News Flash

‘महाराष्ट्रकन्या’ मोनिकाने रोवला अटकेपार झेंडा

महिला कॉन्स्टेबल असलेल्या मोनिकाने २ सुवर्णपदकांसह जिंकली ३ पदकं

चीनमध्ये झालेल्या World Police and Fire Games स्पर्धेमध्ये भारतीय पोलीस दलाच्या महिला प्रतिनिधीने भारताची मान उंचावली. या स्पर्धेत भारताच्या पोलीस दलाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महिला कॉन्स्टेबल मोनिका जाधव हिने तिरंदाजीमध्ये विक्रमी कामगिरी केली. तिने World Police and Fire Games स्पर्धेत दोन सुवर्णपदकांसह एकूण तीन पदके पटकावली.

मोनिका बुलडाणा पोलीस दलात कार्यरत असून आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. मोनिका जाधवला तिरंदाजी प्रशिक्षक चंद्रकांत इलग,सुरेश शिंदे यांचे मार्गदर्शन, तसेच पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले. ८ ते १८ ऑगस्ट या कालावधी दरम्यान चीनमध्ये World Police and Fire Games या स्पर्धा रंगल्या होत्या. यामध्ये मोनिकाने अतिशय चांगली कामगिरी केली.  ‘टार्गेट आर्चरी’ या प्रकारात मोनिकाने ७२० पैकी ७१६ गुण मिळवित विक्रम नोंदविला. फिर्ल्ड आर्चरीमध्ये तिने सुवर्ण, तर ‘थ्रीडी’ आर्चरी प्रकारात कांस्यपदक मिळविले.

२०१३ मध्ये मोनिका पोलीस दलात भरती झाली होती. त्यानंतर मे महिन्यात शांघाय येथे झालेल्या विश्व स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करताना तिने जागतिक स्तरावर नववे स्थान पटकावले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 11:10 am

Web Title: maharashtra buldhana lady police constable archer monica jadhav won 2 gold medals and 1 bronze medal in world police and fire games in china vjb 91
Next Stories
1 मुंबईकर अजिंक्य रहाणेची दमदार खेळी
2 राजपूत, राठोड, अमरे अग्रेसर
3 अपंगत्वावर मात करीत क्रिकेटपटू विक्रांतची भरारी!
Just Now!
X