News Flash

भारतीय संघाला हवाय ऑलराऊंडर प्लेअर, हार्दिक म्हणतो…माझ्या घरी एक बसला आहे !

पहिल्या सामन्यात भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या ३७५ धावांचा पाठलाग करताना भारताकडून हार्दिक पांड्या आणि शिखर धवन यांचा अपवाद वगळता एकही फलंदाज आश्वासक खेळी करु शकला नाही. गोलंदाजीतही भारतीय संघाला अष्टपैलू खेळाडूची उणीव भासली. हार्दिक पांड्या गोलंदाजी करत नसल्यामुळे भारतीय संघाला सहाव्या गोलंदाजाची उणीव भासली.

अवश्य वाचा – भारतीय संघाला अजुनही धोनीची उणीव भासते आहे – मायकल होल्डिंग

हार्दिक पांड्याने ९० धावांची खेळी करुन आपली भूमिका चोख बजावली, परंतू फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात तो ही माघारी परतला. सामना संपल्यानंतर संघातील अष्टपैलू खेळाडूच्या कमतरतेविषयी विचारलं असतान हार्दिकने आपल्या भावाची भारतीय संघासाठी शिफारस केली. “ज्यावेळी तुम्ही पाच गोलंदाजांसह मैदानावर उतरता तेव्हा अशा समस्या नेहमी येतात. समजा एखाद्या गोलंदाजांचा दिवस खराब असेल तर त्याची जागा घेण्यासाठी तुमच्याकडे दुसरं कोणीही नसतं. माझ्या मते आम्हाला अशा एका खेळाडूची गरज आहे, जो भारतीय संघाकडून याआधी खेळला आहे. माझ्या घरात पहा, एक जण वाट पाहतोय.”

अवश्य वाचा – ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाचा सर्व मालिकांमध्ये पराभव होईल !

शिखर आणि हार्दिरक पांड्या भागीदारी करत असताना टीम इंडियाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतू फिरकीपटू झॅम्पाने टीम इंडियाची जमलेली जोडी फोडत ऑस्ट्रेलियाला पुन्हा पुनरागमन करुन दिलं. ७४ धावांची खेळी करत धवन बाद झाला. यानंतर हार्दिक पांड्याने फटकेबाजी करत सामन्यात रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतू झॅम्पाच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळताना तो देखील सीमारेषेवर स्टार्ककडे झेल देऊन माघारी परतला. पांड्याने ९० धावांची खेळी केली. यानंतर भारताच्या अखेरच्याा फळीतल्या फलंदाजांनी निराशाच केली. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू झॅम्पाने ४ तर हेजलवूडने ३ तर मिचेल स्टार्कने १ बळी घेतला.

अवश्य वाचा – षटकांची गती कायम न राखल्यामुळे भारतीय खेळाडूंवर ICC ची कारवाई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 3:42 pm

Web Title: look in the pandya family hardik sends subtle message to virat kohli over indias all rounder problem psd 91
Next Stories
1 षटकांची गती कायम न राखल्यामुळे भारतीय खेळाडूंवर ICC ची कारवाई
2 भारतीय संघाला अजुनही धोनीची उणीव भासते आहे – मायकल होल्डिंग
3 अन् मॅक्सवेलनं राहुलची मागितली माफी
Just Now!
X