वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या व्यवस्थापकपदी आंध्रप्रदेशचे माजी क्रिकेटपटू एम.व्ही.श्रीधर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीधरहे सध्या हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत. २८ जून पासून वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघाचे व्यवस्थापक म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) एम.व्ही. श्रीधर यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले. तसेच याआधीच बीसीसीआयने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीच्या १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. सध्याच्या चॅम्पियन्स करंडक मालिकेत खेळत असलेला संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीही कायम राखण्यात आलेला आहे. संघात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.
भारताच्या १९ वर्षाखालील संघाचीही ऑस्ट्रेलियामध्ये तिरंगी मालिका होणार आहे. या संघाच्या व्यवस्थापकपदी अरिंदम गांगुली यांची निवड करण्यात आली आहे.