एएफपी, किव्ह :

सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स लीग चषक उंचावण्यासाठी उत्सुक असलेला रेयाल माद्रिद क्लब शनिवारी मध्यरात्री इंग्लिश प्रीमिअर लीगमधील बलाढय़  लिव्हरपूलशी भिडणार आहे. या लढतीच्या निमित्ताने जगातील सर्वोत्तम आक्रमणपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि मोहम्मद सलाह यांच्यातील द्वंद्व पाहण्यासाठी युक्रेनची राजधानी किव्ह सज्ज झाली आहे.

१९८१मध्ये उभय क्लब चॅम्पियन्सच्या जेतेपदासाठी समोरासमोर आले होते आणि त्यावेळी अ‍ॅलेन केनेडी (८२ मि.) यांच्या एकमेव गोलने रेयालचे जेतेपदाचे स्वप्न धुळीस मिळवले होते. त्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी झिनेदिन झिदानचे खेळाडू आसुसलेले आहेत़्ा, तर तब्बल १३ वर्षांनी जेतेपदाला गवसणी घालण्यासाठी ज्युर्गन क्लोपचा लिव्हरपूल क्लब गुडघ्याला बांशींग बांधून तयार आहे.

या लढतीत रेयालचे पारडे जड मानले जात असले तरी लिव्हरपूलची लीगमधील वाटचाल पाहता अनपेक्षित निकालाची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. रेयालने १९५६ ते १९६० अशी सलग पाच वर्षे चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावले आणि मागील पाच वर्षांत चौथ्यांदा ते अशी कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहेत. अ‍ॅटलेटिको माद्रिद आणि युव्हेंटस या क्लबनाही रेयालचे वादळ रोखणे शक्य झाले नाही, परंतु या वेळी लिव्हरपूल आपल्या आक्रमणाच्या जोरावर अशक्यप्राय विजय मिळवू शकतो.  चॅम्पियन्स लीगची १२ जेतेपद नावावर असलेल्या रेयालचे पारडे जड आहे, परंतु २००७च्या अंतिम फेरीतील पराभवानंतर पुन्हा चालून आलेली जेतेपदाची संधी लिव्हरपूल दवडणार नाही. त्यात दोन्ही क्लबचे चाहते मोठय़ा संख्येने किव्ह येथे दाखल झाल्याने या लढतीबाबतची उत्सुकता अधिक शिगेला पोहोचली आहे.

संभाव्य संघ

रेयाल माद्रिद : केयलर नव्हास, डॅनी काव्‍‌र्हाहल, सेर्गिओ रामोस, मार्सेलो, गॅरेथ बेल, करिम बेंझेमा, ख्रिस्तियानो रोनाल्डो, राफेल व्हॅरने, कॅसेमिरो, टोनी क्रुस, ल्युका मॉड्रिक.

लिव्हरपूल : लॉरिस कॅरियस, ट्रेंट अ‍ॅलेक्झँडर-अर्नोल्ड, अँडय़्रू रॉबर्टसन, व्हिर्गिल व्हॅल डिज, डेजान लव्हरेन, जॉर्डन हेंडरसन, जॉर्जिनियो विजलॅल्डम, जेम्स मिलनर, मोहम्मद सलाह, रॉबेटरे फर्मिनो, सॅडिओ माने.

’ सामन्याची वेळ :

मध्यरात्री १२.१५ वा.

’ थेट प्रक्षेपण :

सोनी टेन १, सोनी टेन २.