News Flash

LIVE: आफ्रिकेचा भेदक मारा, अवघ्या चार धावांत लंकेचे दोन फलंदाज माघारी

विश्वचषक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकन संघाला सुरूवातीलाच दोन धक्के दिले.

| March 18, 2015 09:30 am

विश्वचषक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकन संघाला सुरूवातीलाच दोन धक्के दिले. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या तुल्यबळ संघात बुधवारी उपांत्यपूर्व फेरीची लढत होत आहे. सुरूवातील श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, श्रीलंकेच्या डावाची सुरूवात खराब झाली. श्रीलंकेच्या धावफलकावर अवघ्या ३ धावा लागल्या असतानाच आफ्रिकेच्या कायले अॅबॉटच्या गोलंदाजीवर सलामीवीर कुशल परेरा झेलबाद झाला. त्यानंतर मोठ्या अपेक्षा असलेला तिलकरत्ने दिलशानलाही स्टेनने माघारी धाडले. त्यामुळे श्रीलंकेची अवस्था २ बाद ४ अशी बिकट झाली आहे. आफ्रिकन गोलंदाजांचा टिच्चून मारा करत श्रीलंकेच्या फलंदाजांना जखडून ठेवले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2015 9:30 am

Web Title: live world cup 2015 sri lanka lose openers cheaply
टॅग : South Africa,Sri Lanka
Next Stories
1 विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरी स्पर्धा : पाकिस्तानातील फुटबॉल सामना रद्द
2 भारतीय बॅडमिंटन महासंघाकडून सायना व कश्यपला पाच लाख रुपये
3 भारतात मोटरसायकल शर्यतीला उज्ज्वल भविष्य!
Just Now!
X