अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी स्पेन आणि माली यांच्यात चुरस

शास्त्रशुद्ध शैलीने फुटबॉल विश्वाला भुरळ पाडणारा स्पेनचा संघ, तर दुसरीकडे ताकदीच्या जोरावर चेंडू आपल्याकडे ठेवण्याची माली संघाची शैली. या दोन्ही भिन्न शैलींची झुंज पाहायला मिळणार आहे ती कुमार फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात. त्यामुळे डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये या भिन्न शैलींची फुटबॉल मैफल पाहण्याचा योग चाहत्यांना मिळणार आहे.

‘टिकी-टाका’ ही स्पेनची खेळण्याची शैली. छोटे छोटे पास देत चेंडू प्रतिस्पध्र्याच्या गोलजाळ्यापर्यंत घेऊन जायचा आणि योग्य ती संधी साधून गोल करण्यासाठी स्पेनचा संघ जगप्रसिद्ध आहे. पण आफ्रिका खंडातील बलाढय़ माली संघाचा खेळ हा बिनधास्तपणे आक्रमण करणारा आहे. त्यामुळे या सामन्यात छोटे पास करणारे स्पेनचे खेळाडू चमक दाखवतात की बिनधास्तपणे भिडणारे माली संघाचे खेळाडू छाप पाडतात, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

स्पेन आणि माली या दोन्ही संघांना सलामीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला होता. पहिल्या लढतीत स्पेनला ब्राझीलने पराभूत केले होते, तर माली संघावर पॅराग्वेने विजय मिळवला होता. पण त्यानंतरच्या सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करत या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे.

प्रतिस्पर्धी संघ

माली : अल्काइफा कौऊलीबाली, बोऊबाकर हैदारा, डेमोऊसा ट्राओर, फोड कोनाटे, मामदी फोफाना, मोहम्मद कामरा, हादजी ड्रेम, अब्दोऊलेय डाबो, सीम कामरा, सलाम गिडोऊ, मोमादोऊ ट्राओर, महामन टोऊर, सोऊमैला डोऊम्बिया, सिआका सिडीबे, अब्दोऊलेय डिआबी, योऊसोफ कोइटा, मोमादोऊ सामेक, इब्राहिम केन, लसाना एन’डिआये, चेइक डोऊकोर, मासिर गसामा.

स्पेन : अल्व्हारो फर्नाडेझ, माटेऊ जोऊम, जुआन मिरांडा, ह्य़ुगो ग्युलिमोन, व्हिक्टर, चुस्ट, अँटोनिओ ब्लँको, फेरान टोरेस, मोहम्मद मोऊक्लिस, अ‍ॅबेल रुइझ, सर्गियो गोमेझ, नॅचो डायझ, प्रेडो रुइझ, मार्क व्हिडाल, अल्व्हारो गार्सिया, एरिक गार्सिया, दिएगो पॅम्पीन, जोस लारा, सीझर गेलबर्ट, कालरेस बेइटीया, व्हिक्टर परेरा, अल्फान्सो पास्टोर.