वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आणि नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेच्या यजमानपदाखाली संतोष करंडक फुटबॉल स्पध्रेत तब्बल ९० व्या मिनिटाला सेनादलाने गोल करण्यात यश आले. मात्र, महाराष्ट्राचे गोल करण्याचे अनेक प्रयत्न फसले. सेनादलाचा हा सलग तिसरा विजय होता.
आज सामना सुरू होताच महाराष्ट्राने आपली बाजू आक्रमक ठेवली. ४० व्या मिनिटाला महाराष्ट्राच्या जर्सी नंबर ११ पी. जैनने रिअल अटॅक करत डीच्या आतून सुंदर शॉट मरला. मात्र, तो अयशस्वी झाला. हाफ टाईमनंतर ५८ व्या मिनिटाला महाराष्ट्राच्या जर्सी नंबर ८ फर्नाडिसने हेडरच्या सहाय्याने बॉल गोलपोस्टकडे वळवला. मात्र, तो प्रयत्नही चुकला. त्यानंतर ७८ मिनिटाला सेनादलाच्या जर्सी नंबर ७ ने अँथनीने गोलपोस्टसमोरून शॉट मारला. मात्र, महाराष्ट्राच्या गोलरक्षक किशनने झेप घेऊन तो अडवला. सामना संपण्यास काही मिनिटे शिल्लक असतानाच ९० व्या मिनिटाला जर्सी नंबर ७ अँथनीच्या पासवर जर्सी नंबर १३ विवेककुमारच्या हेर्डने बॉल जर्सी नंबर १७ फ्रांसीसकडे वळवला अन् त्याने हेडरच्या सहाय्याने सुंदर गोल करून महाराष्ट्राचा सलग चवथा विजय हाणून पाडला. फ्रान्सीसला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.