News Flash

सचिनला भारतरत्न देण्याविरुद्धची याचिका फेटाळली

क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भारतरत्न जाहीर झाल्यानंतर दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मद्रास उच्च न्यायालाकडून फेटाळण्यात आली आहे.

| December 3, 2013 07:33 am

क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भारतरत्न जाहीर झाल्यानंतर दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मद्रास उच्च न्यायालाकडून फेटाळण्यात आली आहे.
एका खेळाडूला त्याच्या क्षेत्रात केलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल भारतरत्न पुरस्कार देण्याची ही पहिलीच वेळ असल्याने आणि हे नियमात बसत नसल्याचे सांगत एका वकीलाने मद्रास न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. सचिनला भारतरत्न देण्याविरोधातली ही याचिका मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी फेटाळून लावली.
क्रिकेटसुर्य सचिन तेंडुलकरने १६ नोव्हेंबरला आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याच दिवशी केंद्र सरकारने सचिनला भारतरत्न जाहीर करून क्रिकेटरसिक आणि सचिनला सुद्धा ‘सरप्राईझ’ दिले होते. सचिनबरोबर वैज्ञानिक सीएन राव यांनाही भारतरत्न जाहीर करण्यात आला होता. येत्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी सचिन तेंडुलकर आणि सी.एन.राव यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 7:33 am

Web Title: madras hc dismisses pil against sachin tendulkar getting bharat ratna
टॅग : Sachin Tendulkar
Next Stories
1 धोनीला ‘पीपल्स चॉईस’ पुरस्कार; ‘आयसीसी’च्या सर्वोत्तम संघाच्या कर्णधारपदीही धोनीच
2 आयपीएलमध्ये आता ‘जोकर’
3 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : चंद्रहार पाटीलचे आव्हान संपुष्टात
Just Now!
X