21 September 2020

News Flash

live: भारता समोर जिंकण्यासाठी १६८ धावांचे लक्ष्य

आयसीसी चॅम्पियन्स करंडक मालिकेतील आज शनिवार भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा नाणेफेक भारताने जिंकला असून, भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत-पाकिस्तान.. जागतिक नकाशावरील ही

| June 15, 2013 02:38 am

आयसीसी चॅम्पियन्स करंडक मालिकेतील आज शनिवार भारत विरुद्ध पाकिस्तान  सामन्यात पाकिस्तानने ३९.४ षटकांत सर्वबाद १६५ धावा केल्या. रिव्हाईज टार्गेट नूसार भारता समोर जिंकण्यासाठी १६८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पावसाच्या व्यत्ययानंतर सामना ४० षटकांचा करण्यात आला होता.

सामन्याचा नाणेफेक भारताने जिंकला व भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाची सावधगिरी गोलंदाजी सुरू होती. त्यात भुवनेश्वर कुमारला यशही मिळाले. नासीर जमशेदला स्वस्तात बाद करण्यात भुवनेश्वरला यथ मिळाले. त्यानंतर मोह्हमद हाफिजलाही भुवनेश्वरने २७ धावांवर गुंडाळले. भारताचा फिरकी गोलंदाज आर.अश्विनलाही  एक विकेट मिळाला. त्याने कमरान अकमल याला त्याच्या वैयक्तिक २१ धावांवर तंबूत धाडले. सामन्यावर भारताची पकड निर्माण होण्यास सुरूवात झालीच होती आणि पावसाचे आगमन झाले. त्यामुळे सामना थांबविण्यात आला होता.

भारत-पाकिस्तान.. जागतिक नकाशावरील ही भौगोलिकदृष्टय़ा ‘शेजारी-शेजारी’ राष्ट्रे.. जेव्हा-जेव्हा हे दोन संघ एकमेकांसमोर कोणत्याही खेळात आमने-सामने उभे ठाकतात, तेव्हा त्या सामन्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते.. आशा-निराशेचे हिंदोळे, भावनिकता, उत्कंठा हे सारे भाव त्या सामन्याशी जुळतात.. दोन्ही देशांचे क्रिकेटवर निस्सीम प्रेम.. आज हे ‘पक्के शेजारी’ साता समुद्रापार इंग्लंडच्या भूमीवर चॅम्पियन्सचा सामना खेळत आहेत.. या सामन्याच्या जय-पराजयाने तसा दोन्ही संघांना फरक पडणार नाही.. परंतु तरीही परंपरागत प्रतिस्पध्र्यामधील प्रतिष्ठा या सामन्याच्या निमित्ताने नक्कीच डावावर असेल.

प्रतिस्पर्धी संघ –
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), आर. अश्विन, शिखर धवन, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, इरफान पठाण, सुरेश रैना, इशांत शर्मा, रोहित शर्मा, मुरली विजय, विनय कुमार आणि उमेश यादव.
पाकिस्तान : मिसबाह-उल-हक (कर्णधार), नासिर जमशेद, मोहम्मद हाफीझ, इम्रान फरहत, कमरान अकमल, शोएब मलिक, असद शफिक, सईद अजमल, जुनैद खान, मोहम्मद इरफान, असद अली, वहाब रियाझ, उमर अमिन, अब्दुल रेहमान आणि एहसान अदिल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2013 2:38 am

Web Title: live india against pakistan
Next Stories
1 शनिवारची रंगत.. भारत-पाकिस्तान सामन्यासंगत
2 इंडोनेशिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा : सायना उपांत्य फेरीत
3 मेस्सीला तुरुंगवास होण्याची शक्यता
Just Now!
X