News Flash

IPL2017 : कोलकात्याचा हैदराबादवर ७ विकेट्सने विजय, आता गाठ मुंबईशी

कर्णधार गौतम गंभीरची नाबाद ३२ धावांची निर्णायक खेळी

गौतम गंभीर

सनरायझर्स हैदराबादच्या आव्हानासोबतच कोलकाता नाईट रायडर्सने बुधवारी पावसाचे आव्हानही फोडून काढले. पावसाच्या व्यत्ययामुळे थांबविण्यात आलेला सामना अखेर ६ षटकांचा खेळविण्यात आला, त्यानुसार समोर मिळालेले ४८ धावांचे आव्हान कोलकाताने ७ विकेट राखून गाठले. गौतम गंभीर विजयाचा शिल्पकार ठरला. कोलकात्याचे ३ फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते. हैदराबादच्या भुवनेश्वर कुमार आणि ख्रिस जॉर्डनने प्रत्येकी एक-एक फलंदाजाला माघारी धाडण्यात यश मिळवलं. परंतू कर्णधार गौतम गंभीरच्या नाबाद ३२ धावांच्या निर्णायक फलंदाजीपुढे हैदराबादच्या गोलंदाजांचा टीकाव लागू शकला नाही.

खरंतर हैदराबादला १२८ धावांवर रोखल्यानंतर कोलकाताचेच पारडे जड असल्याचे चित्र होते. पण पहिल्या इनिंगनंतर पावसाने आपला खेळ सुरू केल्याने कोलकातावर निराशेचे ढग निर्माण झाले होते. कारण पावसामुळे सामना रद्द झाल्यास गुणतालिकेतील गुणांनुसार हैदराबादच्या बाजूने निकाल लागला असता. पण वरुणराजा शांत झाल्यानंतर सामन्याचे महत्त्व लक्षात घेता सामना खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला आणि पावसाच्या ‘गंभीर’ समस्येवर कोलकाताने मात करत आपली दावेदारी सिद्ध करून दाखवली.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या कोलकाताच्या संघाने हैदराबादला २० षटकांच्या अखेरीस ७ बाद १२८ धावांवर रोखलं आहे. कोलकातासमोर विजयासाठी १२९ धावांचं कमकुवत आव्हान होत. पहिल्या इनिंगनंतर बंगळुरूत जोरदार पावसाला सुरूवात झाली असून सामना सुरू होण्यास अडथळा निर्माण झाला आहे.

सामना पावसामुळे रद्द करावा लागल्यास गुणतालिकेनुसार हैदराबादला विजयी घोषित केलं जाईल आणि कोलकाताला याचा मोठा धक्का बसू शकतो. दरम्यान, कोलकाताच्या गोलंदाजांनी आज अचूक टप्प्यात गोलंदाजी करून हैदराबादच्या फलंदाजीवर चांगलाच अंकुश ठेवलेला पाहायला मिळाला. हैदराबादच्या सुरूवातीच्या चार महत्त्वाच्या शिलेदारांची विकेट घेण्यावर भर देऊन कोलकाताने हैदराबादला धक्का दिला.  शिखर धवन, डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन आणि युवराज सिंग हे स्वस्तात बाद झाले. संघाच्या धावसंख्येने शंभरचा आकडा देखील पार केला असताना हे चार फलंदाज बाद झाले होते. पुढे नमन ओझा (१६) आणि व्ही.शंकर(२२) यांनी तुरळक फटकेबाजी करून धावसंख्येला गती देण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या षटकात मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात हैदराबादचे फलंदाज बाद होत गेले आणि २० षटकांमध्ये हैदराबादला केवळ १२८ धावांपर्यंतच मजल मारता आली आहे. ़

कोलकाताकडून कूल्टर नीलने चार षटकांत केवळ २० धावा देऊन तीन विकेट घेतल्या. तर उमेश यादवने दोन आणि पियुष चावला, ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. पहिली काही षटकं खेळून काढल्यानंतर धावसंख्येला गती देण्यासाठी मोठा फटका खेळण्यासाठी सरसावलेला शिखर धवन विकेट टाकून बसला. पुढे वॉर्नरने संयमी खेळी करून डाव सावरण्यास सुरूवात केली होती. पियुष चावलाने केन विल्यमसनचा काटा काढला. त्याच षटकात वॉर्नर देखील क्लीनबोल्ड होऊन माघारी परतला. युवराजकडून चांगल्या खेळीची संघाला गरज असताना तो देखील केवळ ९ धावा काढून तंबूत दाखल झाला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 7:39 pm

Web Title: live cricket score ipl 2017 srh vs kkr sunrisers hyderabad vs kolkata knight riders match updates
Next Stories
1 IPL 2017 : आजचा सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होणार?
2 VIDEO: कोहलीने स्वत:चा पुरस्कार चाहत्याला दिला!
3 विश्वविक्रमी खेळी केल्याचे ‘वॉट्सअ‍ॅप’मुळे समजले-पूनम राऊत
Just Now!
X