News Flash

जाहिरात विश्वात धोनीच्या कमाईत ४७ टक्क्यांनी घट!

धोनी गेल्या काही वर्षांत अनेक सुप्रसिद्ध ब्रॅण्ड्सचा चेहरा राहिला आहे

जाहिरात विश्वात आता धोनीच्या कमाईवर परिणाम होत असल्याचे प्रकर्षाने पुढे आले आहे.

भारताच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या हरहुन्नरी खेळीने जितके क्रिकेटचे मैदान गाजवले तितकाच त्याचा जाहिरात विश्वात देखील दबदबा राहिला आहे. धोनी गेल्या काही वर्षांत अनेक सुप्रसिद्ध ब्रॅण्ड्सचा चेहरा राहिला आहे. नुकतेच धोनीच्या आयुष्यावर आधारित चित्रपट देखील प्रदर्शित झाला. धोनीच्या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. पण जाहिरात विश्वात आता धोनीच्या कमाईवर परिणाम होत असल्याचे प्रकर्षाने पुढे आले आहे. धोनीच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूमध्ये कमालीची घट झाल्याचे फोर्ब्सच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. धोनीच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूमध्ये ४७ टक्क्यांनी घट झाली असून त्याच्या जाहिरात विश्वातील कमाईचा आकडा १४० कोटींवरून थेट ७३ कोटींवर घसरला आहे. पण धोनीच्या कमाईत घसरण झाली असली तरी तो इतर भारतीय खेळाडूंच्या तुलनेत अजूनही अव्वल स्थानावर आहे. जगातील पहिल्या दहा खेळाडूंच्या यादीत धोनी दहाव्या क्रमांकावर असून तो पहिल्या दहा जणांच्या यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय खेळाडू आहे. याआधी धोनी पाचव्या स्थानावर होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2016 7:26 pm

Web Title: m s dhoni most valued athlete among indians
Next Stories
1 पॅरालिम्पिक स्पर्धेत पदकाची कमाई करणाऱया दीपा मलिकला मोदींच्या हस्ते ४ कोटींचे बक्षिस
2 माझ्या मुलाने देशासाठी रक्त, घाम आणि अश्रू वाहिले आहेत, युवीच्या आईचे प्रत्युत्तर
3 हार्दिक पंड्याला कसोटी संघात स्थान दिल्याने नेटिझन्समध्ये आश्चर्य
Just Now!
X