25 January 2021

News Flash

मुश्ताक अली क्रिकेट : जाधव-शेखमुळे महाराष्ट्राचा विजय

जाधवने पाच चौकार आणि पाच षटकारांची आतषबाजी केली,

| January 13, 2021 02:27 am

केदार जाधव

बडोदा : केदार जाधव आणि नौशाद शेखच्या नाबाद अर्धशतकांच्या बळावर महाराष्ट्राने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या क-गटात मंगळवारी छत्तीसगढचा आठ गडी राखून पराभव केला.

एफबी कॉलनी ग्राउंडवर झालेल्या या सामन्यात छत्तीसगढने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १९२ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. छत्तीसगढच्या डावात सलामीवीर रिषभ तिवारी (४४), शशांक चांद्रकेर (४४) आणि कर्णधार हरप्रीत सिंग भाटिया (४२) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, तर उत्तरार्धात शशांक सिंगने आठ चेंडूंत नाबाद २४ धावा केल्या.

त्यानंतर, गुजरातविरुद्धचा सलामीचा सामना गमावणाऱ्या महाराष्ट्राची या सामन्यात २ बाद ३० अशी खराब सुरुवात झाली. सलामीवीर ऋतुराज गायकवाड (१५) आणि कर्णधार राहुल त्रिपाठी (१४) लवकर बाद झाल्यानंतर जाधव-शेख जोडीने सामन्याचे चित्र पालटले. जाधव (४५ चेंडूंत नाबाद ८४) आणि शेख (४४ चेंडूंत नाबाद ७८) यांनी छत्तीसगढच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत तिसऱ्या गडय़ासाठी नाबाद १६६ धावांची भागीदारी करीत विजय नोंदवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा पुरेसा अनुभव गाठीशी असलेल्या जाधवने पाच चौकार आणि पाच षटकारांची आतषबाजी केली, तर शेखने १० चौकार आणि दोन षटकार खेचले.

संक्षिप्त धावफलक

छत्तीसगढ : २० षटकांत ५ बाद १९२ (ऋषभ तिवारी ४४, शशांक चांद्रकेर ४४; मनोज इंगळे २/४३) पराभूत वि. महाराष्ट्र : २० षटकांत २ बाद १९६ (केदार जाधव नाबाद ८४, नौशाद शेख नाबाद ७८; वीरप्रताप सिंग १/२३)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2021 2:27 am

Web Title: maharashtra beat chhattisgarh by 8 wickets in syed mushtaq ali trophy zws 70
Next Stories
1 थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, प्रणीतचे आव्हान संपुष्टात
2 सेहवाग चौथ्या कसोटीत खेळण्यास तयार; BCCI ला दिली ऑफर
3 सायनाचा करोना रिपोर्ट् पॉझिटिव्ह असल्याचं वृत्त चुकीचं, थायलंड ओपन स्पर्धेत खेळण्याची शक्यता
Just Now!
X