दिल्ली डेअरडेव्हिल्सनी त्यांच्या होमपीचवर म्हणजेच फिरोजशाह कोटला स्टेडियमवर किंग्ज इलेव्हन पंजाबचा ५१ रन्सने पराभव केला आहे. मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करताना दिल्लीने १८८ रन्सचा डोंगर उभारला. दिल्लीच्या पहिल्या दोन विकेट्स काहीशा झटपट गेल्या पण पण नंतर ख्रिस माॅरिस आणि कोरी अँडरसनने केलेल्या फटकेबाजीमुळे दिल्लीच्या डावाला आकार आला, हाणामारीच्या ओव्हर्समध्ये, विशेषत: शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये दिल्लीच्या बॅट्समननी केलेल्या तुफान फोडाफोडीमुळे दिल्लीला ६ विकेट्सच्या मोबदल्यात १८८ रन्सची मजल मारता आली. ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये कुठल्याही टीमसाठी ही धावसंख्या मोठीच आहे.

१८८ चा पाठलाग करताना किंग्स इलेव्हन पंजाबची दमछाक झाली. टप्प्याटप्प्याने त्यांच्या विकेट्स पडत गेल्या. त्यातही डेव्हिड मिलर आणि इयन माॅर्गनची जोडी जमत आहे असं वाटत होतं. हे दोघे पिचवर आणखी काही काळ थांबले असते तर चुरशीची मॅच पहायाला मिळाली असती पण ही जोडी फुटली आणि काही वेळातच पंजाबची ८८/६ अशी दयनीय अवस्था झाली. यापुढे पंजाबला योग्य ती धावगती राखता आली नाही. १३३ रन्सच्या संख्येवर पंजाबचे दोन बॅट्समन झटपट आऊट झाले. आणि शेवटी दिल्लीच्या पदरात विजय पडसा

या  मोसमामध्ये पंजाबची टीम याआधी चार मॅचेस् खेळली होती. तर दिल्लीची टीम तीन मॅचेस खेळली होती. पहिल्या मॅचमध्ये राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूविरोधात हार पत्कराव्या लागलेल्या दिल्लीने दुसऱ्या मॅचमध्ये चांगली मुसंडी मारली. पंजाबने या मोसमाची सुरूवात विजयाने केली. पण कोलकाता नाईट रायडर्सविरोधात त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

LIVE UPDATES

११:३४- दिल्लीचा पंजाबवर ५१ रन्सने विजय

११:३३- पंजाब १३३/८ ,दिल्ली विजयाच्या उंबरठ्यावर

११:०५-  अक्षर पटेलचा धुवाधार सिक्सर, पण मॅचवर दिल्लीचीच पकड

११:०२- पंजाब ८८/६, मॅचचं पारडं दिल्लीच्या बाजूने

१०:५२- पंजाबला दोन हादरे, मॅचवर दिल्लीचं वर्चस्व

१०:१३- पंजाबची दुसरी विकेट, हाशिम अमला आऊट, पंजाब २१-२

१०:०३- पंजाबला पहिला धक्का, मनन वोहरा पायचीत

९:४२- २० ओव्हरमध्ये दिल्लीचा १८८ रन्सचा डोंगर

९:३३-  कोरी अँडरसन आऊट

९:२५- माॅरिसचा जबरदस्त सिक्सर, दिल्ली १४०-५

९:२२- अँडरसनचा कडकडीत फोर

९:१७: ऋषभ पंत आऊट, दिल्लीचा निम्मा संघ १२० रन्समध्ये तंबूत

९:०४- दिल्लीला चौथा धक्का, १०३-४

८:५९- श्रेयस अय्यर आऊट, दिल्ली ९६-३

८:५३- दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या दोन विकेटस्

८:२७- पहिला स्ट्रॅटेजिक टाईमआऊट

८:२० बिलिंग्जचा आक्रमक खेळ, डेअरडेव्हिल्स ३९-०

८:00-  मॅचला सुरूवात, संजू सॅमसन आणि बिलिंग्ज ओपनर्स