्रेंट बोल्टच्या पहिल्या चेंडूवर पॉईंटच्या दिशेने एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20169:17 pm

दुसऱया चेंडूवर लाँग ऑफवर एक धाव

मोरेश्वर येरम October 26, 20169:18 pm

तिसऱया चेंडूवर आणखी एक धाव, भारतीय संघाला विजयासाठी २० धावांची गरज

मोरेश्वर येरम October 26, 20169:19 pm

चौथा सामना न्यूझीलंडने १९ धावांनी जिंकला, भारतीय संघाला डाव २४१ धावांत संपुष्टात

मोरेश्वर येरम October 26, 20169:21 pm

भारतीय संघाकडून शेवटच्या विकेटसाठी ३४ धावांची भागीदारी

मोरेश्वर येरम October 26, 20169:21 pm

रांची येथील सामना जिंकून न्यूझीलंडने मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 1:07 pm

Web Title: live cricket score india vs new zealand 4th odi ranchi streaming video highlights
Next Stories
1 भारताला मालिका विजयाची संधी
2 भारतीय मल्ल योगेश्वर दत्तच्या रौप्यपदकाच्या आशा मावळल्या
3 मेस्सी, रोनाल्डोवर मात करीत ग्रिएझमन सर्वोत्तम खेळाडू
Just Now!
X