कोलकाता कसोटीत पहिल्या दिशवी चाचपडणाऱया भारतीय संघाने आता दुसऱया दिवसाअखेर सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे. कसोटीच्या दुसऱया दिवशी वृद्धीमान साहाने चांगली फटकेबाजी करून नाबाद ५४ धावा केल्या. साहाच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाला ३०० धावांची वेस ओलांडला आली. भारतीय संघाने पहिल्या डावात ३१६ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंंडची सुरूवात निराशाजनक झाली. भुवनेश्वर कुमारने यावेळी भेदक मारा करत तब्बल ५ विकेट्स मिळवल्या.
मोहम्मद शमीने लॅथमला माघारी धाडून संघाला पहिले यश मिळवून दिले होते. त्यानंतर भुवनेश्वरने मार्टिन गप्तीलचा त्रिफळा उडवला. रवींद्र जडेजाने तिसरी विकेट मिळवली. त्यानंतर लगेचच पावसाच्या व्यत्ययामुळे सामाना काही काळ थांबविण्यात आला. पावसाच्या व्यत्ययानंतर भुवनेश्वरने आपली जादू दाखवून ठराविक अंतराने किवींच्या फलंदाजांना माघारी धाडले. भुवनेश्वरने एकाच षटकात दोन विकेट्स घेतल्या.
दुसऱया दिवसाचा खेळ संपला त्यावेळी न्यूझीलंडची धावसंख्या ७ बाद १२८ अशी होती. भारतीय संघाकडे अजूनही १८८ धावांची आघाडी आहे. त्यामुळे आता तिसऱया दिवशी देखील भारतीय गोलंदाज न्यूझीलंडचा डाव ३१६ धावांच्या आत रोखणार का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

तत्पूर्वी, कसोटीच्या दुसऱया दिवशी वृद्धीमान साहाने जोरदार फटकेबाजी करत नाबाद ५४ धावांचे योगदान दिले. त्यामुळे भारतीय संघाला. कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने ७ विकेट्सच्या मोबदल्यात २३९ धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतकी खेळी साकारली. कोलकाता कसोटीचा नाणेफेक जिंकून भारतीय संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण भारतीय संघाची सुरूवात निराशाजनक झाली होती. लोकेश राहुल दुखापतग्रस्त असल्याने संघात संधी मिळालेला शिखर धवन केवळ एक धाव करून माघारी परतला. त्यानंतर मुरली विजय देखील यावेळी मोठी खेळी करू शकला नाही. दोघांनाही न्यूझीलंडच्या मॉट हेन्रीने माघारी धाडले. कर्णधार कोहलीकडून चांगल्या खेळीची अपेक्षा केली जात असताना त्यानेही निराशा केली. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर कव्हर्सच्या दिशेने फटका मारण्याच्या नादात कोहलीच्या बॅटला स्पर्श करून गेलेला चेंडू गलीमध्ये उभ्या असलेल्या लॅथमच्या हातात विसावला. कोहली केवळ ९ धावा करून माघारी परतला. भारतीय संघाचे पहिले तीन शिलेदार स्वस्तात माघारी परतल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी भारतीय संघाचा डाव सावरून मैदानात चांगलाच जम बसवला. पुजाराने ८७ धावांचे, तर अजिंक्य रहाणेने ७७ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान देऊन भारतीय संघाला सावरले. रहाणे बाद झाल्यानंतर रोहित शर्मा आणि अश्विन देखील प्रत्येकी २ आणि २६ धावांवर माघारी परतले. पहिल्या दिवसाचा खेळ संपूर्ण ९० षटकांचा होऊ शकला नाही. कमी सुर्यप्रकाशामुळे खेळ ८६ षटकांमध्येच थांबविण्यात आला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या ७ बाद २३९ अशी आहे. रवींद्र जडेजा(०) आणि वृद्धीमान साहा(१४) धावांवर खेळत आहेत. न्यूझीलंडकडून हेन्रीने तीन, तर फिरकीपटू जीतन पटेल याने दोन विकेट्स घेतल्या. बोल्ट आणि वँगर यांनीही प्रत्येकी एक विकेट मिळवली होती.

India vs New Zealand – दिवसाभरातील अपडेट्स

Live Updates
16:54 (IST) 1 Oct 2016
कोलकाता कसोटीत भारतीय संघ मजबूत स्थितीत, भारताकडे अजूनही १८८ धावांची आघाडी
16:51 (IST) 1 Oct 2016
कमी सुर्यप्रकाशामुळे आजच्या दिवसाचा खेळ थांबवला, न्यूझीलंड १२८/७
16:50 (IST) 1 Oct 2016
भुवनेश्वर कुमार मिळवल्या पाच विकेट्स, न्यूझीलंड १२८/७
16:50 (IST) 1 Oct 2016
सँटनरच्या विकेटनंतर पुढच्याच चेंडूवर हेन्री खाते न उघडताच त्रिफळाबाद होऊन माघारी
16:49 (IST) 1 Oct 2016
भुवनेश्वर कुमारने पुन्हा एकदा संघाला मिळवून दिले यश, सँटनरला धाडले माघारी
16:49 (IST) 1 Oct 2016
सँटनर आणि वॉल्टिंग यांच्याकडून डाव सावरण्याचा प्रयत्न
16:45 (IST) 1 Oct 2016
भुवनेश्वर कुमारने काढला रॉस टेलरचा काटा, न्यूझीलंड १०४/५
16:44 (IST) 1 Oct 2016
जडेजाने राँचीला धाडले माघारी
16:43 (IST) 1 Oct 2016
न्यूझीलंडच्या धावसंख्येने शतक ओलांडले
16:41 (IST) 1 Oct 2016
तासा भराच्या व्यत्ययानंतर खेळाला सुरूवात
13:37 (IST) 1 Oct 2016
न्यूझीलंड अजूनही २३१ धावांनी पिछाडीवर, पावसामुळे खेळात व्यत्यय
13:32 (IST) 1 Oct 2016
ईडन गार्डन्सवर पावसाचे आगमन, खेळ थांबवला
13:32 (IST) 1 Oct 2016
जडेजाच्या फिरकीवर राँची पायचीत, राँची ३५ धावा करून तंबूत
13:31 (IST) 1 Oct 2016
भारतीय संघाला चौथे यश, जडेजाने घेतली ल्यूक राँचीची विकेट
13:20 (IST) 1 Oct 2016
२१ वे षटक निर्धाव, न्यूझीलंड ७४/३
13:11 (IST) 1 Oct 2016
रॉस टेलरचा गलीमध्ये उत्कृष्ट फटका, चौकार
13:09 (IST) 1 Oct 2016
१८ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड ३ बाद ७० धावा
13:06 (IST) 1 Oct 2016
जडेजा पंचांचा निकालावर नाखूष
13:06 (IST) 1 Oct 2016
जडेजाच्या गोलंदाजीवर राँचीच्या पायचीतची भारतीय संघाची अपील, पण पंचांचा नकार
13:03 (IST) 1 Oct 2016
रॉस टेलरचा आणखी एक चौकार, न्यूझीलंड ३ बाद ६५
13:03 (IST) 1 Oct 2016
रॉस टेलरचा शानदार स्विप, डीप स्वेअर लेगच्या दिशेने चौकार
13:02 (IST) 1 Oct 2016
राँचीला अश्विनला चौकार, न्यूझीलंड ३ बाद ५६
13:01 (IST) 1 Oct 2016
जडेजाकडून निर्धाव षटक, न्यूझीलंड ३ बाद ५२ धावा
12:57 (IST) 1 Oct 2016
पहिले तीन फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर रॉस टेलर आणि ल्यूक राँची यांचा सावध पवित्रा
12:48 (IST) 1 Oct 2016
राँचीची सुरूवातीपासूनच चांंगली फटकेबाजी
12:48 (IST) 1 Oct 2016
कर्णधार रॉस टेलर आणि ल्यूक राँचीवर न्यूझीलंडच्या धावसंख्येला सावरण्याची मदार
12:48 (IST) 1 Oct 2016
भुवनेश्वरच्या स्विंगवर न्यूझीलंडच्या फलंदाजांचा भंबेरी, न्यूझीलंड ३ बाद २८
12:42 (IST) 1 Oct 2016
भुवनेश्वर कुमारची भेदक गोलंदाजी, हेन्री निकोल्स क्लिन बोल्ड
12:41 (IST) 1 Oct 2016
उपहारानंतरच्या खेळाला सुरूवात, न्यूझीलंड २ बाद २१
11:35 (IST) 1 Oct 2016
पाच षटकांच्या अखेरीस न्यूझीलंड २ बाद २१ धावा
11:33 (IST) 1 Oct 2016
मोहम्मद शमीने लॅथला (१) पायचीत केले, त्यानंतर भुवनेश्वर कुमारने गप्तीलचा त्रिफळा उडवला
11:32 (IST) 1 Oct 2016
न्युझीलंडला सुरूवातीलाच दोन धक्के, मार्टिन गप्तील आणि लॅथम स्वस्तात बाद
10:58 (IST) 1 Oct 2016
भारतीय संघाची पहिल्या डावात ३१६ धावांपर्यंत मजल
10:57 (IST) 1 Oct 2016
मोहम्मद शमीचा डीप बॅकवर्ड स्वेअर लेगवर हेन्रीने टीपला अफलातून झेल, भारत सर्वबाद ३१६
10:54 (IST) 1 Oct 2016
ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर शमीचा थर्ड मॅनच्या दिशेने चौकार, भारत ३१६/९
10:44 (IST) 1 Oct 2016
मोहम्मद शमीकडून फटकेबाजी, वँगरच्या गोलंदाजीवर डीप बॅकवर्ड स्वेअर लेगच्या दिशेने चौकार
10:42 (IST) 1 Oct 2016
साहाचा लाँग ऑफच्या दिशेने उत्तुंग षटकार आणि अर्धशतक देखील पूर्ण
10:42 (IST) 1 Oct 2016
साहाकडून आक्रमक फलंदाजी, लाँग ऑनच्या दिशेने चौकार
10:40 (IST) 1 Oct 2016
वृद्धीमान साहाचा सँटनरला शॉर्ट फाईन गेलच्या दिशेने फटका, दोन धावा
10:36 (IST) 1 Oct 2016
वृद्धीमान साहाचा वँगरला कव्हर्सच्या दिशेने शानदार चौकार, भारत ९ बाद २९१
10:34 (IST) 1 Oct 2016
एकूण १०० षटकांचा खेळ पूर्ण, भारत ९ बाद २८५
10:34 (IST) 1 Oct 2016
मोहम्मद शमीचा शानदार फ्लिक, चौकार
10:31 (IST) 1 Oct 2016
सँटनरच्या फिरकीवर भुवनेश्वर कुमार पायचीत, भारतीय संघाची नववी विकेट
10:31 (IST) 1 Oct 2016
पुन्हा एकदा पुढच्याच चेंडूवर भुवनेश्वर कुमार पायचीत झाल्याची अपील, न्यूझीलंडला यश
10:30 (IST) 1 Oct 2016
सँटनरच्या गोलंदाजीवर भुवनेश्वर कुमार पायची बाद झाल्याची अपील, पण पंचांचा नकार
10:20 (IST) 1 Oct 2016
९७ षटकांच्या अखेरीस भारत ८ बाद २७६
10:19 (IST) 1 Oct 2016
भुवनेश्वर कुमारचा गलीच्या दिशेने नजाकती फटका, चौकार
10:19 (IST) 1 Oct 2016
जडेजा बाद झाल्यानंतर, भुवनेश्वर कुमार फलंदाजीसाठी मैदानात दाखल
10:18 (IST) 1 Oct 2016
वँगरच्या बाऊन्सरवर पूल शॉट मारताना लाँग लेगला जडेजाचा झेल टीपला, भारत ८ बाद २७२
10:16 (IST) 1 Oct 2016
भारतीय संघाला धक्का, रवींद जडेजा झेलबाद