राजधानी दिल्लीत भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱया एकदिवसीय सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. फिरोजशहा कोटला स्टेडियमवर झालेल्या या रंगतदार लढाईत न्यूझीलंडने ६ धावांनी विजय प्राप्त केला. सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला. न्यूझीलंडच्या २४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून केदार जाधवची ४१ धावांची खेळी वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. कर्णधार धोनीने भारतीय संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण यावेळी तो मॅच विनर ठरू शकला नाही. साऊदीच्या गोलंदाजीवर धोनी (३९) झेलबाद झाला. त्यानंतर हार्दिक पंड्याने भारतीय संघाच्या विजयाची आशा अखेरच्या षटकापर्यंत जिवंत ठेवली होती. मात्र हार्दिक ३६ धावांवर बाद झाल्यानंतर संघाच्या विजयाच्या आशा पूर्णपणे मावळल्या. अखेरच्या षटकात टीम साऊदीने बुमराहला शून्यावर माघारी धाडून किवींनी विजयी जल्लोष साजरा केला. उमेश यादवने नाबाद १८ धावांची खेळी केली. न्यूझीलंडने या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत आता १-१ अशी बरोबरी साधली आहे.

न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरूवात अतिशय संथ गतीने झाली होती. त्यात रोहित शर्मा केवळ १५ धावा करून माघारी परतला. तर कोहली देखील यावेळी आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करू शकला नाही. कोहली (९) सँटनरच्या फिरकीवर यष्टीरक्षक ल्युक राँचीकरवी झेलबाद झाला. रहाणे देखील मोठा फटका मारण्याच्या नादात अँडरसनकरवी झेलबाद होऊन माघारी परतला. संघातील अनुभवी फलंदाज स्वस्तात तंबूत दाखल झाल्यानंतर धोनीने केदार जाधवच्या साथीने संघाचा डाव सावरण्यास सुरूवात केली होती. केदार जाधवने यावेळी विश्वासू खेळी साकारली. त्याने ३७ चेंडूत ४१ धावा केल्या.

IRE vs AFD 1st Test Match Updates in Marathi
IRE vs AFG : आयर्लंडचा पहिलावहिला कसोटी विजय; अफगाणिस्तानवर ६ विकेट्सनी मात
gujarat giants
WPL 2024 : गुजरात जायंट संघाला मिळालीय ‘ही’ विशेष परवानगी; जाणून घ्या कारण…
team india kl rahul bcci
IND Vs ENG : केएल राहुल पाचव्या कसोटीलाही मुकणार, संघात दिग्गज खेळाडूचं पुनरागमन; अशी असेल टीम इंडिया
kl rahul still not fit likely to miss 5th Test against england in dharamsala
केएल राहुल अजूनही जायबंदीच;अखेरच्या कसोटी सामन्यातही खेळण्याची शक्यता कमीच

तत्पूर्वी,  न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनच्या शतकी खेळीच्या जोरावर किवींना यावेळी २४२ धावांपर्यंत मजल मारता आली. लॅथमने ४६ धावांचे योगदान दिले. या दोघांव्यतिरिक्त इतर कोणताही न्यूझीलंडचा फलंदाच चांगली कामगिरी करू शकला नाही. विल्यमसन ११८ धावांवर बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचा संघ गडगडला. अखेरच्या दहा षटकांत भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंच्या धावसंख्येला चांगलाच लगाम घातला.  भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. धोनीचा निर्णय सार्थकी लावत उमेश यादवने पहिल्याच षटकात मार्टिन गप्तील याला क्लीनबोल्ड करून दमदार सुरूवात करून दिली. मात्र, त्यानंतर आलेल्या केन विल्यमसनने यावेळी विश्वासू खेळी साकारून संघाचा डाव सावरला. विल्यमसनने टॉम लॅथमच्या साथीने दुसऱया विकेटसाठी तब्बल १२० धावांची भागीदारी रचली. विल्यमसन आणि लॅथम जोडी भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरत होती. अशावेळी धोनीने गोलंदाजीत बदल करून केदार जाधवला गोलंदाजीस पाचारण केले आणि त्याने भारतीय संघाला यश मिळवून दिले. जाधवने लॅथमला माघारी धाडून भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. लॅथम बाद झाल्यानंतरही विल्यमसनने रॉस टेलरला साथीला घेऊन आपले शतक पूर्ण केले. विल्यमसनचे हे भारतीय संघाविरुद्धचे पहिलेवहिले एकदिवसीय शतक ठरले. तर आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील त्याचे हे आठवे शतक आहे.  रॉस टेलरवर अमित मिश्राने चांगला दबाव निर्माण केला होता, मग धावसंख्येला गती देण्याच्या नादात रॉस टेलरने मोठा फटका मारण्याची चूक केली. टेलर २१ धावांवर झेलबाद झाला. त्यापाठोपाठ केन विल्यमसन देखील ११८ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला. विल्यमसन बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचे फलंदाज काही विशेष कामगिरी करू शकले नाहीत. ठराविक अंतराने न्यूझीलंडच्या विकेट्स एकामागोमाग एक पडत राहिल्या आणि सरतेशेवटी किवींनी २४२ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून बुमराह आणि मिश्रा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या, तर उमेश यादव, अक्षर पटेल आणि केदार जाधव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Live Cricket Score of India vs New Zealand :

Live Updates
21:35 (IST) 20 Oct 2016
भारतीय संघाला पराभवाचा धक्का, न्यूझीलंडने सामना ६ धावांनी जिंकला
21:28 (IST) 20 Oct 2016
बोल्टकडून डॉट बॉल
21:27 (IST) 20 Oct 2016
हार्दिक पंड्याचा शानदार चौकार, भारताला विजयासाठी ९ चेंडूत ११ धावांची गरज
21:26 (IST) 20 Oct 2016
हार्दिक पंड्या स्ट्राईकवर
21:26 (IST) 20 Oct 2016
४९ वे षटक टाकतोय ट्रेंट बोल्ट, पहिल्या चेंडूवर एक धाव
21:25 (IST) 20 Oct 2016
भारतीय संघाला १२ चेंडूत १६ धावांची गरज
21:24 (IST) 20 Oct 2016
उमेश यादवकडून डॉट बॉल
21:24 (IST) 20 Oct 2016
भारताला विजयासाठी १४ चेंडूत १७ धावांची गरज
21:22 (IST) 20 Oct 2016
उमेश यादवचा पॉईंटच्या दिशेने फटका, दोन धावा
21:21 (IST) 20 Oct 2016
पहिल्या चेंडूवर केवळ १ धाव, उमेश यादव स्ट्राईकवर
21:20 (IST) 20 Oct 2016
मॅट हेन्री टाकतोय गोलंदाजी, हार्दिक स्ट्राईकवर
21:19 (IST) 20 Oct 2016
शेवटच्या चेंडूवर हार्दिककडून एक धाव, भारत ८ बाद २२१ धावा
21:19 (IST) 20 Oct 2016
भारतीय संघाला विजयासाठी १९ चेंडूत २३ धावांची गरज
21:19 (IST) 20 Oct 2016
हार्दिक पंड्याकडून दोन धावा, भारत २२०/८
21:18 (IST) 20 Oct 2016
हार्दिक पंड्या स्ट्राईकवर
21:18 (IST) 20 Oct 2016
साऊदीच्या चौथ्या चेंडूवर एक धाव, भारत ८ बाद २१८ धावा
21:17 (IST) 20 Oct 2016
भारताला २२ चेंडूत २६ धावांची गरज
21:16 (IST) 20 Oct 2016
टीम साऊदीकडून वाईड चेंडू, भारत ८ बाद २१७ धावा
21:15 (IST) 20 Oct 2016
टीम साऊदी टाकतोय षटक, पहिल्या चेंडूवर हार्दिक पंड्याकडून दोन धावा
21:14 (IST) 20 Oct 2016
शेवटच्या चार षटकांचा खेळ शिल्लक, भारतीय संघाला २४ चेंडूत ३० धावांची गरज
21:13 (IST) 20 Oct 2016
हार्दिकचा पॉईंटच्या दिशेने फटका, दोन धावा
21:12 (IST) 20 Oct 2016
हार्दिक पंड्याकडून चौकार, भारताला विजयासाठी ३३ धावांची गरज
21:11 (IST) 20 Oct 2016
तिसऱया चेंडूवर एक धाव, हार्दिक पंड्या स्ट्राईकवर
21:10 (IST) 20 Oct 2016
उमेश यादव स्ट्राईकवर
21:10 (IST) 20 Oct 2016
ट्रेंट बोल्ट टाकतोय न्यूझीलंडचे ४६ वे षटक, पहिल्या चेंडूवर १ धाव
21:10 (IST) 20 Oct 2016
शेवटच्या पाच षटकांचा खेळ शिल्लक, हार्दिक पंड्या कमाल करणार का? सर्वांचे लक्ष
21:09 (IST) 20 Oct 2016
४५ षटकांच्या अखेरीस भारत २०४/८, विजयासाठी ३९ धावांची गरज
21:09 (IST) 20 Oct 2016
भारतीय संघाला विजयासाठी ३१ चेंडूत ४० धावांची गरज
21:08 (IST) 20 Oct 2016
उमेश यादवचा डीप मिड विकेटला खणखणीत चौकार, भारताला विजयासाठी ४१ धावांची गरज
21:07 (IST) 20 Oct 2016
तिसऱया चेंडूवर केवळ १ धाव, भारत ८ बाद १९८ धावा
21:06 (IST) 20 Oct 2016
दुसऱया चेंडूवर दोन धावा
21:06 (IST) 20 Oct 2016
पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याचा हार्दिक पंड्याचा प्रयत्न
21:05 (IST) 20 Oct 2016
टीम साऊदी टाकतोय न्यझीलंडचे ४५ वे षटक
21:04 (IST) 20 Oct 2016
४४ षटकांच्या अखेरीस भारत ८ बाद १९५ धावा, भारताला विजयासाठी ४८ धावांची गरज
21:00 (IST) 20 Oct 2016
भारतीय संघाला विजयासाठी ४३ चेंडूत ५४ धावांची गरज
21:00 (IST) 20 Oct 2016
हार्दिक पंड्याचा बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चौकार, भारत ८ बाद १९३ धावा
20:58 (IST) 20 Oct 2016
उमेश यादव धावचीत होताना बचावला, भारत ८ बाद १८८ धावा
20:55 (IST) 20 Oct 2016
भारताला विजयासाठी ४८ चेंडूत ५८ धावांची गरज
20:47 (IST) 20 Oct 2016
गप्तीलच्या खात्यात दुसरी विकेट, अमित मिश्रा मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद
20:46 (IST) 20 Oct 2016
भारतीय संघाला विजयासाठी ५८ चेंडूत ६१ धावांची गरज
20:44 (IST) 20 Oct 2016
भारतीय संघाला सातवा धक्का, अक्षर पटेल लाँग ऑनवर झेलबाद
20:43 (IST) 20 Oct 2016
किवींकडून लागोपाठ दोन वाईड चेंडू
20:43 (IST) 20 Oct 2016
हार्दिक पटेलचा चौकार, भारत ६ बाद १७८ धावा
20:37 (IST) 20 Oct 2016
भारतीय संघाला मोठा धक्का, टीम साऊदीचा चेंडू डीफेन्स करताना धोनीचा झेल साऊदीने टीपला
20:36 (IST) 20 Oct 2016
धोनीचा कव्हर ड्राईव्ह, दोन धावा
20:32 (IST) 20 Oct 2016
अक्षर पटेलचा खणखणीत षटकार, भारताला विजयासाठी ७५ धावांची गरज
20:30 (IST) 20 Oct 2016
३८ षटकांच्या अखेरीस भारत १६१/५ (धोनी- ३६ , अक्षर- ९ )
20:28 (IST) 20 Oct 2016
धोनी पुन्हा एकदा मॅच विनर ठरणार का?
20:20 (IST) 20 Oct 2016
फूलटॉस चेंडूवर धोनीचा स्वेअर लेगला शॉट, दोन धावा
20:17 (IST) 20 Oct 2016
भारतीय संघाला विजयासाठी ८८ चेंडूत ९२ धावांची गरज