टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने गतवर्षात तीन कोटी १५ लाख डॉलर कमावल्याचा अंदाज प्रख्यात ‘फोर्ब्स’ मासिकाने व्यक्त केलाय. जगभरातील सर्वाधिक पैसे मिळवणाऱया १०० खेळाडूंची यादी मासिकाने नुकतीच प्रसिद्ध केली. त्यामध्ये धोनीचा क्रमांक १६ वा आहे. 
गोल्फपटू टायगर वूड्स यादीमध्ये पहिल्या स्थानावर आहे. त्याचे गतवर्षाचे अंदाजे उत्पन्न सात कोटी ८१ लाख डॉलर इतके असल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे.
फोर्ब्सने गेल्यावर्षी प्रसिद्ध केलेल्या याच यादीमध्ये धोनी ३१ व्या स्थानावर होता. एकाच वर्षात तो ३१ वरून १६ व्या स्थानावर आलाय. गतवर्षात धोनीने विविध स्पर्धातील बक्षिसे, मानधन आणि इतर व्यावसायिक करारांमधून तीन कोटी १५ लाख डॉलर कमावल्याचा अंदाज फोर्ब्सने व्यक्त केला.
यादीमध्ये वूड्सनंतर दुसऱया क्रमांकावर टेनिसपटू रॉजर फेडरर आहे. गतवर्षी त्याने सात कोटी १५ लाख डॉलरचे उत्पन्न कमावल्याचा अंदाज फोर्ब्सने मांडला आहे.