05 March 2021

News Flash

Cricket Score of India vs New Zealand: पहिल्या दिवसाच्या अखेरीस भारत ७ बाद २३९

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे अपडेट्स

Live Cricket Score of India vs New Zealand, 2nd Test, Day 1 in Kolkata: Ajinkya Rahane fell after a well made 77. (Source: AP)

कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवरील न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱया कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने ७ विकेट्सच्या मोबदल्यात २३९ धावांपर्यंत मजल मारली आहे. भारतीय संघाकडून चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतकी खेळी साकारली. कोलकाता कसोटीचा नाणेफेक जिंकून भारतीय संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण भारतीय संघाची सुरूवात निराशाजनक झाली. लोकेश राहुल दुखापतग्रस्त असल्याने संघात संधी मिळालेला शिखर धवन केवळ एक धाव करून माघारी परतला. त्यानंतर मुरली विजय देखील यावेळी मोठी खेळी करू शकला नाही. दोघांनाही न्यूझीलंडच्या मॉट हेन्रीने माघारी धाडले. कर्णधार कोहलीकडून चांगल्या खेळीची अपेक्षा केली जात असताना त्यानेही निराशा केली. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर कव्हर्सच्या दिशेने फटका मारण्याच्या नादात कोहलीच्या बॅटला स्पर्श करून गेलेला चेंडू गलीमध्ये उभ्या असलेल्या लॅथमच्या हातात विसावला. कोहली केवळ ९ धावा करून माघारी परतला. भारतीय संघाचे पहिले तीन शिलेदार स्वस्तात माघारी परतल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी भारतीय संघाचा डाव सावरून मैदानात चांगलाच जम बसवला. पुजाराने ८७ धावांचे, तर अजिंक्य रहाणेने ७७ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान देऊन भारतीय संघाला सावरले. रहाणे बाद झाल्यानंतर रोहित शर्मा आणि अश्विन देखील प्रत्येकी २ आणि २६ धावांवर माघारी परतले. पहिल्या दिवसाचा खेळ संपूर्ण ९० षटकांचा होऊ शकला नाही. कमी सुर्यप्रकाशामुळे खेळ ८६ षटकांमध्येच थांबविण्यात आला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या ७ बाद २३९ अशी आहे. रवींद्र जडेजा(०) आणि वृद्धीमान साहा(१४) धावांवर खेळत आहेत. न्यूझीलंडकडून हेन्रीने तीन, तर फिरकीपटू जीतन पटेल याने दोन विकेट्स घेतल्या. बोल्ट आणि वँगर यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.

India vs New Zealand – दिवसभरातील अपडेट्स

लोकसत्ता टीम September 30, 201610:13 am

कोलकाता कसोटीचा नाणेफेक भारताने जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

लोकसत्ता टीम September 30, 201610:13 am

भारतीय संघात बदल, सलामीसाठी शिखर धवन आणि मुरली विजय

लोकसत्ता टीम September 30, 201610:14 am

भारतीय संघाला सुरूवातीलाचा मोठा धक्का, शिखर धवन स्वस्तात बाद

लोकसत्ता टीम September 30, 201610:15 am

मॉट हेन्रीने उडवला शिखर धवचा त्रिफळा, धवन केवळ १ धाव करून बाद

लोकसत्ता टीम September 30, 201610:22 am

पुजारा आणि मुरली विजयकडून डाव सावरण्याचा प्रयत्न

लोकसत्ता टीम September 30, 201610:24 am

पुजाराची चांगली फलंदाजी, वँगरच्या फूलटॉसवर पुजाराचा पॉईंटच्या दिशेने शानदार चौकार

लोकसत्ता टीम September 30, 201610:26 am

भारतीय संघाला दुसरा मोठा धक्का, मुरली विजय झेलबाद

लोकसत्ता टीम September 30, 201610:29 am

हेन्रीच्या खात्यात दुसरी विकेट, मुरली विजयच्या बॅटला चेंडू स्पर्श करून थेट किवींच्या यष्टीरक्षकाकडे झेल

लोकसत्ता टीम September 30, 201610:30 am

मुरली विजय ९ धावा करून तंबूत दाखल, भारत २ बाद २८

लोकसत्ता टीम September 30, 201610:34 am

चेतेश्वर पुजाराचा स्ट्रेट ड्राईव्ह चौकार, भारत २ बाद ३२ धावा

लोकसत्ता टीम September 30, 201610:36 am

१३ षटकांच्या अखेरीस भारत २ बाद ३२ (पुजारा- २१ , कोहली- ०)

लोकसत्ता टीम September 30, 201610:37 am

१४ व्या षटकात किवींकडून फिरकीचे अस्त्र, मिचेल सँटनर करतोय गोलंदाजी

लोकसत्ता टीम September 30, 201610:38 am

विराट कोहलीचे खाते उघडले, भारत ३३/२

लोकसत्ता टीम September 30, 201610:40 am

सँटनरच्या पहिल्या षटकात केवळ १ धाव, भारत २ बाद ३३

लोकसत्ता टीम September 30, 201610:41 am

लोकसत्ता टीम September 30, 201610:44 am

वँगरकडून विराट कोहलीवर सतत बाऊन्सरचा मारा

लोकसत्ता टीम September 30, 201610:44 am

वँगरकडून निर्धाव षटक, १५ षटकांच्या अखेरीस भारत २ बाद ३३

लोकसत्ता टीम September 30, 201610:46 am

१६ वे षटक देखील निर्धाव, भारत २ बाद ३३ धावा

लोकसत्ता टीम September 30, 201610:52 am

कोहलीचा शानदार शॉट, पण सीमा रेषेवर चेंडू अडवला; दोन धावा

लोकसत्ता टीम September 30, 201610:54 am

१८ षटकांच्या अखेरीस ३६/२ (पुजारा – २१, कोहली- ४)

लोकसत्ता टीम September 30, 201610:57 am

पुजाराचा बॅकफूटवरून कव्हर्सच्या दिशेने उत्तम फटका, भारत २ बाद ३७

लोकसत्ता टीम September 30, 201611:01 am

सँटनरकडून आणखी एक निर्धाव षटक, भारत २ बाद ३७

लोकसत्ता टीम September 30, 201611:03 am

न्यूझीलंडच्या गोलंदाजीत बदल, जीतन पटेल करतोय गोलंदाजी

लोकसत्ता टीम September 30, 201611:04 am

जीतन पटेलच्या गोलंदाजीवर पुजाराचा पहिल्या स्लिपमध्ये झेल टीपण्याची रॉस टेलरला संधी, पण पुजाराला जीवनदान

लोकसत्ता टीम September 30, 201611:08 am

ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर विरटा कोहलीचा शानदार कव्हर ड्राईव्ह, चौकार

लोकसत्ता टीम September 30, 201611:09 am

न्यूझीलंडला मोठे यश, विराट कोहली बोल्टच्या गोलंदाजीवर झेलबाद

लोकसत्ता टीम September 30, 201611:10 am

बोल्टच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात गलीमध्ये कोहलीचा झेल टीपला, कोहली ९ धावांवर बाद

लोकसत्ता टीम September 30, 201611:17 am

पुजारा आणि रहाणेवर भारतीय संघाच्या डावाची मदार, भारत ३ बाद ४६

लोकसत्ता टीम September 30, 201611:23 am

पुजाराकडून शानदार चौकार, भारत ३ बाद ५०

लोकसत्ता टीम September 30, 201611:29 am

ट्रेंट बोल्टचा चेंडू पुजाराच्या हेल्मेटला आदळला, चेंडू फाईन लेगच्या दिशेने सीमा रेषेबाहेर

लोकसत्ता टीम September 30, 201611:29 am

२६ षटकांच्या अखेरीस भारत ३ बाद ५५ धावा

लोकसत्ता टीम September 30, 201611:30 am

जीतन पटेलच्या फिरकीवर रहाणेचा शानदार चौकार

लोकसत्ता टीम September 30, 201611:31 am

पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रातील शेवटचे षटक

लोकसत्ता टीम September 30, 201611:32 am

२७ षटकांचा खेळ संपला, भारत ३ बाद ५७

लोकसत्ता टीम September 30, 201611:33 am

उपहाराची वेळ, पहिल्या सत्रात न्यूझीलंडची चांगली गोलंदाजी; भारत बॅकफूटवर

लोकसत्ता टीम September 30, 201611:33 am

उपहारापर्यंतच्या धावसंख्येनुसार भारत ३ बाद ५७ (पुजारा- ३१ , रहाणे- २ )

लोकसत्ता टीम September 30, 201612:07 pm

थोड्याच वेळात कोलकाता कसोटीच्या दुसऱया सत्राला सुरूवात होणार

लोकसत्ता टीम September 30, 201612:12 pm

उपहारानंतरच्या खेळाला सुरूवात, हेन्री करतोय गोलंदाजी

लोकसत्ता टीम September 30, 201612:14 pm

पुजाराचा हेन्रीला बॅकफूटवरून पॉईंटच्या दिशेने शानदार चौकार, भारत ६१/३

लोकसत्ता टीम September 30, 201612:16 pm

जीतन पटेल करतोय गोलंदाजी, पहिले तीन चेंडू निर्धाव

लोकसत्ता टीम September 30, 201612:17 pm

पुजाराचा पॉईंटच्या दिशेने फ्लिक, एक धाव

लोकसत्ता टीम September 30, 201612:24 pm

३० षटकांच्या अखेरीस भारत ६२/३ (पुजारा- ३५ , रहाणे- ३ )

लोकसत्ता टीम September 30, 201612:31 pm

पुजारा आणि रहाणे यांच्याकडून सावध खेळी, भारत ३ बाद ६७

लोकसत्ता टीम September 30, 201612:32 pm

रहाणेचा कव्हर्सच्या दिशेने चौकार, भारत ३ बाद ७१ धावा

लोकसत्ता टीम September 30, 201612:34 pm

भारतीय संघाला सध्या भक्कम भागीदारीची गरज, रहाणे आणि पुजारा भारताचा डाव सावरणार का?

लोकसत्ता टीम September 30, 201612:38 pm

रहाणेचा डीप एक्स्ट्रा कव्हर्सच्या दिशेने शानदार चौकार, भारत ३ बाद ७६

लोकसत्ता टीम September 30, 201612:44 pm

पुजाराचा सँटनरला मिड विकेटच्या दिशेने चौकार, भारत ३ बाद ८१ धावा

लोकसत्ता टीम September 30, 201612:46 pm

पुजाराने ४० धावांचा टप्पा ओलांडला, भारत ३ बाद ८४

लोकसत्ता टीम September 30, 201612:55 pm

वँगरच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा पुजाराचा प्रयत्न, पण यश नाही

लोकसत्ता टीम September 30, 201612:58 pm

रहाणेचा फ्रंटफूटवरून मिड विकेटच्या दिशेने चांगला फटका, भारत ३ बाद ८६

लोकसत्ता टीम September 30, 201612:59 pm

सँटनरच्या गोलंदाजीवर रहाणे पायचीत होण्यासाठीची न्यूझीलंडची अपील, भारत ३ बाद ८६

लोकसत्ता टीम September 30, 20161:02 pm

पहिल्या तीन विकेट्स झटपट पडल्याने भारतीय धावसंख्येला लगाम, भारत ३ बाद ८७

लोकसत्ता टीम September 30, 20161:11 pm

रहाणेचा बॅकफूटवरून कव्हर्सच्या दिशेने चौकार, भारत ३ बाद ९२

लोकसत्ता टीम September 30, 20161:18 pm

वँगरचा बाऊन्सर, रहाणे खेळपट्टीवर कोसळला

लोकसत्ता टीम September 30, 20161:22 pm

सँटनरच्या गोलंदाजीवर रहाणेचा पॉईंटच्या दिशेने चौकार, भारत ३ बाद ९८

लोकसत्ता टीम September 30, 20161:23 pm

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांची अर्धशतकी भागीदारी

लोकसत्ता टीम September 30, 20161:26 pm

भारताच्या धावसंख्येचे शतक, भारत ३ बाद १०१

लोकसत्ता टीम September 30, 20161:28 pm

चेतेश्वर पुजाराचे अर्धशतक पूर्ण, भारत ३ बाद १०६

लोकसत्ता टीम September 30, 20161:29 pm

चेतेश्वर पुजाराचे आंतरराष्ट्रीय कसोटीमधील १० वे अर्धशतक, भारत ३ बाद १०६ धावा

लोकसत्ता टीम September 30, 20161:50 pm

जतीन पटेलच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात रहाणेचा झेल, पण न्यूझीलंडने संधी गमावली

लोकसत्ता टीम September 30, 20161:51 pm

५२ षटकांच्या अखेरीस भारत ३ बाद ११५

लोकसत्ता टीम September 30, 20161:54 pm

पुजारा आणि रहाणेची मैदानात टीच्चून फलंदाजी, भारत ३ बाद ११७

लोकसत्ता टीम September 30, 20161:56 pm

रहाणेचा ट्रेंट बोल्टला शानदार पूल शॉट, डीप बॅकवर्ड स्वेअर लेगच्या दिशेने चौकार

लोकसत्ता टीम September 30, 20162:01 pm

सँटनरच्या गोलंदाजीवर पुजारा पायचीत होण्यासाठीची अपील, पंचांचा नकार

लोकसत्ता टीम September 30, 20162:02 pm

५५ षटकांच्या अखेरीस भारत ३ बाद १२२ (पुजारा- ५८ , रहाणे- ३९)

लोकसत्ता टीम September 30, 20162:05 pm

रहाणेचा कव्हर्सच्या दिशेने फटका, पण केवळ दोन धावा

लोकसत्ता टीम September 30, 20162:07 pm

बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने फटका, भारत ३ बाद १२८

लोकसत्ता टीम September 30, 20162:08 pm

पुजाराचा बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने नजाकती फटका, चौकार

लोकसत्ता टीम September 30, 20162:10 pm

५७ षटकांच्या अखेरीस भारत ३ बाद १३४ धावा. (पुजारा- ६४ , रहाणे- ४५ )

लोकसत्ता टीम September 30, 20162:13 pm

रहाणेचा शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने फटका, दोन धावा

लोकसत्ता टीम September 30, 20162:13 pm

अजिंक्य रहाणे अर्धशतकाच्या उंबरठ्यावर, भारत ३ बाद १३६

लोकसत्ता टीम September 30, 20162:14 pm

दुसऱया सत्राचा शेवट, भारत ३ बाद १३६ धावा. (पुजारा- ६४, रहाणे- ४७ )

लोकसत्ता टीम September 30, 20162:15 pm

दुसरे सत्र, भारतासाठी समाधानकारक. दुसऱया सत्रात एकही विकेट नाही.

लोकसत्ता टीम September 30, 20162:15 pm

दुसऱया सत्रात एकूण ३१ षटकांमध्ये भारताने कुटल्या ७९ धावा.

लोकसत्ता टीम September 30, 20162:33 pm

कोलकाता कसोटीच्या पहिल्या दिवसातील तिसऱया सत्राला सुरूवात

लोकसत्ता टीम September 30, 20162:35 pm

रहाणेचा बॅकफूटवरून पॉईंटच्या दिशेने फटका, एक धाव

लोकसत्ता टीम September 30, 20162:36 pm

६० षटकांच्या अखेरीस भारत ३ बाद १४० (पुजारा- ६७ , रहाणे- ४८)

लोकसत्ता टीम September 30, 20162:40 pm

रहाणेचे अर्धशतक पूर्ण, भारत ३ बाद १४२

लोकसत्ता टीम September 30, 20162:42 pm

अजिंक्य रहाणेचे ९ वे आंतरराष्ट्रीय कसोटी अर्धशतक

लोकसत्ता टीम September 30, 20162:42 pm

सँटनरच्या गोलंदाजीवर रहाणेचा डीप मिड विकेटच्या दिशेने चौकार, भारत ३ बाद १४७

लोकसत्ता टीम September 30, 20162:43 pm

रहाणे आणि पुजाराची शतकी भागीदारी, भारताचा डाव सावरला

लोकसत्ता टीम September 30, 20162:52 pm
लोकसत्ता टीम September 30, 20162:55 pm

लोकसत्ता टीम September 30, 20163:01 pm

ड्रींक्सची वेळ, भारत ३ बाद १५३

लोकसत्ता टीम September 30, 20163:05 pm

६६ व्या षटकात पुजाराचे दोन चौकार, भारत ३ बाद १६३

लोकसत्ता टीम September 30, 20163:05 pm

चेतेश्वर पुजाराची शतकाच्या दिशेने कूच, ८० धावांचा टप्पा ओलांडला

लोकसत्ता टीम September 30, 20163:08 pm

तिसऱया सत्रात देखील भारतीय संघाची चांगली फलंदाजी पाहायला मिळते आहे

लोकसत्ता टीम September 30, 20163:12 pm

रहाणेचा पॉईंटच्या दिशेने चौकार, भारत ३ बाद १८०

लोकसत्ता टीम September 30, 20163:13 pm

रहाणेकडून थर्ड मॅनच्या दिशेने आणखी एक चौकार, भारत ३ बाद १८४

लोकसत्ता टीम September 30, 20163:14 pm

रहाणेकडून आता आक्रमक फलंदाजी पाहायला मिळत आहे. भारतीय फलंदाजांचा भारतीय धावसंख्येला गती देण्याचा प्रयत्न

लोकसत्ता टीम September 30, 20163:20 pm

भारतीय संघाला चौथा धक्का, चेतेश्वर पुजारा ८७ धावांवर बाद

लोकसत्ता टीम September 30, 20163:23 pm

कव्हर्सच्या दिशेने फटका मारताना चेतेश्वर पुजाराचा मार्टिन गप्तीलने टीपला झेल, वँगरने घेतली विकेट

लोकसत्ता टीम September 30, 20163:26 pm

रहाणे पायचीत झाल्याची न्यूझीलंडची अपील, पण पंचांचा नकार

लोकसत्ता टीम September 30, 20163:27 pm

लेग स्लीपच्या दिशेने रहाणेचा सुंदर फ्लिक, चौकार

लोकसत्ता टीम September 30, 20163:29 pm

पुजारा बाद झाल्यानंतर रोहित शर्मा फलंदाजीसाठी मैदानात, भारत ४ बाद १९३

लोकसत्ता टीम September 30, 20163:31 pm

रोहित शर्माकडून संयमी फलंदाजी

लोकसत्ता टीम September 30, 20163:32 pm

रोहित शर्मा आणि ईडन गार्डन्स हे समीकरण खूप चांगले राहिले आहे. या स्टेडियमवर आजवर रोहित शर्माने अनेक उल्लेखनीय खेळी साकारल्या आहेत.

लोकसत्ता टीम September 30, 20163:33 pm

७२ षटकांच्या अखेरीस भारत १९६/४ (रहाणे- ७५ , रोहित- २ )

लोकसत्ता टीम September 30, 20163:40 pm

रोहित आणि रहाणेमध्ये धाव घेताना समन्वयाचा अभाव, रोहित धावचीत होताना थोडक्यात बचावला

लोकसत्ता टीम September 30, 20163:40 pm

रोहित शर्माच्या हाताला दुखापत, भारत ४ बाद १९३

लोकसत्ता टीम September 30, 20163:43 pm

रोहित शर्माकडून निराशा, भारत ५ बाद १९३

लोकसत्ता टीम September 30, 20163:46 pm

जीतन पटेलच्या गोलंदाजीवर रोहित शर्माचा शॉर्ट लेगवर झेल टीपला

लोकसत्ता टीम September 30, 20163:47 pm

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर आर.अश्विन फलंदाजीसाठी मैदानात दाखल

लोकसत्ता टीम September 30, 20163:52 pm

७६ षटकांच्या अखेरीस भारत १९७/५ (रहाणे- ७६, अश्विन- ३)

लोकसत्ता टीम September 30, 20163:56 pm

भारतीय संघाच्या सध्या २.७० च्या सरासरीने धावा, भारत ५ बाद १९९

लोकसत्ता टीम September 30, 20163:59 pm

भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का, अजिंक्य रहाणे ७७ धावांवर पायचीत

लोकसत्ता टीम September 30, 20164:00 pm

जतीन पटेलने घेतली अजिंक्य रहाणेची विकेट, भारत ६ बाद २०० धावा

लोकसत्ता टीम September 30, 20164:04 pm

अश्विनचे लागोपाठ दोन चौकार, भारत ६ बाद २०८

लोकसत्ता टीम September 30, 20164:04 pm

अश्विनचा आणखी एक चौकार, भारत ६ बाद २१२

लोकसत्ता टीम September 30, 20164:08 pm

वृद्धीमान साहाचा शानदार चौकार, भारत ६ बाद २२०

लोकसत्ता टीम September 30, 20164:13 pm

आजच्या दिवसाच्या केवळ ९ षटकांचा खेळ शिल्लक, भारत ६ बाद २२१

लोकसत्ता टीम September 30, 20164:19 pm

न्यूझीलंडने नवीन चेंडू स्विकारला, भारत ६ बाद २२१

लोकसत्ता टीम September 30, 20164:20 pm

अश्विन आणि साहाची संयमी फलंदाजी, भारत ६ बाद २२५

लोकसत्ता टीम September 30, 20164:24 pm

आजच्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी केवळ सात षटकांचा खेळ शिल्लक

लोकसत्ता टीम September 30, 20164:25 pm

भारतीय संघाला सातवा धक्का, अश्विन पायचीत

लोकसत्ता टीम September 30, 20164:27 pm

हेन्रीच्या चेंडूवर अश्विन पायचीत, भारत ७ बाद २३५

लोकसत्ता टीम September 30, 20164:28 pm

वृद्धीमान साहाचा शानदार स्ट्रेट ड्राईव्ह

लोकसत्ता टीम September 30, 20164:30 pm

साहाचा कव्हर्सच्या दिशेने आणखी एक चौकार, भारत ७ बाद २३९

लोकसत्ता टीम September 30, 20164:33 pm

रवींद्र जडेजा पायचीत होण्यासाठीची अपील, पण पंचांचा नकार

लोकसत्ता टीम September 30, 20164:35 pm

हेन्रीच्या षटकात एकही धाव नाही, भारत ७ बाद २३९

लोकसत्ता टीम September 30, 20164:36 pm

आजच्या दिवसाचा खेळ कमी सुर्यप्रकाशामुळे ८६ षटकातच थांबवला, शेवटची चार षटके होऊ शकली नाहीत

लोकसत्ता टीम September 30, 20164:37 pm

पहिल्या दिवसाच्या अखेरीस भारत २३९/७ (साहा- १४, जडेजा- ० )

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 10:12 am

Web Title: live cricket score india vs new zealand ind vs nz 2nd test day 1 video streaming commentary eden gardens kolkata
Next Stories
1 भारताचा विजयरथ वर्चस्वासाठी सज्ज
2 सेल्टिकने मँचेस्टर सिटीला रोखले
3 पाकिस्तानला नमवून भारत अंतिम फेरीत
Just Now!
X