05 March 2021

News Flash

पश्चिम विभागीय स्पध्रेसाठी हृषीकेश, दीक्षाकडे महाराष्ट्राचे नेतृत्व

गेल्या वर्षी भुवनेश्वर येथे पार पडलेल्या कुमार व मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पध्रेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी विजेतेपद पटकावले होते

सुरतमध्ये रविवारपासून सुरू होणाऱ्या पश्चिम विभागीय कुमार व कुमारी (१८ वर्षांखालील) अजिंक्यपद खो-खो स्पध्रेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई उपनगरचा हृषीकेश मुर्चावडेकडे कुमार संघाचे, तर ठाण्याच्या दीक्षा कदमकडे कुमारी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
गेल्या वर्षी भुवनेश्वर येथे पार पडलेल्या कुमार व मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पध्रेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी विजेतेपद पटकावले होते व या स्पध्रेतील कुमार गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानाचा ‘वीर अभिमन्यू पुरस्कार’ हृषीकेशने पटकावला होता.
संघ :
कुमार : हृषीकेश मुर्चावडे (कर्णधार), जयेश गावडे , प्रतीक देवरे ( सर्व मुंबई उपनगर), संकेत कदम, आदित्य कांबळे, चिराग आंगलेकर (सर्व ठाणे), राहुल ऐडके, प्रद्युम्न पाटील (सर्व सांगली), प्रतीक बांगर (पुणे), तेजस मगर (अहमदनगर), निखिल कांबळे (मुंबई), अविनाश मते(उस्मानाबाद). प्रशिक्षक : श्री. उमेश आटवणे (नाशिक).
कुमारी : दीक्षा कदम (कर्णधार), प्रियांका भोपी, रूपाली बडे (सर्व ठाणे), प्रणाली बेनके , प्रियांका इंगळे ( सर्व पुणे) , तन्वी कांबळे (रत्नागिरी), ऋतुजा खरे (उस्मानाबाद), सोनाली बावणे (औरंगाबाद), निकिता मरकड (अहमदनगर), मधुरा पेडणेकर (मुंबई), प्रतीक्षा खुरंगे (सातारा), हेमलता गायकवाड (नाशिक) प्रशिक्षक : पंकज चवंडे (रत्नागिरी).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2016 3:21 am

Web Title: maharashtra kho kho team captain diksha kadam
Next Stories
1 अंतिम फेरीत पोहोचण्याचा आनंद निराळाच – डी’व्हिलियर्स
2 हैदराबादचा दिमाखदार विजय
3 वॉवरिन्का, निशिकोरी तिसऱ्या फेरीत
Just Now!
X