22 July 2019

News Flash

मानेच्या दुहेरी गोलमुळे लिव्हरपूल उपांत्यपूर्व फेरीत

पूर्वार्धात दोन्ही संघांनी एकमेकांवर आक्रमणे केली.

सॅडिओ मानेने लगावलेल्या दोन गोलमुळे बायर्न म्युनिचला धक्का देत लिव्हरपूलचा संघ चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. जर्मनीच्या या बलाढय़ क्लबचा ३-१ असा पराभव करीत लिव्हरपूलने दमदार कामगिरीची नोंद केली.

पूर्वार्धात दोन्ही संघांनी एकमेकांवर आक्रमणे केली. त्यात मानेने २६व्या मिनिटाला अफलातून गोल करीत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर बायर्नकडूनही जोरदार प्रतिहल्ला चढवण्यात आला. त्यात जोएल मॅटिपने ३९व्या मिनिटाला गोल करीत बायर्नला बरोबरी साधून दिली. त्यामुळे मध्यंतराला दोन्ही संघ बरोबरीत होते. मात्र उत्तरार्धात व्हिर्जिल व्हॅन डिकने ६९व्या मिनिटाला लिव्हरपूलसाठी दुसरा गोल करीत लिव्हरपूलचा विजय निश्चित केला. त्यानंतर पुन्हा दोन्ही बाजूंनी जोरदार आक्रमणे करण्यात आली. त्यात सामना संपण्यास सहा मिनिटे शिल्लक असताना मानेने हेडरद्वारे तिसरा गोल लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

First Published on March 15, 2019 2:48 am

Web Title: liverpool fc