चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत यावेळीसुद्धा फलंदाजीचा निर्णय घेतला. पाच सामन्यांच्या मालिकेत हा सामना जिंकत भारताने २-२ अशी बरोबरी साधण्यात यश मिळवले आहे.

भुवनेश्वर कुमार व हरभजन सिंग यांच्या दमदार गोलंदाजीने भारताचे ३०० धावांचे आव्हान गाठणे आफ्रिकेला काहीसे जड गेले. ५० षटकांत ९ गडी गमावत आफ्रिकेने २६४ धावा केल्या . तर भारतीय फलंदाजांपैकी धवन व रोहित ही जोडगोळी अवघ्या ३५ धावांत तंबूत परतल्याने प्रेक्षकानाराज झाले. मात्र विराट कोहली अजिंक्य रहाणे ही जोडी प्रेक्षकांच्या अपेक्षा पुर्ण करत तब्बल १०४ धावांच्या भागीदारी पर्यंत पोहोचली. दुर्दैव म्हणजे अजिंक्य रहाणे अर्धशतक होण्याआधी ४५ धावांवर बाद झाला.

भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ८ बाद २९९ धावा केल्या. विराट कोहलीच्या १३८ धावांच्या खेळीमुळे भारतीय संघाला ही धावसंख्या रचणे शक्य झाले. विराटने मोक्याच्या क्षणी अजिंक्य रहाणे आणि सुरेश रैना यांच्या साथीने महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या रचल्या. पाच सामन्यांच्या या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताला आजच्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे आता भारतीय गोलंदाज कशी कामगिरी करतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
तत्पूर्वी भारताने नाणेफेक जिंकून या सामन्यात प्रथम फलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन झटपट बाद झाल्यामुळे भारतीय संघ २ बाद ३५ अशा बिकट अवस्थेत सापडला होता. मात्र, त्यानंतर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेने भारतीय डावाची पडझड रोखत संघाचा धावफलक हलता ठेवला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी रचली. मात्र, त्यानंतर अजिंक्य रहाणे स्टेनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला, त्याने ५३ चेंडूत ४५ धावा केल्या. रहाणे बाद झाल्यानंतरही कोहलीने फटकेबाजी सुरू ठेवत सुरेश रैनाच्या साथीने संघाला २५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १२७ धावांची भागीदारी रचली. मात्र, सुरेश रैना ५३ धावांवर खेळत असताना स्टेनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.