१९७०-८०च्या दशकात इंग्लिश प्रीमियर फु टबॉल लीगवर निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या लिव्हरपूलसारख्या अव्वल क्लबला विजेतेपदासाठी तब्बल ३० वर्षे प्रतीक्षा पाहावी लागली. चेल्सीने दुसऱ्या क्रमांकावरील मँचेस्टर सिटीला २-१ असे पराभूत के ल्यामुळे लिव्हरपूलने १९९०नंतर प्रथमच इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद संपादन केले.

सामाजिक अंतराचे नियम आणि गर्दीसंबंधातील कायदे असतानाही अ‍ॅनफिल्ड स्टेडियमबाहेर एकत्र जमून लिव्हरपूलच्या चाहत्यांनी विजेतेपदाचा जल्लोष साजरा केला. शेकडो चाहत्यांनी जमून फटाक्यांची आतषबाजी केली तसेच लिव्हरपूलच्या विजयाच्या घोषणाही दिल्या.

लिव्हरपूलने बुधवारी क्रिस्टल पॅलेसचा ४-० असा धुव्वा उडवत गुणतालिके तील आपले अग्रस्थान अधिक भक्कम केले होते. पण गुरुवारी पहाटे दुसऱ्या क्रमांकावरील मँचेस्टर सिटीला चेल्सीकडून पराभूत व्हावे लागल्याने लिव्हरपूलच्या विजयावर मोहोर उमटली. लिव्हरपूल ८६ गुणांसह अग्रस्थानी असून मँचेस्टर सिटीला (६३ गुण) उर्वरित सात सामन्यांमध्ये २३ गुणांची पिछाडी भरून काढता येणार नसल्याने लिव्हरपूलला विजेता घोषित करण्यात आले.

लिव्हरपूलमध्ये मध्यरात्र असतानाही चाहत्यांच्या आनंदाला अक्षरश: उधाण आले होते. ‘यू नेव्हर वॉक अगेन’ या लिव्हरपूल क्लबच्या गाण्याच्या ओळींचा जयघोष सुरू होता. त्यानंतर शहराच्या मध्यभागी आणि सेंट ल्युक चर्चजवळ चाहत्यांनी आनंदोत्सव साजरा केला. पोलिसांनी कार जप्त करायला सुरुवात केल्यानंतर चाहत्यांनी हॉर्न वाजवून जल्लोष केला. लिव्हरपूलचे खेळाडू एका हॉटेलबाहेर थांबून चेल्सी विरुद्ध मँचेस्टर सिटी सामना पाहात होते. त्यानंतर त्यांनीही चाहत्यांपासून दूर ठेवत आनंदोत्सव साजरा केला.

‘‘माझ्यासाठी हा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे. मी पूर्णपणे गहिवरून गेलो आहे. इतक्या मोठय़ा फरकाने आम्ही विजेतेपद मिळवू, याची कल्पनाही आम्ही केली नव्हती,’’ अशा शब्दांत लिव्हरपूलचे प्रशिक्षक जर्गेन क्लोप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘‘विजेतेपदासाठी आम्हाला बरीच प्रतीक्षा पाहावी लागली आहे. घरच्या चाहत्यांसाठी विजेतेपद मिळवण्यासाठी प्रत्येक जण आतुर होता. आज तो दिवस प्रत्यक्षात अवतरला आहे. चाहत्यांच्या आनंदाला अक्षरश: उधाण आले आहे,’’ असे लिव्हरपूलचा कर्णधार जेमी कॅरेगर म्हणाला.

या मोसमावर पूर्णपणे वर्चस्व गाजवणाऱ्या लिव्हरपूलने मार्च महिन्यात करोनामुळे ही स्पर्धा थांबवण्यात आली तेव्हा भक्कम आघाडी घेतली होती. सात सामने राखून प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळवणारा लिव्हरपूल हा पहिला संघ ठरला आहे. १९८८मध्ये प्रीमियर लीगला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकाही संघाला जून महिन्यापर्यंत विजेतेपदाची प्रतीक्षा पाहावी लागली नव्हती.

अंतर न राखता चाहत्यांकडून जल्लोष

सामाजिक अंतराचे नियम आणि गर्दीसंबंधातील कायदे असतानाही अ‍ॅनफिल्ड स्टेडियमबाहेर एकत्र जमून लिव्हरपूलच्या चाहत्यांनी विजेतेपदाचा जल्लोष साजरा के ला. शेकडो चाहत्यांनी जमून फटाक्यांची आतषबाजी केली तसेच लिव्हरपूलच्या विजयाच्या घोषणाही दिल्या.

एकूण विजेतेपदे : १९

वर्ष : १९००-०१, १९०५-०६, १९२१-२२, १९२२-२३, १९४६-४७, १९६३-६४, १९६५-६६, १९७२-७३, १९७५-७६, १९७६-७७, १९७८-७९, १९७९-८०, १९८१-८२, १९८२-८३, १९८३-८४, १९८५-८६, १९८७-८८, १९८