आयपीएलमध्ये सुपरफ्लॉप ठरलेल्या आंद्रे रसलनं श्रीलंकेतील लंका प्रिमिअम लीगमध्ये तुफानी फटकेबाजी करत अवघ्या १४ चेंडूत अर्धशतकी खेळी केली. शनिवारी झालेल्या सामन्यात आंद्रे रसेलनं १९ चेंडूत नाबाद ६५ धावांची झंझावाती खेळी केली. पावसाच्या व्यत्ययामुळे २० षटकांऐवजी फक्त पाच-पाच षटकांचा सामना करण्यात आला होता.
कोलंबो किंग्जकडून सलामीला खेळताना रसेलनं १९ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. रसेलनं आपल्या तुफानी खेळीत ९ चौकार चार षटकार लगावले. रसेलच्या या तुफानी खेळीच्या बळावर कोलंबो किंग्जनं पाच षटकांत ९६ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात ग्लेडिएटर्सला दोन गड्यांच्या मोबदल्यात ६२ धावांपर्यंत मजल मारता आली.
रसेलनं आपल्या तुफानी फलंदाजीत फक्त दोन चेंडू निर्धाव खेळले. तीन चेंडूवर एकेरी धाव घेतली तर एका चेंडूवर दोन धावा घेतल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक युवराजच्या नावावर आहे. युवराजनं २००७ च्या विश्वचषकात अवघ्या १२ चेंडूत अर्शतकी खेळी केली होती. हा विक्रम अद्याप कोणालाही मोडता आला नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2020 12:18 pm