News Flash

Ind vs Sri Lanka 1st Test Day 4 Updates : गॉल कसोटीत भारताचा झेंडा, मालिकेत १-० ने आघाडी

भारतीय आक्रमणासमोर श्रीलंका ढेपाळली

लंकादौऱ्याची सुरुवात विजयाने

गॉल कसोटीत भारताने श्रीलंकेवर तब्बल ३०४ धावांनी मात करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात भारताच्या फिरकी माऱ्यासमोर श्रीलंकेचा संघ टिकला नाही. त्यातचं श्रीलंकेचे २ खेळाडू हे दुखापतीमुळे फलंदाजी करुच शकले नाही, त्यामुळे भारताला हा सामना जिंकायला आणखीनचं मदत झाली. पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही श्रीलंकेच्या फलंदाजीने भारताच्या गोलंदाजीचा निट सामना केला नाही. ठराविक फलंदाजांचा अपवाद वगळता इतर सर्व फलंदाज लागोपाठ बाद झाले. अखेरच्या फलंदाजांनी कोणत्याही प्रकारे प्रतिकार न करता सरळ विकेट फेकत सामना भारताला बहाल केला.

दुसऱ्या फेरीत श्रीलंकेच्या करुणरत्ने आणि डिकवेलाचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाने प्रतिकार करायचा प्रयत्न केला नाही. करुणरत्नेचं शतक ३ धावांनी हुकलं. अश्विनने त्याचा त्रिफळा उडवत, भारताच्या विजयाच्या मार्गातला मोठा अडथळा दूर केला. इतर सर्व फलंदाजांनी भारतीय आक्रमणासमोर नांगी टाकलेली असताना, एकट्या करुणरत्नाने भारतीय आक्रमणाचा चांगला सामना केला. करुणरत्ने आणि डिकवेला यांच्यात पाचव्या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी झाली.  अखेर रविचंद्रन अश्विनने श्रीलंकेची जमलेली ही जोडी फोडली, आणि लंकेला पाचवा धक्का दिला. त्याआधी श्रीलंकेच्या कुशल मेंडीसला रविंद्र जाडेजाने यष्टीरक्षक साहाकरवी झेलबाद करत लंकेला तिसरा धक्का दिला . पाठोपाठ अँजलो मॅथ्यूजलाही माघारी धाडत जाडेजाने श्रीलंकेला चौथा धक्का दिला. यानंतर बाकीच्या सर्व फलंदाजांनी केवळ मैदानात हजेरी लावण्याचं काम केलं.

भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना, प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या करुणरत्ने आणि उपुल तरंगाने श्रीलंकेच्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली. दोघांनीही पहिली काही षटकं चांगली फटकेबाजी करत भराभर धावा काढल्या. यात काही सुरेख चौकारांचा समावेशही होता. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर उपुल तरंगाला स्लिपमध्ये कर्णधार विराट कोहलीने जीवदान दिलं, तरंगाचा सोपा झेल कोहलीने सोडला. त्यामुळे हा झेल भारताला महागात पडतो की काय असं वाटत असतानाच, शमीने तरंगाचा त्रिफळा उडवत श्रीलंकेला पहिला धक्का दिला. पाठोपाठ उमेश यादवने गुणतिलकाला माघारी धाडत श्रीलंकेला आणखी एक धक्का दिला.

मात्र त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी करुणरत्ने आणि मेंडीस यांनी केलेल्या ७९ धावांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे लंकेचा डाव सावरला. श्रीलंकेसाठी जमेची गोष्ट म्हणजे सलामीवीर करुणरत्ने अजुनही मैदानात कायम आहे. त्याने आज अर्धशतकी खेळी केली आहे. करुणरत्नेने आज एकट्याने भारतीय गोलंदाजीचा सामना केला.

भारताकडून रविंद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विन या जोडगोळीने ३-३ बळी घेत लंकेचा निम्मा संघ माघारी धाडला. तर मोहम्मद शमी आणि उमेश यादवने प्रत्येकी १-१ बळी घेत त्यांना चांगली साथ दिली.

त्याआधी गॉल कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने आपला डाव लवकर घोषित करुन श्रीलंकेसमोर ५५० धावांचं आव्हान ठेवलं आहे. कालच्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी आजच्या डावाची सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी आपल्या खेळाची गती वाढवत भराभर धावा काढण्यावर भर दिला. यादरम्यान विराट कोहलीने आपलं शतकही साजरं केलं. त्याने १३६ चेंडुंत १०३ धावांची खेळी केली, ज्यामध्ये ५ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याला अजिंक्य रहाणेनेही दुसऱ्या बाजूने चांगली साथ दिली. श्रीलंकेसमोर ५५० धावांचं आव्हान दिल्यानंतर अखेर भारताने आपला दुसरा डाव २४० धावसंख्येवर घोषीत केला. दुसऱ्या दिवशीच्या खेळात श्रीलंकेच्या गोलंदाजांना भारतीय गोलंदाजांना बाद करता आलं नाही.

या मालिकेतली दुसरी कसोटी ही ३ ऑगस्टपासून कोलंबोच्या मैदानात सुरु होणार आहे.

 • अखेर पहिल्या कसोटी भारताची श्रीलंकेवर ३०४ धावांनी मात
 • त्यामुळे करुणरत्ने बाद झाल्यानंतर उर्वरित फलंदाजांनी प्रतिकार न करता सामना भारताला बहाल केला
 • त्यात श्रीलंकेचे २ फलंदाज जायबंदी झाल्याने फलंदाजीसाठी मैदानात आलेच नाहीत
 • शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या करुणरत्नेला अश्विनने ९७ धावांवर बाद केलं
 • त्यानंतर एकही श्रीलंकन फलंदाज मैदानात तग धरु शकला नाही
 • अखेर डिकवेलाला माघारी धाडत अश्विनने श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली
 • करुणरत्ने आणि डिकवेला यांच्यात १०१ धावांची भागीदारी
 • चहापानापर्यंतचं सत्र श्रीलंकेच्या फलंदाजांनी खेळून काढलं, चहापानाला श्रीलंका १९२/४
 • करणरत्नेची डिकवेलासोबत आणखी एक अर्धशतकी भागीदारी, लंकेच्या फलंदाजांची चांगली झुंज
 • पाठोपाठ अँजलो मॅथ्यूज जाडेजाच्या गोलंदाजीवर पांड्याकडे झेल देत माघारी, लंकेला चौथा धक्का
 • जाडेजाने मेंडीसला बाद करत श्रीलंकेची जोडी फोडली, लंकेला तिसरा धक्का
 • तिसऱ्या विकेटसाठी करुणरत्ने आणि मेंडीसची चांगली भागीदारी, दोघांमध्ये ७९ धावांची भागीदारी
 • चौथ्या दिवशी लंच टाईमपर्यंत श्रीलंका ८५/२
 • मात्र यानंतर करुणरत्ने आणि मेडींसने डाव सावरला, दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी
 • पाठोपाठ धनुष्का गुणतिलका उमेश यादवच्या गोलंदाजीवर बाद, लंकेला दुसरा धक्का
 • मात्र शमीने तरंगाचा त्रिफळा उडवत, श्रीलंकेला पहिला धक्का दिला
 • शमीच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये कोहलीने तरंगाचा सोपा झेल सोडला, तरंगाला जीवदान
 • तरंगा आणि गुणरत्नेने शमी आणि यादवला सुरेख चौकार लगावत आपला इरादा स्पष्ट केला
 • प्रत्युत्तरादाखल लंकेकडून डावाची आक्रमक सुरुवात
 • कोहली १०३ धावांवर नाबाद, भारताचा डाव २४० धावांवर घोषित, लंकेला ५५० धावांचं आव्हान
 • कर्णधार विराट कोहलीचं दुसऱ्या डावात शतकं, त्याला अजिंक्य रहाणेचीही चांगली साथ
 • कोहली आणि रहाणेने धावांचा वेग वाढवला, भारताची आघाडी ५०० धावांच्या पार
 • तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर भारताच्या डावाला सुरुवात

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 10:30 am

Web Title: live update sri lanka vs india 1st test galle day 4
Next Stories
1 महिला क्रिकेटपटूंना भरघोस प्रायोजकांची अपेक्षा
2 द्युतीला जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेचे निमंत्रण
3 Pro Kabaddi Season 5 – पुण्याचा भरभक्कम बचाव, यू मुम्बा पहिल्याच फेरीत गारद
Just Now!
X