27 February 2021

News Flash

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : जलतरणात महाराष्ट्राला चार सुवर्ण

कुस्तीत विजय पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांनी सुवर्णपदक मिळवून दिले.

(संग्रहित छायाचित्र)

 

‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंची सुवर्णपदकांची लयलूट सुरूच आहे. महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी रविवारी चार सुवर्णपदके पटकावली. तसेच कुस्तीत विजय पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांनी सुवर्णपदक मिळवून दिले.

जलतरण प्रकारात मिहीर आंब्रे याने मुलांच्या २१ वर्षांखालील गटात १०० मीटर बटरफ्लाय आणि ४ बाय १०० मीटर मिडले रिले प्रकारात सुवर्णपदक पटकावले. अपेक्षा फर्नाडिस हिने १७ वर्षांखालील गटात ४०० मीटर वैयक्तिक मिडले शर्यत विक्रमी वेळेत पार करत सुवर्णपदक मिळवले. तसेच केनिशा गुप्ताने १०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.

वेटलिफ्टिंगमध्ये प्राजक्ता खालकरने ६४ किलो गटात, अभिषेक निपणेने ७३ किलो गटात तर किरण मराठे याने युवा गटात सुवर्णपदक पटकावले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2020 1:21 am

Web Title: maharashtra gets four gold in swimming abn 97
Next Stories
1 प्रीमियर बॅडमिंटन लीग आजपासून
2 जोकोव्हिच, नदाल, फेडरर यांच्यात जेतेपदासाठी चुरस
3 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : अक्षदीपच्या शतकामुळे उत्तर प्रदेश सुस्थितीत
Just Now!
X