News Flash

‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा : ज्योतिबा, रामचंद्र, सागर यांना सुवर्ण

माती विभागात गतविजेता बुलढाण्याचा बाला रफिक शेखने अमरावतीच्या हर्षल आकोटकरवर १०-० असा तांत्रिक गुणाधिक्याने विजय मिळवला.

(संग्रहित छायाचित्र)

 

‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेत शनिवारी सोलापूरच्या ज्योतिबा अटकळे (५७ किलो) आणि सोलापूरच्या रामचंद्र कांबळे (७९ किलो) यांनी गादी विभागात तर माती विभागात पुण्याच्या सागर मारकडने (६१ किलो) सुवर्णपदक पटकावले.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पध्रेत गादी विभागातील ७९ किलो गटाच्या अंतिम फेरीत रामचंद्रने उस्मानाबादच्या रवींद्र खैरेवर १४-३ अशी मात केली. अहमदनगरचे केवल भिंगारे व साताऱ्याच्या श्रीधर मुळीक यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत सोलापूरच्या ज्योतिबाने कोल्हापूरच्या रमेश इंगवलेला चीतपट केले. उपांत्यपूर्व फेरीत बीडच्या आतिष तोडकर याने पुण्याच्या केतन घारेचा १०-० असा पराभव करून कांस्यपदक पटकावले. दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत पुणे शहराच्या संकेत ठाकूरने कोल्हापूर शहराच्या साइराम चौगुलेचा १०-० असा पराभव करून कांस्यपदक मिळवले.

माती विभागाच्या ६१ किलो वजनी गटातील माती विभागात पुणे जिल्हय़ाच्या सागरने पुणे शहरच्या निखिल कदमला चीतपटीने मात करीत सुवर्णपदकावर कब्जा केला. सागर मारकड प्रथमच ६१ किलो वजनी गटात खेळत होता व पदार्पणातच त्याने सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली. याआधी सागर ५७ किलो वजनी गटात खेळत असे. त्याही गटात गेली चार वर्षे तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे.

‘महाराष्ट्र केसरी’ खुल्या गटाची प्रथम फेरी पार पडली. गादी विभागात लातूरच्या सागर बिराजदारने नांदेडच्या विक्रम वडतिलेवर १९ सेकंदात १० गुणांच्या तांत्रिक गुणाधिक्याने विजय मिळविला. पुण्याच्या अभिजीत कटकेने अमरावतीच्या मिरजा नदीम बेगवर ६ सेकंदांत चीतपट विजय मिळवून पुढील फेरी गाठली. मुंबईच्या समाधान पाटीलने हिंगोलीच्या दादुमिया मिलानीवर ७-२ असा विजय मिळवला. सोलापूर शहरच्या योगेश पवारने ठाणे जिल्ह्य़ाच्या साहिल पाटीलवर ११-६ अशी मात केली. विष्णू खोसेचा प्रतिस्पर्धी काही कारणास्तव अनुपस्थित असल्याने त्याला पुढे चाल मिळाली.

माती विभागात गतविजेता बुलढाण्याचा बाला रफिक शेखने अमरावतीच्या हर्षल आकोटकरवर १०-० असा तांत्रिक गुणाधिक्याने विजय मिळवला.

अंतिम निकाल

गादी विभाग – ७९ किलो : १. रामचंद्र कांबळे (सोलापूर), २. रवींद्र खैरे (उस्मानाबाद), ३. केवल भिंगारे (अहमदनगर) आणि ३. श्रीधर मुळीक (सातारा); ५७ किलो : १. ज्योतिबा अटकळे (सोलापूर), २. रमेश इंगवले (कोल्हापूर), ३. आतिष तोडकर (बीड) आणि संकेत ठाकूर (पुणे शहर). माती विभाग – ६१ किलो : १. सागर मारकड (पुणे जिल्हा), २. निखिल कदम (पुणे शहर), ३. हनुमंत शिंदे (सोलापूर जिल्हा)

नवीन वजनी गटात खेळण्यासाठी गेले वर्षभर तयारी करीत होतो. त्यामुळे आपण यामध्ये पदक जिंकू असा विश्वास होता, पण अंतिम फेरीत इतक्या सहजासहजी विजय मिळेल असे वाटले नव्हते. यशाचे श्रेय मी माझे वडील मारुती मारकड यांना देतो, जे स्वत: एनआयएस कुस्ती प्रशिक्षक आहेत. यापुढे राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करण्याचे माझे ध्येय असून त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धावर लक्ष केंद्रित करून देशाचेही नाव उज्ज्वल करेन.

– सागर मारकड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2020 2:03 am

Web Title: maharashtra kesari wrestling tournamentjyotiba ramachandra sagar gold abn 97
Next Stories
1 बिकट परिस्थितीला ‘खो’ देत रंजनची गरुडझेप!
2 डाव मांडियेला : ब्रिज खेळाची तोंडओळख!
3 कसोटीची कसोटी!
Just Now!
X