22 September 2020

News Flash

माद्रिद, मँचेस्टर सिटी बाद फेरीत

अव्वल फुटबॉलपटू वेन रुनीच्या एकमेव गोलच्या जोरावर त्यांनी अखेर विजयाला गवसणी घातली आहे.

वेन रुनी

रिअल माद्रिद आणि मँचेस्टर सिटी या दोन्ही संघांनी लौकिकाला साजेसा खेळ करीत चॅम्पियन्स फुटबॉल लीगच्या बाद फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे ४०० मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर मँचेस्टर युनायटेला गोल करण्यात यश आले. अव्वल फुटबॉलपटू वेन रुनीच्या एकमेव गोलच्या जोरावर त्यांनी अखेर विजयाला गवसणी घातली आहे.
मँचेस्टर सिटीने सेव्हिला संघावर ३-१ असा सहजपणे विजय मिळवला. सिटीने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. सामन्याच्या आठव्या मिनिटालाच आर. स्टर्लिगने गोल करीत सिटीचे खाते उघडले. त्यानंतर तीन मिनिटांनीच फर्नाडिन्होने गोल करीत सिटीची आघाडी वाढवली. आघाडी मिळाल्यावर सिटीचा संघ थोडा गाफील राहिला आणि त्याचाच फायदा सेव्हिला संघाने उचलला. सामन्याच्या २५व्या मिनिटाला बी. ट्रेमोऊलिनासने गोल करीत सेव्हिलासाठी पहिला गोल केला. त्यानंतर सेव्हिला संघाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण डब्ल्यू. बोनीने ३६व्या मिनिटाला गोल करीत सेव्हिलाला पिछाडीवर ढकलले. या गोलनंतर मात्र सिटीने पूर्णपणे बचावावर भर दिला. बचाव अधिक भक्कम करीत सिटीने सेव्हिलाला गोल करण्यापासून दूर ठेवले आणि सामना जिंकला.
दहा जेतेपदे पटकावणाऱ्या माद्रिदने नाचोच्या एकमेव गोलच्या जोरावर पॅरिस सेंट जर्मेन संघावर १-० असा सामन्यात विजय मिळवला. पॅरिस सेंट जर्मेन संघाने पहिल्या सत्रामध्ये जोरदार आक्रमण केले होते, पण माद्रिदच्या अभेद्य बचावापुढे त्यांना शरणागती पत्करावी लागली. नाचोने सामन्याच्या ३५व्या मिनिटाला माद्रिदसाठी एकमेव गोल केला. या गोलनंतर माद्रिदने बचावात्मक पवित्रा घेतला.
मँचेस्टर युनायडेटला या वेळी रुनी यशदायी ठरला. युनायटेड संघाला गेल्या काही सामन्यांपासून गोलचा दुष्काळ भेडसावत होता. पण रुनीच्या गोलने हे सारे भरून काढले. पहिल्या सत्रात युनायडेटला गोल न करता आल्यामुळे या सामन्यातही गोल पाहायला मिळणार नाही, असे युनायडेटच्या चाहत्यांना वाटत होते, पण सामन्याच्या ७९ व्या मिनिटाला रुनीने शिताफीने गोल केला आणि संघाला विजय मिळवून दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2015 6:30 am

Web Title: madrid manchester city loose the match
टॅग Manchester City
Next Stories
1 सरदार सिंगकडेच भारताचे नेतृत्व
2 जागतिक क्रमवारीत भरारी घेऊ!
3 फिरकी चक्रव्यूह!
Just Now!
X