महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने आयोजित केलेल्या महाराष्ट्र बुद्धिबळ लीग स्पर्धेचा थरार बुधवारपासून बुद्धिबळचाहत्यांना अनुभवता येणार आहे. ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, विदित गुजराथी यांच्यासह नामवंत खेळाडूंच्या सहभागामुळे ही स्पर्धा अतिशय रंगतदार होईल, अशी अपेक्षा आहे.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे बुधवारी दुपारी चार वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल. गतविजेता पुणे अ‍ॅटॅकर्स, उपविजेता जळगाव बॅटलर्स, ठाणे कॉम्बॅटन्ट्स, अहमदनगर चेकर्स, मुंबई मूव्हर्स, पुणे ट्र मास्टर्स अशा सहा फ्रँचाईजींमध्ये ही स्पर्धा होत आहे.
सहभागी झालेल्या संघातील खेळाडू
अहमदनगर चेकर्स : अभिजित कुंटे, तेजस बाक्रे, पद्मिनी राऊत, शार्दूल गागरे, अभिषेक केळकर, आकांक्षा हगवणे, एन. आर. विघ्नेश.
जळगाव बॅटलर्स : विदित गुजराथी, बी. अधिबान, के. मनीषा मोहंती, नारायण श्रीनाथ, प्रतीक पाटील, शशिकांत कुतवळ, ऋचा पुजारी.
मुंबई मूव्हर्स : परिमार्जन नेगी, अनुप देशमुख, हिमांशू शर्मा, ईशा करवडे, भक्ती कुलकर्णी, चिन्मय कुलकर्णी, राकेश कुलकर्णी.
पुणे ट्र मास्टर्स : विष्णू प्रसन्ना, एस. पी. सेतूरामण, आदित्य उदेशी, स्वाती घाटे, मेरी अ‍ॅन गोम्स, पवन दोडेजा, समीर काठमाळे.
पुणे अ‍ॅटॅकर्स : एम. आर. ललित बाबू, दीप्तायन घोष, स्वप्नील धोपाटे, एम. एस. तेजसकुमार, सौम्या स्वामिनाथन, सागर शहा, सुप्रिया जोशी, मिथिल आजगावकर.
ठाणे कॉम्बटन्ट्स : अभिजित गुप्ता, विक्रमादित्य कुलकर्णी, प्रसन्ना राव, तानिया सचदेव, अभिमन्यू पुराणिक, एस. एल. नारायण, प्रणाली धारिया.