20 September 2020

News Flash

cricket score, India (Ind) vs New Zealand (NZ) : भारतीय संघाची ऐतिहासिक ५०० व्या कसोटीवर विजयी मोहोर

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे लाइव्ह अपडेट्स

Live cricket score, India (Ind) vs New Zealand (NZ), 1st Test Day 5: India victory in Kanpur. (Source: AP)

भारतीय संघाने कानपूर कसोटी १९७ धावांनी जिंकली असून, न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. कसोटीच्या पाचव्या दिवशी फिरकीपटू अश्विनने आपल्या फिरकी जादूने किवींना गारद केले. अश्विनने दुसऱया डावात तब्बल ६ विकेट्स घेतल्या, तर जडेजाने एका फलंदाजाला माघारी धाडले. मोहम्मद शमीनेही दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवरील भारतीय संघाची ही ५०० कसोटी होती. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील संघाने या कसोटीवर विजयी मोहोर उमटवली आहे. दोन्ही डावात मिळून अश्विनने एकूण १० विकेट्स घेतल्या, तर जडेजाच्या खात्यात ६ विकेट्स जमा झाल्या. न्यूझीलंडकडून ल्यूक राँचीने सर्वाधिक ८० धावांचे योगदान दिले, तर सँटनरनेही (७१) चांगली झुंज दिली. अर्धशतकी खेळी आणि सामन्यात ६ विकेट्स मिळविलेला रवींद्र जडेजा सामनावीराचा मानकरी ठरला.

कसोटीच्या पाचव्या दिवशी मैदानात जम बसवलेले न्यूझीलंडची ल्यूक राँची आणि मिचेल सँटनर जोडी फोडण्यात भारतीय संघाला आजच्या दिवसातील २१ व्या षटकानंतर यश आले होते. रवींद्र जडेजाने भारतीय संघाला पाचवे यश मिळवून दिले. मिड विकेटच्या दिशेने मोठा फटका मारण्याच्या नादात राँची ८० धावांवर झेलबाद झाला. राँची आणि सँटनर यांनी शतकी भागीदारी रचली. राँची बाद झाल्यानंतर मोहम्मद शमीने आपल्या भेदक माऱयाने बी.जे.वॉल्टिंग याला १८ धावांवर पायचीत केले, तर मार्क क्रेग याचा त्रिफळा उडवून त्याला स्वस्तात माघारी धाडले. उपहारापर्यंतच्या आकडेवारीनुसार न्यूझीलंडच्या ७ विकेट्स पडल्या होत्या. त्यामुळे भारताने जवळपास कसोटी आपल्या खिशात टाकली होती. उपहारानंतरच्या खेळात फक्त भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. अश्विनने उपहारानंतर अफलातून फिरकीच्या जोरावर किवींना नामोहरम केले आणि कसोटी १९७ धावांनी जिंकली.

वाचा: …म्हणून भारतीय संघाला ५०० वी कसोटी जिंकता आली

तत्पूर्वी, चौथ्या दिवसाअखेरीस न्यूझीलंडला चार फलंदाजांच्या मोबदल्यात केवळ ९३ धावा करता आल्या होत्या. भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी ४३९ धावांचे अशक्यप्राय आव्हान ठेवले होते. सामन्याच्या चौथ्या दिवसात आर. अश्विनने न्यूझीलंडच्या तीन फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडले होते, तर उमेश यादवने सीमा रेषेवरून दिलेल्या अचूक थ्रोवर रॉस टेलर धावचीत झाला. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ल्यूक राँची ३८ धावांवर , तर मिचेल सँटनर ८ धावांवर खेळत होते. तत्पूर्वी, भारतीय संघाने आपला दुसरा डाव ५ बाद ३७७ धावांवर घोषित करून किवींसमोर ४३९ धावांचे आव्हान उभे केले. रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजाच्या तुफानी खेळीने भारताला चौथ्या दिवशी चहापानापूर्वीच ३७५ चा पल्ला ओलांडता आला. चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय या दोघांनी अर्धशतकी खेळी करत दुस-या डावात भारताला दमदार सुरुवात केली होती. मात्र विराट कोहली १८ धावांवर माघारी परतल्याने भारताच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले. पण त्यानंतर अजिंक्य रहाणे संयमी ४० धावांची खेळी करत रोहित शर्माच्या साथीने भारताचा डाव पुढे नेला. अजिंक्य रहाणेने ८१ चेंडूत ४० धावा केले. यात चार चौकारांचा समावेश आहे. अजिंक्य रहाणे बाद झाल्यावर रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा या जोडीवर भारताची मदार होती. गेल्या काही सामन्यात सूर सापडत नसल्याने टीकेचे लक्ष्य ठरलेल्या रोहित शर्माला शेवटी आज सूर गवसला. रोहित शर्माने रविंद्र जडेजाच्या साथीने किवी गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. या दोघांनीही चौकार आणि षटकारांची बरसात केली. रोहित शर्माने ९३ चेंडूत ६८ धावा केल्या. यामध्ये ८ चौकारांचा समावेश होता. तर रविंद्र जडेजाने ५८ चेंडूत ५० धावा केल्या. यात दोन चौकार आणि तीन षटकाराचा समावेश आहे. भारताने ५ विकेटच्या मोबदल्यात ३७७ धावा केल्या असताना विराट कोहलीने भारताचा डाव घोषित केला. न्यूझीलंडतर्फे सँटनर आणि इश सोधी या दोघांनी प्रभावी मारा केला. या दोघांनी प्रत्येक दोन गडींना बाद केले. तर मार्क क्रेगने एक विकेट घेतली.

India (Ind) vs New Zealand (NZ) – दिवसभरातील अपडेट्स

लोकसत्ता टीम September 26, 20169:53 am

पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरूवात

लोकसत्ता टीम September 26, 20169:54 am

अश्विनकडून निर्धाव षटक, न्यूझीलंड ४ बाद १०७ धावा

लोकसत्ता टीम September 26, 20169:54 am

भारतीय संघाने न्यूझीलंडच्या फलंदाजांवर दिवसाच्या सुरूवातीपासूनच फिरकीपटूंचा मारा सुरू ठेवला आहे.

लोकसत्ता टीम September 26, 20169:55 am

अश्विन आणि जडेजाकडून न्यूझीलंडच्या फलंदाजांना लगाम

लोकसत्ता टीम September 26, 20169:55 am

५० षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड ११९/४ , विजयासाठी आणखी ३१५ धावांची गरज

लोकसत्ता टीम September 26, 20169:55 am

गोलंदाजीत बदल, उमेश यादव टाकतोय षटक

लोकसत्ता टीम September 26, 201610:01 am

अश्विनच्या षटकात राँचीचे दोन चौकार, न्यूझीलंड ४ बाद १३१ धावा

लोकसत्ता टीम September 26, 201610:02 am

ल्यूक राँचीचे अर्धशतक पूर्ण

लोकसत्ता टीम September 26, 201610:07 am

५३ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड ४ बाद १३६ धावा. (राँची- ६५ , सँटनर- २४ )

लोकसत्ता टीम September 26, 201610:17 am

राँची आणि सँटनरची शतकी भागीदारी, न्यूझीलंड ४ बाद १५८ धावा

लोकसत्ता टीम September 26, 201610:19 am

राँचीने ८० धावांचा टप्पा ओलांडला, न्यूझीलंड ४ बाद १५८ धावा

लोकसत्ता टीम September 26, 201610:26 am

भारतीय संघाला पाचवे यश, घातक राँची ८० धावांवर झेलबाद

लोकसत्ता टीम September 26, 201610:28 am

रवींद्र जडेजाने मिळवून दिले भारताला पाचवे यश, मोठा फटका मारण्याच्या नादात राँची झेलबाद. अश्विनने टिपला झेल

लोकसत्ता टीम September 26, 201610:31 am

राँची बाद झाल्यानंतर बी.जे.वॉल्टिंग फलंदाजीसाठी मैदानात दाखल

लोकसत्ता टीम September 26, 201610:36 am

६० षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड ५ बाद १७० धावा. (सँटनर- ३८ , वॉल्टिंग – ५)

लोकसत्ता टीम September 26, 201610:45 am

सँटनरने ४० धावांचा टप्पा ओलांडला, अर्धशतकाच्या दिशेने कूच

लोकसत्ता टीम September 26, 201610:46 am

वॉल्टिंगचा पॉईंटच्या दिशेने शानदार चौकार, न्यूझीलंड ५ बाद १८२

लोकसत्ता टीम September 26, 201610:47 am

रवींद्र जडेजाच्या चेंडूवर वॉल्टिंग पायचीत बाद होण्याची अपील, पण पंचांचा नकार

लोकसत्ता टीम September 26, 201610:48 am

पुन्हा एकदा पॉईंट्च्या दिशेने मोठा फटका मारण्याचा वॉल्टिंगचा प्रयत्न, पण रोहित शर्माने चेंडू अडवला.

लोकसत्ता टीम September 26, 201610:49 am

६४ व्या षटकानंतर न्यूझीलंड १८२/५ (सँटनर- ४१, वॉल्टिंग- १४)

लोकसत्ता टीम September 26, 201610:51 am

अश्विनच्या चेंडूवर वॉल्टिंगचा कव्हर पॉईंटच्या दिशेने शानदार चौकार, न्यूझीलंड १८७/५

लोकसत्ता टीम September 26, 201610:52 am

गोलंदाजीत बदल, किवींवर पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजीचा मारा करण्याचा कोहलीचा निर्णय. मोहम्मद शमी टाकतोय षटक

लोकसत्ता टीम September 26, 201610:54 am

मोहम्मद शमीने टाकलेला चेंडू वॉल्टिंगच्या पॅडवर आदळला, पायचीत बाद होण्याची अपील. पण पंचांचा नकार

लोकसत्ता टीम September 26, 201610:56 am

मोहम्मद शमीच्या षटकात पाच चेंडूत पाच धावा

लोकसत्ता टीम September 26, 201610:57 am

६६ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड ५ बाद १९२ धावा, विजयासाठी आणखी २४२ धावांची गरज

लोकसत्ता टीम September 26, 201610:59 am

गोलंदाजीत नवा बदल, मुरली विजय टाकतोय षटक

लोकसत्ता टीम September 26, 201611:02 am

मोहम्मद शमीचा चांगला बाऊन्सर, सँटनरने चेंडू सोडला

लोकसत्ता टीम September 26, 201611:02 am

शमीकडून वाईड चेंडू, साहाने उत्तमरीत्या रोखला

लोकसत्ता टीम September 26, 201611:03 am

शमीचा उत्तम यॉर्कर, न्यूझीलंड ५ बाद १९३

लोकसत्ता टीम September 26, 201611:03 am

सँटनर अर्धशतकाच्या उंबरठ्यावर

लोकसत्ता टीम September 26, 201611:04 am

मोहम्मद शमीच्या चौथ्या चेंडूवर पहिली धाव, न्यूझीलंड ५ बाद १९४

लोकसत्ता टीम September 26, 201611:07 am

अखेर मोहम्मद शमीने भारताला सहावे यश मिळवून दिले

लोकसत्ता टीम September 26, 201611:08 am

मोहम्मद शमीचा चेंडू थेट वॉल्टिंगच्या पॅडवर आदळला, जोरदार अपील. पंचांकडून सकारात्मक प्रतिसाद..वॉल्टिंग १८ धावांवर पायचीत

लोकसत्ता टीम September 26, 201611:09 am

मिचेल सँटनरचे अर्धशतक पूर्ण, न्यूझीलंड ६ बाद १९५

लोकसत्ता टीम September 26, 201611:12 am

मोहम्मद शमीचा अफलातून चेंडू, मार्क क्रेगचा त्रिफळा उडवला

लोकसत्ता टीम September 26, 201611:12 am

राऊंड द विकेटवरून गोलंदाजी करत मोहम्मद शमीचा रिव्हर्स स्विंग आणि अचूक त्रिफळावेध

लोकसत्ता टीम September 26, 201611:16 am

क्रेग केवळ १ धाव करून तंबूत दाखल, भारतीय संघाला विजयासाठी केवळ ३ विकेट्स गरज

लोकसत्ता टीम September 26, 201611:16 am

क्रेग बाद झाल्यानंतर इश सोधी फलंदाजीसाठी मैदानात

लोकसत्ता टीम September 26, 201611:19 am

खेळपट्टीचा नूर बदललेला पाहायला मिळत आहे. मोहम्मद शमीकडून भन्नाट रिव्हर्स स्विंग

लोकसत्ता टीम September 26, 201611:25 am

सँटनरचा मिड विकेटच्या दिशेने चौकार, न्यूझीलंडने २०० धावांचा टप्पा ओलांडला

लोकसत्ता टीम September 26, 201611:26 am

शमीचा उत्तम यॉर्कर, न्यूझीलंड ७ बाद २०४

लोकसत्ता टीम September 26, 201611:27 am

७२ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड ७ बाद २०४. (सँटनर- ५६ , सोधी- २ )

लोकसत्ता टीम September 26, 201611:28 am

शमीच्या वेगवान माऱयानंतर रवींद्र जडेजाचा फिरकी मारा

लोकसत्ता टीम September 26, 201611:29 am

जडेजाचा चेंडू समजण्यात सँटनरला अपयश, साहाकडून स्टपिंग. निर्णय तिसऱया पंचांकडे

लोकसत्ता टीम September 26, 201611:29 am

सँटनर सुरक्षित, तिसऱया पंचांचा नाबादचा निर्णय

लोकसत्ता टीम September 26, 201611:31 am

जडेजाच्या षटकात केवळ १ धाव, न्यूझीलंड ७ बाद २०५ धावा

लोकसत्ता टीम September 26, 201611:31 am

उपहाराची वेळ, पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय संघाने मिळवले तीन विकेट्स

लोकसत्ता टीम September 26, 201611:32 am

उपहारापर्यंत न्यूझीलंड ७ बाद २०५ धावा, भारतीय संघाला विजयासाठी ३ विकेट्सची गरज

लोकसत्ता टीम September 26, 201612:11 pm

उपहारानंतरच्या खेळाला सुरूवात, अश्विन टाकतोय उपहारानंतरचे पहिले षटक

लोकसत्ता टीम September 26, 201612:12 pm

पहिल्याच चेंडूवर स्टपिंगसाठीची अपील, निर्णय तिसऱया पंचांकडे

लोकसत्ता टीम September 26, 201612:12 pm

सँटनर बचावला, तिसऱया पंचांकडून नॉट आऊटचा निर्णय

लोकसत्ता टीम September 26, 201612:14 pm

अश्विनच्या पहिल्या षटकात केवळ १ धाव, न्यूझीलंड ७ बाद २०६ धावा

लोकसत्ता टीम September 26, 201612:16 pm

अश्विननंतर रवींद्र जडेजा टाकतोय षटक, जडेजाच्या दुसऱया चेंडूवर सँटनरचा चौकार

लोकसत्ता टीम September 26, 201612:17 pm

७५ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड ७ बाद २११ धावा, न्यूझीलंडला विजयासाठी २२३ धावांची गरज

लोकसत्ता टीम September 26, 201612:18 pm

सँटनरच कव्हर पॉईंटच्या दिशेने चौकार, न्यूझीलंड ७ बाद २१५

लोकसत्ता टीम September 26, 201612:19 pm

लोकसत्ता टीम September 26, 201612:20 pm

७६ व्या षटकाच्या अखेरीस न्यूझीलंड २१५/७ (सँटनर- ६७ , सोधी- २)

लोकसत्ता टीम September 26, 201612:21 pm

सोधीचा फाईन लेगच्या दिशेने चौकार, न्यूझीलंड २१९/७

लोकसत्ता टीम September 26, 201612:22 pm

७७ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड २१९/७ (सँटनर- ६७, सोधी- ६ )

लोकसत्ता टीम September 26, 201612:25 pm

अश्विनच्या चेंडूवर इश सोधी पायचीत झाल्याची भारतीय जोरदार अपील, पंचांचा नकार

लोकसत्ता टीम September 26, 201612:25 pm

७८ व्या षटकात केवळ एक धाव, न्यूझीलंड २२०/७

लोकसत्ता टीम September 26, 201612:30 pm

न्यूझीलंडला ८ वा धक्का, सँटनर ७१ धावांवर झेलबाद; रोहित शर्माने टिपला झेल

लोकसत्ता टीम September 26, 201612:30 pm

अश्विनने घेतली सँटनरची विकेट, भारत विजयाच्या उंबरठ्यावर

लोकसत्ता टीम September 26, 201612:32 pm

अश्विनच्या फिरकी खेळताना सँटनरच्या बॅटला कट लागून चेंडू थेट सिली पॉईंटला उभ्या असललेल्या रोहित शर्माच्या हातात विसावला

लोकसत्ता टीम September 26, 201612:32 pm

भारती संघाला आता विजयासाठी केवळ दोन विकेट्स गरज, न्यूझीलंड ८ बाद २२४

लोकसत्ता टीम September 26, 201612:35 pm

इश सोधी पायचीत झाल्याची अश्विनची अपील, पण पंचांचा नकार

लोकसत्ता टीम September 26, 201612:36 pm

इश सोधीचा अश्विनच्या फूलटॉसवर स्वेअर लेगच्या दिशेने चौकार, न्यूझीलंड ८ बाद २२८ धावा

लोकसत्ता टीम September 26, 201612:37 pm

पॉईंटवर रवींद्र जडेजाचे अफलातून क्षेत्ररक्षण, न्यूझीलंड २२९/८

लोकसत्ता टीम September 26, 201612:38 pm

ट्रेंट बोल्टचा स्विप शॉट, पण केवळ एका धावेवर समाधान

लोकसत्ता टीम September 26, 201612:38 pm

८२ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड २३०/८ (बोल्ट- २, सोधी- ११)

लोकसत्ता टीम September 26, 201612:39 pm

८० षटकांचा खेळ संपल्याने भारतीय संघाला नवीन चेंडू स्विकारण्याची संधी, भारताने ८३ व्या षटकात नवीन चेंडू स्विकारला

लोकसत्ता टीम September 26, 201612:39 pm

रवींद्र जडेजा टाकतोय नवीन चेंडूवरील पहिले षटक

लोकसत्ता टीम September 26, 201612:40 pm

बोल्टच्या पॅडला चेंडू आदळला, पायचीत झाल्याची अपील. पण पंचांचा नकार

लोकसत्ता टीम September 26, 201612:40 pm

जडेजाचा आणखी एक सुंदर स्विंग, न्यूझीलंड ८ बाद २३०

लोकसत्ता टीम September 26, 201612:41 pm

जडेजाकडून निर्धाव षटक, न्यूझीलंड ८ बाद २३० (सोधी- ११, बोल्ट- २)

लोकसत्ता टीम September 26, 201612:41 pm

इश सोधीचा अश्विनला डीप स्वेअर लेगच्या दिशने उत्तुंग षटकार, न्यूझीलंड ८ बाद २३६

लोकसत्ता टीम September 26, 201612:44 pm

अश्विनची अफलातून फिरकी, इश सोधी त्रिफळाबाद

लोकसत्ता टीम September 26, 201612:44 pm

भारतीय संघ ऐतिहासिक विजायापासून केवळ १ विकेट दूर

लोकसत्ता टीम September 26, 201612:49 pm

अश्विनच्या फिरीकीवर किवींची भंबेरी, न्यूझीलंड ९ बाद २३६

लोकसत्ता टीम September 26, 201612:52 pm

८७ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड ९ बाद २३६ धावा. (बोल्ट- २, वँगर- ० )

लोकसत्ता टीम September 26, 201612:54 pm

न्यूझीलंडची शेवटची विकेट अश्विनच्या नावावर, भारतीय संघाची ५०० व्या कसोटीवर विजयी मोहोर

लोकसत्ता टीम September 26, 201612:56 pm

न्यूझीलंडचा संघ २३६ धावांमध्ये गारद, भारताने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी जिंकली

लोकसत्ता टीम September 26, 20161:40 pm

अर्धशतकी खेळी आणि कसोटी सहा विकेट्स मिळविलेला रवींद्र जडेजा ठरला सामनावीर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2016 9:49 am

Web Title: live cricket score india vs new zealand ind vs nz 1st test day 5 kanpur video streaming highlights
Next Stories
1 महाराष्ट्राला एकच मत अयोग्य!
2 भारतीय बॉक्सिंग महासंघाची स्थापना
3 आठवडय़ाची मुलाखत : राजकारण नको, बॉक्सिंग हेच लक्ष्य!
Just Now!
X