News Flash

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी जय कवळी बिनविरोध

महासचिव, सचिव, खजिनदारपदासाठी ३० डिसेंबरला निवडणूक

महासचिव, सचिव, खजिनदारपदासाठी ३० डिसेंबरला निवडणूक

राज्यभरात बॉक्सिंगचे जाळे विणण्यात मोलाची भूमिका बजावणारे तसेच महाराष्ट्रातील बॉक्सिंगचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जय कवळी यांची महाराष्ट्र बॉक्सिंग महासंघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. महासंघाच्या कार्यकारिणीची निवडणूक ३० डिसेंबर रोजी कल्याण येथे होत असून महासचिव, सचिव आणि खजिनदार या तीन पदांसाठी चुरस रंगणार आहे.

कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील व पुण्याचे रमेशदादा बागवे यांच्यासह मराठवाडय़ातील माजी आमदार श्रीकांत जोशी तसेच परभणीचे आमदार राहुल पाटील हे उपाध्यक्षपदी असतील. खेळाडू या नात्याने माजी ऑलिम्पियन मनोज पिंगळे, कॅप्टन शाहू बिराजदार तसेच कॅप्टन गोपाल देवांग आणि गुरुप्रसाद रेगे हे उपाध्यक्षपदी कार्यरत असतील. याव्यतिरिक्त रिझवी एज्युकेशन सोसायटीचे जावेद रिझवी, सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे रणजित सावरकर, पश्चिम महाराष्ट्रातील प्रवरा सैनिक स्कूलचे कर्नल दिलीप परब, सांगलीचे माजी उपमहापौर मुन्ना कुरणे, देवगड एज्युकेशन बोर्डाचे जितेंद्र तावडे, नागपूरमधील सज्जाद हुसेन, चंद्रपूरमधील डॉ. भगवानदास प्रेमचंद यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.

महासचिवपदासाठी चंद्रपूरच्या डॉ. राकेश तिवारी यांच्यासमोर मुंबईच्या राजन जोथाडी यांनी आव्हान उभे केले आहे. खजिनदारपदासाठी सिंधुदुर्गचे एकनाथ चव्हाण आणि ठाण्याच्या मिलन वैद्य यांच्यात चुरस रंगणार आहे.

प्रशासकीय सचिवपदासाठी मुंबईच्या रविकांत काळे यांच्यासमोर परभणीचे धनंजय बनसोडे रिंगणात आहेत. कार्यकारी सचिवपदी पुण्याच्या मदन वाणी यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुण्याचे माजी साहाय्यक आयुक्त आणि माजी बॉक्सिंगपटू बाळासाहेब आगवणे हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहतील.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2018 1:38 am

Web Title: maharashtra boxing association jai kawali
Next Stories
1 नऊ संघ, नवी रंगत!
2 हिंगोलीच्या गणेशची बाजी
3 महिलांमध्ये उपनगर, पुण्याचे दमदार विजय
Just Now!
X