25 November 2020

News Flash

LIVE IPL 2017 MI vs GL- ‘राणा’जींची बॅट चालतेय की; मुंबईचा सलग चौथा विजय

नितीश राणाच्या अर्धशतकाने रैनाच्या गुजरातची दैना

मुंबई इंडियन्स विरूध्द गुजरात

मुंबई इंडियन्सनी आपल्या घरच्या मैदानात गुजरात लायन्सवर ६ विकेट्सने विजय मिळवला आहे. मॅचमध्ये गुजरातने १७६/४ अशी धावसंख्या उभारली. पण १९.२ ओव्हर्समध्येच मुंबईने हे लक्ष्य पार केलं. १०० रन्स होण्याआधीच मुंबईचे तीन बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये परतले होते. त्याआधी नितिश राणा आणि जाॅस बटलरने चांगली खेळी करत इंडियन्सचा डाव सावरला. नितिश राणाने अर्धशतक झळकावलं. इनिंग्जच्या दुसऱ्याच बाॅलला मुंबई इंडियन्सना धक्का बसला. पार्थिव पटेल एक चुकीचा फटका मारून झेलबाद झाला. पण त्यानंतर नितीश राणा आणि जाॅस बटलरने मुंबईचा सावरला. मुंबई इंडियन्सच्या बाॅलिंगच्या वेळीही मॅचच्या पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी गुजरातला झटका दिला होता. मॅचच्या पहिल्याच ओव्हरमध्ये गुजरातचा ड्वेन स्मिथ आऊट झाला. मॅचच्या पहिल्याच ओव्हरमध्ये मॅक्लीनगनने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर रैना आणि मॅकलमने गुजरातचा डाव सावरला. मॅकलमने अर्धशतक पूर्ण केलं पण त्यांचा अडसरही मुंबईने दूर केला. त्यानंतर मॅकलमची भूमिका दिनेश कार्तिकने बजावत गुजरातला चांगल्या स्कोअरपर्यंत नेलं.

मुंबई इंडियन्सच्या दृष्टीने आज एक जमेची बाब म्हणजे मॅच त्यांच्या होमपीचवर होती. वानखेडे स्टेडियमवर ही मॅच होत असल्याने घरच्या प्रेक्षकांसमोर पुन्हा एकदा विजय मिळवण्याची संधी मुंबई इंडियन्सना होती. त्या संधीचं त्यांनी सोनं केलं

LIVE UPDATES:

७:४०: मुंबईचा सलग चौथा विजय गुजरातला ६ विकेट्सने हरवलं

७:३४- कायरन पोलार्ड आऊट, मॅचचा निकाल शेवटच्या दोन ओव्हरमध्ये

७:२७- विजय मुंबईच्या दृष्टिपथात

७:१६- पाॅलार्डच्या दोन बाॅल्समध्ये १० रन्स

६:४९- विकेटकीपरकडे कॅच देत नितीश राणा (५३) पॅव्हेलियनमध्ये

६:४६- नितीश राणाचं शानदार अर्धशतक

६:४२- नितीश राणाचा शानदार फोर. जिंकण्यासाठी मुंबईला ७७ बाॅल्समध्ये ११० रन्सची आवश्यकता

६:२८- जाॅस बटलरचा मजेदार सिक्सर

६:१३- मुंबईच्या नितीश राणाला जेसन राॅयकडून जीवदान

६:0६- मुंबईला पहिला धक्का, पार्थिव पटेल दुसऱ्याच बाॅलला झेलबाद

५:४९- २० ओव्हर्सनंतर गुजरात लायन्सचा स्कोअर १७६/४

५:३७- इशान किशन झेलबाद गुजरात १५३/४

५:१४- दिनेश कार्तिकचा लेगसाईडला सिक्सर!

५:०२- ‘डेंजरमॅन’ ब्रेंडन मॅकलम क्लीनबोल्ड

५:०२- ब्रेंडन मॅकलमची हाणामारी सुरूच, लेगसाईड मोठा सिक्सर

४:५५- गुजरातचा सुरेश रैना आऊट

४:५२- गुजरात लायन्सच्या मॅकलमचं अर्धशतक पूर्ण

४:३७- ब्रेंडन मॅकलम आणि सुरेश रैना मोठ्या पार्टनरशिपच्या दिशेने

४:३८- गुजरात लायन्सने ५० चा आकडा गाठला

४:३०-  सिक्सर! मलिंगाच्या बाॅलिंगवर मॅकलमचा सिक्सर

४:०१ – गुजरातची पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट पडली, ड्वेन स्मिथ माघारी

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2017 3:56 pm

Web Title: live score ipl 2017 mi vs gl
Next Stories
1 Singapore Open Final: साई प्रणीतने पटकावले सिंगापूर ओपनचे विजेतेपद; अंतिम फेरीत श्रीकांतचा पराभव
2 श्रीकांत, प्रणीत सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीत; दोन भारतीयांमध्ये होणार महामुकाबला
3 अहंकाराचे वगनाटय़!
Just Now!
X