आश्विनच्या फिरकीच्या जोरावर भारताने तिसरा आणि अंतिम कसोटी सामना एक दिवस राखून तब्बल ३२१ धावांनी जिंकला आहे. भारताने दिलेल्या ४७५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय फिरकी समोर शरणागती पत्करली. सुरुवातील उमेश यादवने दिलेल्या धक्क्यातून सावरणाऱ्या न्यूझीलंडला आश्विन आणि जडेजाने सावरण्याची संधी दिली नाही. आश्विनने या सामन्यात तब्बल ७ गडी टीपले तर जडेजाने २ गडी बाद करुन भारताचा विजय सुकर केला. न्यूझीलंडकडून मार्टीन गप्तील हा एकमात्र फलंदाज भारतीय फिरकीसमोर तग धरताना दिसला. भारताच्या विजय लांबवत असलेल्या गप्तीलला जडेजाने तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजीला आश्विने सुरुंग लावला. यापूर्वी चौथ्या दिवशी चेतेश्वर पुजाराने शतक साजरे केल्यानंतर भारताने ३ बाद २१६ धावांवर डाव घोषित केला. चेतेश्वर पुजारा १०१ तर अजिंक्य रहाणे २० धावांची नाबाद खेळी केली.
भारताने दिलेल्या डोंगरा एवढ्या लक्षाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. उमेश यादवने सलामवीर लॅथमला पायचित करत भारताला पहिले यश मिळवून दिले. टॉम लॅथमनंतर मैदानात उतरलेला न्यूझीलंडचा कर्णधार संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र आश्विनने त्याला तंबूचा रस्ता दाखविला. कर्णधाराची जागा घेतलेल्या रॉस टेलरने आक्रमक खेळी करत भारतीय फिरकीचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न केला. टेलर स्थिरावत असताना आश्विनने त्याला चकवत भारताला तिसरे यश मिळवून दिले. त्यानंतर आश्विनने रॉंचीला बाद करत भारताला आणखी एक यश मिळवून दिले. मालिकेतील आश्विनचा हा २३ वा बळी होता. आश्विननंतर जडेजाने आपल्या फिरकीतील जादू दाखवली. रॉचीची जागा घेण्यासाठी आलेल्या जेम्सला त्याने खाते ही न खोलता चालते केले. त्यानंतर संयमी खेळी करणाऱ्या मार्टिन गप्तिलला बाद करत जडेजाने भारताच्या विजयातील मोठा अडथळा दुर केला.

Live Updates
17:00 (IST) 11 Oct 2016
भारताने तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना ३२१ धावांनी जिंकला.
17:00 (IST) 11 Oct 2016
न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावातही २९९ धावात गारद
16:42 (IST) 11 Oct 2016
न्यूझीलंड ९ बाद १४९ अशी अवस्था झाली असून वेटलिंग आणि बोल्ट भारताचा विजय लांबवताना दिसत आहे.
16:16 (IST) 11 Oct 2016
न्यूझीलंडच्या फलंदाजीला आश्विनने लावला सुरुंग, न्यूझीलंड ९ बाद १४२ धावा
16:13 (IST) 11 Oct 2016
भारत विजयाच्या उंबरठ्यावर
16:10 (IST) 11 Oct 2016
न्यूझीलंडला ८ वा झटका, आश्विनने जतीन पटेलला खाते न खोलू देता तंबूचा रस्ता दाखविला.
16:04 (IST) 11 Oct 2016
भारतीय फिरकीने न्यूझीलंडचे कंबरडे मोडले. आश्विनने न्यूझीलंडला दिला सातवा धक्का.
15:47 (IST) 11 Oct 2016
भारत तिसरी कसोटी जिंकण्यापासू चार पावले दुर आहे.
15:35 (IST) 11 Oct 2016
मार्टिन गप्तीलने ६० चेंडूत २९ धावांची संयमी खेळी केली.
15:34 (IST) 11 Oct 2016
संयमी खेळी करणाऱ्या मार्टिन गप्तीलला जडेजाने बाद केले.
15:33 (IST) 11 Oct 2016
न्यूझीलंडला ६ वा धक्का, भारताची कसोटीवर विजयाकडे वाटचाल
15:28 (IST) 11 Oct 2016
न्यूझीलंड ५ बाद १०३ धावा, मार्टिन गप्तील डावाला आकार देण्यासाठी संयमी खेळी करताना दिसत आहे.
15:26 (IST) 11 Oct 2016
न्यूझीलंडचा संघ भारतीय फिरकीसमोर हतबल, रविंद्र जडेजाने जेम्सला केले चालते.
15:23 (IST) 11 Oct 2016
आश्विनने आतापर्यंत तीन कसोटी मालिकेत २३ बळी टीपले आहेत.
15:21 (IST) 11 Oct 2016
न्यूझीलंडला चौथा धक्का, आश्विनने रॉचींला केले बाद
15:09 (IST) 11 Oct 2016
न्यूझीलंड संघ अद्याप ३९१ धावांनी पिछाडीवर आहे.
15:08 (IST) 11 Oct 2016
रॉस टेलरने २५ चेंडूमध्ये ५ चौकार आणि एका षटकारासह ३२ धावांचे योगदान दिले
15:05 (IST) 11 Oct 2016
न्यूझीलंडला तिसरा धक्का, आश्विनने रॉस टेलरला केले त्रिफळाचित
15:00 (IST) 11 Oct 2016
गप्तील आणि रॉस टेलर भारतीय फिरकीसमोर संयमी खेळी करताना दिसत आहेत.
14:52 (IST) 11 Oct 2016
अवघ्या १४ चेंडूत रॉस टेलरने आतापर्यंत ४ चौकार आणि एका षटकारासह २५ धावा केल्या आहेत.
14:46 (IST) 11 Oct 2016
कर्णधार विल्यम्सनची जागा घेतलेल्या रॉस टेलरची फटकेबाजी, न्यूझीलंड २ बाद ६१ धावा
14:44 (IST) 11 Oct 2016
न्यूझीलंडने संघाच्या ५० धावा पूर्ण केल्या
14:41 (IST) 11 Oct 2016
न्यूझीलंडला ४२ धावावर दुसरा झटका, न्यूझीलंडचा डाव सावरण्यासाठी टेलर मैदानात
14:38 (IST) 11 Oct 2016
कर्णधार विल्यम्सन २७ धावा करुन तंबूत परतला.
14:37 (IST) 11 Oct 2016
चौकारानंतर आश्विनने विल्यम्सनला केले पायचित, न्यूझीलंडवरील दबाव वाढला.
14:36 (IST) 11 Oct 2016
चौकार ठोकून दबाव कमी करण्याचा प्रयत्न
14:36 (IST) 11 Oct 2016
कर्णधार विलियम्सनचा आश्विनच्या गोलंदाजीवर आक्रमक पवित्रा
14:32 (IST) 11 Oct 2016
चहापानानंतर खेळाला सुरुवात, कर्णधार विराट कोहलीने जडेजाच्या हाती सोपविला चेंडू
14:16 (IST) 11 Oct 2016
कर्णधार विलियम्सन- २३ तर गप्तील ८ धावावर खेळत आहेत.
14:14 (IST) 11 Oct 2016
चहापानापर्यंत न्यूझीलंड १ बाद ३८ धावा
13:57 (IST) 11 Oct 2016
न्यूझीलंडच्या ६ षटकानंतर १ बाद १६ धावा.
13:57 (IST) 11 Oct 2016
कर्णधार विलियम्सन- ७ तर गप्तील २ धावावर खेळत आहेत.
13:40 (IST) 11 Oct 2016
न्यूझीलंडची खराब सुरुवात, उमेश यादवने लॅथमला दाखविला तंबूचा रस्ता
13:30 (IST) 11 Oct 2016
न्यूझीलंडला तिसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी ४७५ धावा कराव्या लागणार आहेत.
13:23 (IST) 11 Oct 2016
पुजाराने शतक साजरे केल्यानंतर भारताने ३ बाद २१६ धावांवर डाव घोषित केला.
13:19 (IST) 11 Oct 2016
चेतेश्वर पुजाराचे शतक
12:56 (IST) 11 Oct 2016
पुजारा आणि रहाणे मैदानावर भारताकडे ४४३ धावांची मजबूत आघाडी
12:55 (IST) 11 Oct 2016
४५ षटकानंतर भारत ३ बाद १८५
12:48 (IST) 11 Oct 2016
चेतेश्वर पुजाराची शतकाच्या दिशेने वाटचाल
12:43 (IST) 11 Oct 2016
भारताला तिसरा झटका, कर्णधार विराट कोलही १७ धावा करुन बाद
11:37 (IST) 11 Oct 2016
उपहारापर्यंत भारत १ बाद १२७ धावा, संघाकडे ३८५ धावांची आघाडी
11:34 (IST) 11 Oct 2016
चेतेश्वर पुजाराचे अर्धशतक
11:29 (IST) 11 Oct 2016
३३ व्या षटकानंतर भारत २ बाद ११७ (कोहली- १, पुजारा- ४५ )
11:23 (IST) 11 Oct 2016
गंभीर बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली मैदानात दाखल
11:23 (IST) 11 Oct 2016
३० षटकांच्या अखेऱीस भारत ११०/२
11:22 (IST) 11 Oct 2016
जीतन पटेलने घेतली गंभीरची विकेट, गंभीर ५० धावांवर झेलबाद
11:21 (IST) 11 Oct 2016
भारतीय संघाला दुसरा धक्का, गौतम गंभीर अर्धशतक ठोकून माघारी
11:15 (IST) 11 Oct 2016
गौतम गंभीरची ५४ चेंडूत अर्धशतकी खेळी, भारत मजबूज स्थितीत
11:15 (IST) 11 Oct 2016
गौतम गंभीरचे पुनरागमन, गंभीरने ठोकले शानदार अर्धशतक
11:13 (IST) 11 Oct 2016
भारतीय संघ ३६७ धावांनी आघाडीवर