भारत आणि इंग्लंड यांच्यात विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या दुसऱया कसोटीत भारतीय संघाने पहिल्या दिवसाच्या अखेरीस ४ बाद ३१७ धावा केल्या. विराटने कर्णधारी खेळी करून नाबाद १५१ धावा केल्या, तर पुजाराने आपला दमदार फॉर्म कायम राखत शतकी खेळी साकारली. विराट आणि पुजाराच्या २२६ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाला दिवसाच्या अखेरीस ३०० धावांचा टप्पा ओलांडता आला.

सामन्याचा नाणेफेक जिंकून फलंदाजी स्विकारलेल्या भारतीय संघाची सुरूवात निराशाजनक झाली होती. संघाची सलामी जोडी स्वस्तात बाद झाली. गौतम गंभीरऐवजी संघात स्थान देण्यात आलेला लोकेश राहुल सामन्याच्या दुसऱयाच षटकात शून्यावर बाद झाला. चांगल्या फॉर्मात असलेला मुरली विजय इंग्लंडच्या जेम्स अँडरसनच्या बाऊन्सवर झेलबाद झाला. विजयने २० धावा केल्या. पहिले दोन फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी संघाच्या धावसंख्येला आकार दिला. उपहारापर्यंत भारत २ बाद ९२ धावा अशा स्थितीत होता. दुसऱया सत्रात कोहली आणि पुजारा यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना पुनरागमनाची संधी न देता मैदानात जम बसवला. तिसऱया सत्रात पुजाराने रशीदला खणखणीत षटकार ठोकून आपले शतक साजरे केले, तर विराट कोहलीने १५६ चेंडूत शतक ठोकून आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीतील आपले १४ वे शतक पूर्ण केले. पुजारा आणि कोहली यांनी तिसऱया विकेटसाठी २२६ धावांची भागीदारी केली. पुजारा ११९ धावांवर जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक बेअरस्टोकरवी झेलबाद होऊन माघारली परतला. पुजारा तंबूत दाखल झाल्यानंतर रहाणने संयमी सुरूवात केली, पण आजच्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी केवळ चार षटकांचा खेळ शिल्लक असताना रहाणेने विकेट टाकली. जेम्स अँडरसनला तिसरी विकेट मिळाली. रहाणे २३ धावांवर झेलबाद झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कोहली नाबाद १५१ धावांवर खेळत आहे. इंग्लंडकडून कोणत्याही फिरकीपटूला यश आलेले पाहायला मिळाले नाही. वेगवान गोलंदाज अँडरसनने तीन विकेट्स मिळवल्या, तर स्टुअर्ट ब्रॉडला एक विकेट मिळाली.

Cricket Score of India vs England- दिवसभरातील अपडेट्स 

Live Updates
16:53 (IST) 17 Nov 2016
पहिल्या दिवसाच्या अखेरीस भारत ४ बाद ३१७ धावा, विराटची नाबाद १५१ धावांची खेळी
16:53 (IST) 17 Nov 2016
तिसऱया सत्रात ३३.४ षटकांचा खेळ आणि १०७ धावा, २ विकेट्स
16:52 (IST) 17 Nov 2016
स्टुअर्ट ब्रॉडकडून निर्धाव षटक, भारत ४ बाद ३१७ धावा
16:52 (IST) 17 Nov 2016
ब्रॉडकडून पाचवा चेंडू बाऊन्सर, अश्विनने चेंडू सोडला
16:51 (IST) 17 Nov 2016
चौथ्या चेंडूवर अश्विनचा स्ट्रेट ड्राईव्ह फटका, पण चेंडू यष्टीला आदळला
16:51 (IST) 17 Nov 2016
दुसरा आणि तिसरा चेंडू देखील निर्धाव, स्ट्राईकवर अश्विन
16:49 (IST) 17 Nov 2016
शेवटचे षटक टाकतोय स्टुअर्ट ब्रॉड, पहिला चेंडू निर्धाव
16:48 (IST) 17 Nov 2016
आजच्या दिवसातील शेवटचे षटक
16:48 (IST) 17 Nov 2016
रहाणे बाद झाल्यानंतर अश्विन फलंदाजीसाठी मैदानात
16:46 (IST) 17 Nov 2016
जेम्स अँडरसनने घेतली रहाणेची विकेट, रहाणे २३ धावांवर झेलबाद
16:44 (IST) 17 Nov 2016
अखेरच्या काही षटकांचा खेळ शिल्लक असताना रहाणे झेलबाद
16:44 (IST) 17 Nov 2016
कोहलीची दीडशतकी खेळी, भारत ३ बाद ३१५ धावा
16:34 (IST) 17 Nov 2016
शेवटच्या पाच षटकांचा खेळ शिल्लक
16:30 (IST) 17 Nov 2016
८५ षटकांच्या अखेरीस भारत ३ बाद ३०४ धावा. (कोहली- १४६ , रहाणे- १७ )
16:26 (IST) 17 Nov 2016
भारताच्या धावसंख्येने ३०० चा आकडा ओलांडला
16:26 (IST) 17 Nov 2016
रहाणेचा कव्हर ड्राईव्ह, दोन धावा
16:22 (IST) 17 Nov 2016
अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली यांची अर्धशतकी भागीदारी
16:12 (IST) 17 Nov 2016
इंग्लंडचा रिव्ह्यू वाया गेला, कोहली बचावला
16:11 (IST) 17 Nov 2016
इंग्लंडकडून रिव्ह्यूची मागणी
16:11 (IST) 17 Nov 2016
कोहलीच पायचीत झाल्याची अपील, पण पंचांचा नकार
16:08 (IST) 17 Nov 2016
कोहलाची मिड विकेट आणि मिड ऑनच्यामधून फटका, पण केवळ एकच धाव
16:03 (IST) 17 Nov 2016
रहाणे आणि कोहलीची मैदानात संयमी फलंदाजी
15:53 (IST) 17 Nov 2016
रहाणेचा थर्ड मॅनच्या दिशेला चौकार, भारत ३ बाद २७६
15:51 (IST) 17 Nov 2016
७४ षटकांच्या अखेरीस भारत ३ बाद २६३ धावा. (कोहली- १२७, रहाणे- ३)
15:37 (IST) 17 Nov 2016
जेम्स अँडरसनने घेतली पुजाराची विकेट, यष्टीरक्षक बेअरस्टोकरवी पुजारा झेलबाद
15:37 (IST) 17 Nov 2016
भारतीय संघाला तिसरा धक्का, चेतेश्वर पुजारा ११९ धावांवर बाद
15:00 (IST) 17 Nov 2016
कोहलीने १५६ चेंडूत पूर्ण केले शतक
14:59 (IST) 17 Nov 2016
विराट कोहलीचे १४ वे आंतरराष्ट्रीय कसोटी शतक पूर्ण
14:58 (IST) 17 Nov 2016
कोहलीचा शानदार कव्हर ड्राईव्ह आणि शतक पूर्ण
14:57 (IST) 17 Nov 2016
विराट कोहली स्ट्राईकवर, विराट खेळतोय ९९ धावांवर
14:57 (IST) 17 Nov 2016
गोलंदाजीत बदल, अँडरसनला पाचारण
14:56 (IST) 17 Nov 2016
६२ षटकांच्या अखेरीस भारत २ बाद २२९ धावा. (पुजारा- १०७, कोहली- ९९)
14:55 (IST) 17 Nov 2016
कव्हर्सच्या दिशेने एक धाव, कोहली पोहोचला ९९ धावांवर
14:55 (IST) 17 Nov 2016
कोहलीकडून रशीदचा दुसरा चेंडू निर्धाव
14:54 (IST) 17 Nov 2016
रशीदच्या गोलंदाजीवर पुजाराकडून एक धाव, कोहली स्ट्राईकवर
14:54 (IST) 17 Nov 2016
६१ षटकांच्या अखेरीस भारत २ बाद २२७ धावा. (कोहली- ९८, पुजारा- १०६)
14:52 (IST) 17 Nov 2016
पुजाराकडून एक धाव, कोहली स्ट्राईकवर
14:50 (IST) 17 Nov 2016
आता विराट कोहली शतकाच्या जवळ
14:47 (IST) 17 Nov 2016
चेतेश्वर पुजाराचे दहावे आंतरराष्ट्रीय कसोटी शतक
14:47 (IST) 17 Nov 2016
चेतेश्वर पुजाराने खणखणीत षटकार ठोकून साजरे केले शतक
14:46 (IST) 17 Nov 2016
पुजारा स्ट्राईकवर, रशीद टाकतोय षटक
14:44 (IST) 17 Nov 2016
कोहलीचा फाईन लेगला चौकार, कोहली पोहोचला ९८ धावांवर
14:44 (IST) 17 Nov 2016
स्टुअर्ट ब्रॉड करतोय गोलंदाजी, पहिले चार चेंडू निर्धाव
14:41 (IST) 17 Nov 2016
पुजाराचा दमदार शॉट, ५८ षटकांच्या अखेरीस भारत २ बाद २१५ धावा. (पुजारा- ९९, कोहली- ९४)
14:41 (IST) 17 Nov 2016
तिसऱया सत्राच्या खेळा सुरूवात
14:13 (IST) 17 Nov 2016
दुसऱया सत्राच्या अखेरीस भारत २ बाद २१० धावा. (कोहली- ९१, पुजारा- ९७)
14:12 (IST) 17 Nov 2016
स्टेडियमवर श्वानाच्या संचारामुळे खेळात व्यत्यय, दुसऱया सत्राचा खेळ संपला
14:05 (IST) 17 Nov 2016
५५ षटकांच्या अखेरीस भारत २ बाद २०८ धावा. (पुजारा- ९६, कोहली- ९०)
14:03 (IST) 17 Nov 2016
चेतेश्वर पुजाराचा दमदार स्वेअर ड्राईव्ह चौकार
13:59 (IST) 17 Nov 2016
५४ षटकांच्या अखेरीस भारत २ बाद २०३ धावा. (पुजारा- ९२, कोहली- ८९ )